Home /News /lifestyle /

ऐकावं ते नवल! हिच्याकडून INSULT करून घ्यायला धडपडतात पुरुष; अपमानासाठी मोजतात हजारो रुपये

ऐकावं ते नवल! हिच्याकडून INSULT करून घ्यायला धडपडतात पुरुष; अपमानासाठी मोजतात हजारो रुपये

पुरुषांचा अपमान करून ही महिला कमावते पैसे.

    मुंबई, 11 ऑक्टोबर : कुणी आपल्याबद्दल वाईट बोलत असेल, आपली निंदा करत असेल तर कुणालाही आवडत नाही. विशेषतः जर एखादी महिला एखाद्या पुरुषाला काही वाईट बोलत असेल (Woman earn money by insulting men), तर त्या पुरुषाला आपला पुरुषीपणा, स्वाभिमान दुखावल्यासारखा वाटतो. महिलेने केलेला अपमान पुरुषांना बिलकुल सहन होत नाही. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल पण या महिलेकडून आपला अपमान, निंदा करून घ्यायला पुरुष धडपडतात. पुरुषांना हिच्याकडून स्वतःचा अपमान करून घ्यायला आवडतं. त्यासाठी तिला ते पैसेही देतात. निक्की फॉक्स (Nikki Fox) नावाची ही महिला. एक टिकटॉकर (Tiktoker) आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. इन्टाग्रामवरही तिचे फरेच फॅन्स आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून तसे बरेच लोक कमाई करतात. पण निक्की ज्या मार्गाने पैसे कमावते आहे, तो थोडा विचित्रच आहे. निक्कीने  स्वतःच आपल्या सोशल मीडियावर आपल्या पैसे कमावण्याचा मार्गाचा खुलासा केला आहे. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार निक्कीने टिकटॉकवर आपला एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तिने लोक स्वतःची निंदा करून घ्यायला तिला पैसे देतात, असं तिनं सांगितलं. लोक असं का करत आहेत, यामुळे निक्कीसुद्धा हैराण आहे. पण याबदल्यात तिला पैसे मिळत असल्याने ती तसं करते. हे वाचा - आश्चर्य! 9 महिने नाही तर फक्त 8 मिनिटांची प्रेग्नन्सी; अवघ्या काही क्षणातच जन्माला आलं बाळ तिने आपल्या व्हिडीओत एक चॅट दाखवलं आहे. ज्यात एका व्यक्तीने तिच्याकडे विचित्र मदत मागितली आहे. निक्की सांगते, एका व्यक्तीने मला इन्स्टाग्रामवर मेसेज केला. तो माझ्या घराचं बिल भरेल, त्याबदल्यात तिला त्याची निंदा करावी लागेल. मी वाईट नाही त्यामुळे मला हे करणं कठीण होतं. पण जर यासाठी पैसे मिळत असतील तर काय हरकत आहे, करायला असा विचार मी केला. मी त्याला मी हे करण्यासाठी तयार आहे. पण याचा व्हिडीओ बनवणार नाही फक्त ऑडिओ मेसेज पाठवेन असं सांगितलं. हे वाचा - DNA टेस्ट करून आपल्या पूर्वजांचा शोध घेत होती तरुणी; Result समोर येताच हादरली निक्कीने त्या व्यक्तीला एक वॉईस नोट पाठवलं. ज्यात तिनं त्याच्याबद्दल खूप वाईट वाईट म्हटलं होतं. खोटंखोटं रागवत तिने सांगितलं ही लवकरच माझं बिल भरं.  पहिल्यावेळी मी चांगलं केलं, तयामुळे ती व्यक्ती दुसरं बिल भरायलाही तयार झाली. त्या व्यक्तीने मला लगेच सात हजार रुपये पाठवले आणि आता मी अशापद्धतीने वाईट महिला बनून पैसे कमवते.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Viral, Viral news

    पुढील बातम्या