प्रतीकात्मक फोटो
दमास्कस, 02 फेब्रुवारी : त्याच्या पदरात लेकीचं सुख पडलं. पण या लेकीचा बाबा होण्याचा त्याचा हा आनंद काही दिवसांपुरताच राहिला. ज्या लेकीचा तो बाबा झाला ती लेक सातव्या दिवशीच त्याला सोडून गेली. त्याच्या सात दिवसांच्या लेकीने जगाचा कायमचा निरोप घेतला. क़़डाक्याच्या थंडीमुळे या चिमुकलीचा अक्षरशः बर्फ बनला. बापाच्या डोळ्यादेखतच तिने आपला जीव सोडला. ही हृदयद्रावक घटना आहे सीरियातील (Syria idp camps 7 days baby girl freeze due to cold). सीरिया जिथं गृहयुद्धामुळे परिस्थिती अत्यंत भयंकर आहे. कित्येक लोक आपलं घर सोडून पळाले आहेत, जे इदलिब प्रांतातील विस्थापन शिबीरांमध्ये राहत आहेत. याच कॅम्पमध्ये राहणाऱ्या मुलांचा थंडीमुळे त्यांच्या पालकांच्या डोळ्यादेखत मृत्यू होतो आहे आणि हे पालक आपल्या मुलांचा जीव वाचवण्यासाठी काहीच करू शकत नाही आहेत. झी न्यूजने Al Jazeera चा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसार सीरियाच्या इदलिब प्रांतात स्थलांतरित कॅम्पमध्ये राहणाऱ्या दोन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये अवघ्या सात दिवसांच्या मुलीचा समावेश आहे. फातिमा असं तिचं नाव. हे वाचा - जन्माच्या तिसऱ्या महिन्यापासून लेक करते काम; 14-14 तास ट्रेनिंग देते आई फातिमा इदलिबच्या अल रहमान रुग्णालयात होती. रात्रभरातच तिचा मृत्यू झाला. अल रहमान रुग्णालयाचे डॉक्टर फदी हलाक यांनी सांगितलं, आठवड्याभरापूर्वी याच रुग्णालयात तिचा जन्म झाला. जन्मावेळी ती एकदम ठिक होती. पण आता फातिमाच्या शरीराचा रंग निळा पडला होता. रुग्णालयात पोहोचेपर्यंत तिच्या नाकातोंडातून रक्त वाहू लागलं होतं. वाढलेल्या थंडीमुळे तिची अशी अवस्था झाली आणि तिचा मृत्यू झाला. तिच्या वडिलांनी आपल्या डोळ्यांनी आपल्या मुलीचा मृत्यू पाहिला पण तिच्यासाठी ते काहीच करू शकले नाही. जेव्हा मी तिला स्पर्श केला तेव्हा ती बर्फासारखी झाली होती, असं फातिमाचे वडील मोहम्मद अल-हसन यांनी सांगितलं. हे वाचा - Shocking! पाहता पाहता अचानक जमिनीत सामावला जिवंत तरुण; थरकाप उडवणारा VIDEO गेल्या दशकभरापासून चालू असलेल्या गृहयृद्धामुळे सीरियाई लोकांना आपल्या घरातून पळून अशा विस्थापित शिबिरांमध्ये राहावं लागतं आहे. त्याचा हा भयंकर परिणाम चिमुकल्यांना भोगावा लागतो आहे.