लंडन, 12 ऑक्टोबर : आपल्या प्रत्येकाला कशाची ना कशाची भीती वाटते. झुरळ, पाल, पाणी, आग यांची भीती (Phobia) वाटणं ठिक आहे. पण कधी कोणत्या पदार्थाची भीती वाटत असल्याचं ऐकलं आहे का? एका महिलेला ही विचित्र समस्या आहे. तिला चक्क भाज्यांची (Vegetables) भीती वाटते. भाज्या (Fear of Vegetables) पाहताच तिला दरदरून घाम फुटतो (Food phobia). भाज्यांची भीती…ऐकूनच आश्चर्य वाटलं ना. एखादी भाजी आवडत नाही हे ठिक आहे. पण भाज्यांची भीती कशी काय वाटू शकते. असाच प्रश्न तुम्हाला पडला असेल ना. पण नॉर्थ यॉर्कशायरमध्ये राहणारी 34 वर्षांची शार्लेट व्हिटल या समस्येचा सामना करते आहे. भीतीने ती भाज्यांच्या जवळही जात नाही. शार्लेट सांगते, भाज्यांच्या भीतीने मी लहानपणापासून भाज्या कधीच खाल्या नाहीत. एकदा ब्रोकोली पाहताच माझ्या हातांना घाम फुटला. मी सुपरमार्केटमध्ये शॉपिंग करतानासुद्धा भाज्यांच्या काऊंटरपासून दूर राहते. द सन च्या रिपोर्टनुसार शार्लेटला लहानपणापासून फूड फोबिया (Food Phobia) आहे. यामुळे ती मोजकेच पदार्थ खाऊ शकते. शार्लेट सांगते, सुरुवातीला मी भाज्या खाऊ शकत नव्हते, जसजशी मोठे झाले तसतसे मला मिल्कशेक, सॉस यासारख्या घट्ट पदार्थांचीही भीती वाटू लागली. खाण्याच्या टेबलवर असं काही दिसताच मी दूर जाते किंवा मला उल्टी होते. शाळेतही तिला जेवण मिळायचं तेव्हा ती रडायची. हे वाचा - आजी-आजोबांचं गाव! इथं सर्वाधिक वयोवृद्ध, पुरुषांपेक्षा महिला जगतात जास्त कारण… शार्लेटच्या आईने तिला डॉक्टरांकडे दाखवलं नाही. तिला ज्या पदार्थांची भीती वाटत नव्हती, असे पदार्थ तिला खायला दिले. त्यामुळे शार्लेट फक्त चिकन नगेट्स आणि राइस केक खाऊ शकते. वयाच्या अठराव्या वर्षात जेव्हा तिला नोकरीसाठी घरापासून दूर जावं लागलं तेव्हा तर तिची अवस्था बेकार झाली. तिथं मिळणारं जेवण ती खाऊ शकत नव्हती. मग स्वतःच स्वतःचं जेवण बनवून खाऊ लागली. इतरांसारखं ती खाऊ शकत नाही म्हणून लोक तिची थट्टा करतात. यामुळे ती कुठेच जाऊ शकत नाही. ना मित्रांसोबत रेस्टॉरंटमध्ये, ना लग्नासारख्या कार्यक्रमात. इतकंच नव्हे तर याच समस्येमुळे गेल्या दहा वर्षांपासून ती सिंगल आहे. कारण खाण्याच्या भीतीने ती डेटवर नाही जाऊ शकत. शार्लेट सांगते, तिच्याकडे एक पपी आहे आणि तिला त्याच्यासोबतच राहायला आवडतं. शार्लेटची भूकही आता कमी झाली आहे. दिवसातून एकदाच ती जेवते. शार्लेट सांगते, “यावर्षी जानेवारीत तर माझी अवस्था आणखी बिघडली. मी आता जिवंत राहण्यासाठी दिवसातून फक्त एकदाच संध्याकाळी साडेसात वाजता चिकन नगेट्स किंवा राइस केक खाते” हे वाचा - हिच्याकडून INSULT करून घ्यायला धडपडतात पुरुष; अपमानासाठी मोजतात हजारो रुपये “या वर्षी मार्चमध्ये मी अखेर डॉक्टरांकडे जाण्याचा निर्णय घेतला. सोबतच एक्सट्रीम फूड फोबिक्स या टीव्ही शोमध्येही भाग घेतला. यानंतर हळूहळू माझी प्रकृती सुधारू लागली आहे. मी सॉससोबत पास्ता खाण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. काही आठवड्यांतच माझ्यात सुधारणा होत आहे. खाण्याची चिंता न करता मित्रमैत्रिणींसोबत लंच-डिनरला जावं, डिनरला जावं हेच माझं स्वप्नं आहे. आता मला आशा दिसते आहे”, असा विश्वास शार्लेटने व्यक्त केला आहे.