मुंबई, 02 फेब्रुवारी: आज कुछ तुफानी करते है, असा जोश काही लोकांमध्ये असतो. काहीतरी वेगळं आणि हटके करण्यासाठी आपला जीवही ते धोक्यात घालतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. जो पाहताच सर्वांचा थरकाप उडाला आहे. या व्हिडीओच एक जिवंत तरुण अचानक जमिनीत सामावला गेला आहे (Man Swallowed By Tiny Hole).
हा व्हिडीओ पाहताना तुम्हीही जपूनच पाहा. कारण व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या हृदयाची धडधड वाढेल, अंगावर काटा येईल आणि दरदरून घामही फुटेल.व्हिडीओत पाहू शकता सुरुवातीला काही लोक दिसत आहेत. त्यांच्यापैकी एक तरुण जमिनीवर असलेल्या एका छोट्याशा खड्ड्याजवळ उभा राहतो. हा खड्डा किती लहान आहे ते तुम्ही पाहिलंच असेल. पुढच्या क्षणी तरुण जे पाऊल उचलतो ते पाहून तुमच्या काळजाचा ठोकाच चुकेल.
हे वाचा - Smoking सोडण्याचा असाही फायदा! कंगाल तरुणाचं नशीब फळफळलं; आज आहे लखपती
हा तरुण त्या एवढ्याशा खड्ड्यात उतरतो. हळूहळू त्याचं निम्मं शरीर त्या खड्ड्यात जातं. तरुणाला या एवढ्याशा होताच इतकं गेलेलं पाहूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. आता हा तरुण खड्ड्यातून बाहेर येईल असं तुम्हाला वाटेल. पण पुढे जे त्याने केलं ते यापेक्षाही धक्कादायक आहे. हा तरुण त्या खड्ड्यातून बाहेर येत नाही तर खड्ड्याच्या आत जातो. पाहता पाहता अचानक हा तरुण जमिनीच्या आत पूर्णपणे सामावतो.
I used to do caving when I was a mere slip of a lad and I remember one entry pretty much like this except the entrance was also covered in brambles when we arrived. ‘We are going where now?’ pic.twitter.com/gt3BScZalT
— Andrew Flood 👨🏻💻📝🕺 (@andrewflood) February 1, 2022
तो खड्ड्यात जाता आपल्या जीवात जीव राहत नाही. त्या खड्ड्यात असं काही आहे का की ज्याने त्या तरुणाला आत खेचलं असावं किंवा त्यामुळे तो तरुण आत खेचला गेला असावा, याचीच चिंता वाटते. इतक्यात तो तरुण हसत हसत खड्ड्यातून पाहताना दिसतो. तेव्हा कुठे आपल्या जीवात जीव येतो.
हे वाचा - सावधान! या अशा कलरफुल कबुतरांना भुलू नका...; तज्ज्ञांचा इशारा
@stickfigureboy99 या टिकटॉक अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. जो @andrewflood ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. तज्ज्ञांच्या देखरेखीत हा व्हिडीओ बनवण्यात आला आहे. त्यामुळे तुम्ही असे स्टंट करण्याचा प्रयत्न करू नका, असं आवाहनही या व्हिडीओत करण्यात आला आहे. पण फक्त हा व्हिडीओ पाहूनच सर्वांची हवा टाईट झाली आहे त्यामुळे असा स्टंट करण्याची तशीही कुणीच हिंमत करणार नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking, Shocking news, Social media viral, Viral, Viral videos