जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / आजी-आजोबांचं गाव! इथं सर्वात जास्त वयोवृद्ध, पुरुषांपेक्षा महिलाच जगतात जास्त कारण...

आजी-आजोबांचं गाव! इथं सर्वात जास्त वयोवृद्ध, पुरुषांपेक्षा महिलाच जगतात जास्त कारण...

आजी-आजोबांचं गाव! इथं सर्वात जास्त वयोवृद्ध, पुरुषांपेक्षा महिलाच जगतात जास्त कारण...

देशातील नागरिकांच्या आयुर्मानापेक्षाही या गावातील नागरिकांचं आयुर्मान जास्त आहे.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    लंडन, 12 ऑक्टोबर : आपलं किंवा आपल्या प्रिय व्यक्तींचं आयुष्य भरपूर असावं (Live long), असं प्रत्येकाला वाटतं. शतायुषी भवः असा आशीर्वादही दिला जातो. पण सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आयुष्याची शंभरी गाठणं तसं अवघडच आहे. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा गावांबाबत सांगणार आहोत, जिथलं आयुर्मान (Life expectancy) हे देशापेक्षाही जास्त आहे आणि विशेष म्हणजे इथं पुरुषांपेक्षा महिलाच जास्त जगतात. इंग्लंडमधील डेटलिंग (Detling) आणि थर्नहॅम केंट (Thurnham Kent) या गावांची खासियत म्हणजे, इथल्या लोकांचं आयुर्मान हा इतर देशाच्या तुलनेत अधिक आहे. तसंच इथल्या महिला या पुरुषांपेक्षा अधिक काळ जगतात.  एका रिपोर्टनुसार, या गावातील महिलांचं आयुर्मान (Women life expectancy more than men) हे सरासरी 95 वर्षे आहे. तर संपूर्ण ब्रिटनचं आयुर्मान (Life Expectancy in Britain) केवळ 83 वर्षे आहे. म्हणजेच या दोन गावांमधील महिला या त्यांच्या देशातील उर्वरित नागरिकांच्या तुलनेत 12 वर्षे अधिक (Women live longer than men) जगतात. तसंच, इथल्या पुरुषांचा सरासरी आयुर्मान हा 86 वर्षे आहे. म्हणजेच येथील पुरूष हे देशातील इतर भागाच्या तुलनेत तीन वर्षे अधिक जगतात. हे वाचा -  आश्चर्य! 9 महिने नाही, फक्त 8 मिनिटांची प्रेग्नन्सी; काही क्षणात जन्माला आलं बाळ रिपोर्ट्नुसार, डेटलिंग गावाची लोकसंख्या जवळपास 800 आहे. यातील कित्येकांचं नाव हे ब्रिटनमधील सर्वात वयोवृद्ध लोकांच्या यादीत (Town with most aged citizens of Britain) समाविष्ट आहे. गावातील इरिने नोब्ज यांनी याच वर्षी एप्रिलमध्ये आपला 102वा (Britain woman celebrate 102nd Bithday) वाढदिवस साजरा केला. त्या एका पार्लरमध्ये हेअर ड्रेसरचे काम करत असत. नर्सिंग होममध्ये राहणाऱ्या नोब्ज यांनी सांगितलं, की आयुष्यभर नेहमी कामात व्यग्र राहिल्यामुळेच त्या एवढं जास्त जगू शकल्या. स्वच्छता-आरोग्याच्या बाबतीत गाव आहे जागरूक या गावातील लोक स्वच्छतेच्या बाबतीत अत्यंत जागरुक आहेत. गावात एकूण 8 डॉक्टर आहेत. म्हणजेच, 100 व्यक्तींमागे एक डॉक्टर आहे. त्यामुळे इथे तातडीने वैद्यकीय सुविधा मिळून जाते. या गावातील हवा आणि पाणीदेखील (England town with highest life expectancy) अगदी शुद्ध आहे. गावातील लोकांमध्येही एकमेकांविषयी प्रेम-जिव्हाळा आहे. कोरोना काळातही या गावातील रहिवाशांनी एकमेकांची पुरेपूर काळजी घेतली होती. हे वाचा -  हिच्याकडून INSULT करून घ्यायला धडपडतात पुरुष; अपमानासाठी मोजतात हजारो रुपये या गावातील लोकांनी इनडोअर स्मोकिंगवर बंदी (Britain town with ban on indoor smoking) लागू केली आहे. म्हणजेच पब आणि कामाच्या ठिकाणी धूम्रपानास बंदी आहे. विशेष म्हणजे, देशभरात अशा प्रकारची बंदी लागू होण्याच्या सात वर्षांपूर्वीच या गावाने हा निर्णय जाहीर केला होता. धूम्रपानाचा व्यक्तीच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो, हे समजण्यासाठी दुसऱ्या एका गावाचे उदाहरण पाहूया. इंग्लंडमधीलच ब्लूमफील्ड (Bloomfield) या गावात महिलांचं आयुर्मान (Bloomfield town life expectancy) हे केवळ 73 वर्षे आहे, तर पुरुषांचं केवळ 67 वर्षे. या गावातील लोक मोठ्या प्रमाणात धूम्रपान करत असल्यामुळे आयुर्मान इतकं कमी आहे. दरम्यान, 2019ची आकडेवारी पाहिली, तर भारतातील आयुर्मान हा सरासरी 69.66 वर्षे आहे. आयुर्मान किती असावं हे आपल्या हातात थोडंच असतं?, पण व्यायाम करून, पौष्टिक आहार घेऊन आनंदानं आहे ते जीवन जगायचं हे सूत्र पाळणं मात्र आपल्या हातात आहे. दीर्घायू होण्याचा तो जणू रोडमॅपच आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात