जाहिरात
मराठी बातम्या / Viral / जन्माच्या तिसऱ्या महिन्यापासून लेक करते काम; 14-14 तास ट्रेनिंग देते आई

जन्माच्या तिसऱ्या महिन्यापासून लेक करते काम; 14-14 तास ट्रेनिंग देते आई

जन्माच्या तिसऱ्या महिन्यापासून लेक करते काम; 14-14 तास ट्रेनिंग देते आई

ज्या वयात तिला काहीच समजत नव्हतं त्या वयापासूनच तिने काम सुरू केलं.

  • -MIN READ
  • Last Updated :

लंडन, 02 जानेवारी :  3 महिन्यांचं बाळ… चालणं, बोलणं दूर, ज्याला काही समजतही नसतं. अशा वयात एक मुलगी चक्क काम करू लागली. जन्मानंतर तिसऱ्या महिन्यापासून एका मुलीने काम सुरू केलं. धक्कादायक म्हणजे तिची आईच तिला यासाठी  14 तास ट्रेनिंगही देते.  ब्रिटनमधील एका महिलेने मुलीच्या जन्मानंतर तिसऱ्या महिन्यापासूनच तिलाकामाला लावलं आहे. एसेक्समध्ये राहणारी निकोल गोल्ड  (Nicole Gold) असं या महिलेचं नाव आहे. तिची मुलगी पेनी जन्म झाल्यानंतर तिसऱ्या महिन्यापासून तिने तिला प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. आठवड्याला 14 तास तिचं प्रशिक्षण असतं. काही महिन्यात तिने जाहिराती, फोटोशूट करायला सुरुवात केली. मिररच्या रिपोर्टनुसार निकोल स्वतः म्युझिकल फेस्टिव्हलमध्ये परफॉर्म करते आणि आपल्या मुलीसाठीही इतक्या कमी वयातच तिने स्वप्नं रंगवली आहेत. फक्त स्वप्नं पाहिली नाही तर ती प्रत्यक्षात साकारण्यासाठी तयारीही सुरू केली आहे. अगदी कमी वयातच लेकीच्या प्रसिद्धीसाठी तिच्या आईची धडपड सुरू आहे (Mother Trains Daughter to be Famous). हे वाचा -  Shocking! पाहता पाहता अचानक जमिनीत सामावला जिवंत तरुण; थरकाप उडवणारा VIDEO निकोल सांगते, तिला शाळेत कधीच परफॉर्म करण्याची संधी मिळाली नाही. मोठी झाल्यानंतर ती परफॉर्मिंग आर्ट्स कोर्समध्ये गेली. त्यामुळे आपल्या सहा वर्षाच्या मुलीसाठी ते सर्वकाही अरेंज कऱण्याचा प्लॅन तिने केला. आपल्या मुलीने गाणं, डान्स आणि अॅक्टिवंग शिकावं असं तिला वाटतं. आठवड्यातील 14 तास ती मुलीला यासंबंधी काही अॅक्टिव्हिटी देते. आतापासून ती जिम्नास्टिक, बॉलरूम डान्स, सर्कस स्कूल आणि परफॉर्मिंग आर्ट्सची ट्रेनिंग घेत आहेत. घरी राहूनच ती अभ्यास करते आणि युट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून हाणं आणि परफॉर्म करण्याचं प्रशिक्षण घेते. आपल्याला जे आवडतं ते आपल्या मुलीलाही आवडतं याचा तिला खूप आनंद आहे, तिच्या मुलीचा सर्वाधिक कल हा अॅक्टिंगकडे आहे.असं निकोल सांगते. हे वाचा -  महिलेनं अशा ठिकाणी केलं शूट ज्याची कल्पनाही करू शकत नाही; थरकाप उडवणारा VIDEO निकोलच्या पॅरेंटिगवर काही लोक प्रश्नही उपस्थित करतात. पण आपण आपल्या मुलीसाठी जे करत आहोत ते योग्यच आहे असं तिला वाटतं.  मुलीचा आनंदही महत्त्वाचा आहे. त्यामुळे तिला मोठं झाल्यानंतर जे बनायचं आहे ते ती बनेल. त्यावेळी तिला वेटनरी डॉक्टर बनावंसं वाटलं तरी मला काही हरकत नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात