JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Skin Care : व्हिटॅमिन सी सीरम त्वचेचे नुकसानही करू शकते! वापरताना या 5 चुका कधीच करू नका

Skin Care : व्हिटॅमिन सी सीरम त्वचेचे नुकसानही करू शकते! वापरताना या 5 चुका कधीच करू नका

आजकाल व्हिटॅमिन सी सीरम वापरण्याचा ट्रेंड वेगाने वाढत आहे. ग्लोइंग स्किनसाठी प्रत्येकजण या सीरमचा वापर करत आहे, परंतु डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय असे करणे धोकादायक ठरू शकते. हे सीरम प्रत्येक प्रकारच्या त्वचेसाठी फायदेशीर नाही. ते वापरण्यापूर्वी त्वचारोग तज्ज्ञांकडून महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या.

जाहिरात

व्हिटॅमिन सी सीरम वापरण्यापूर्वी त्वचारोग तज्ज्ञांकडून महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 जून : प्रत्येकाला दीर्घकाळ सुंदर आणि तरुण दिसण्याची इच्छा असते. यासाठी महिला आणि पुरुष दोघेही विविध प्रकारची स्किन केअर प्रोडक्टस वापरतात. बाजारात अनेक उत्पादने उपलब्ध आहेत, जी त्वचा सुंदर बनवण्याचा दावा करतात. यापैकी एक म्हणजे व्हिटॅमिन सी सीरम. ज्याबद्दल लोक खूप उत्सुक आहेत. अनेकजण ग्लोइंग त्वचेसाठी त्वचेसाठी व्हिटॅमिन सी सीरम वापरत आहे. मात्र बरेच लोक विचार न करता किंवा तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय ते त्वचेवर लावत आहेत. असे करणे त्वचेसाठीही हानिकारक ठरू शकते. आज आम्ही तुम्हाला व्हिटॅमिन सी सीरमच्या अतिवापराचे काय धोके आहेत आणि कोणत्या लोकांनी त्याचा वापर करू नये हे सांगणार आहोत.

Morning Tips : सकाळी उठल्यानंतर आधी करा हे काम, चेहऱ्यावर नेहमी दिसेल नैसर्गिक चमक

गणेश शंकर विद्यार्थी मेमोरियल मेडिकल कॉलेज, कानपूर, यूपी येथील सहाय्यक प्राध्यापक आणि त्वचाविज्ञानी डॉ. युगल राजपूत यांच्या मते, खाण्या-पिण्यातून मिळणारे व्हिटॅमिन सी त्वचा आणि केस सुधारते. व्हिटॅमिन सी एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट आहे, ज्यामुळे आपल्या शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो. या कारणास्तव लोकांना असे वाटते की, व्हिटॅमिन सी सीरम त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. परंतु तसे नाही. या सीरममुळे त्वचेला तात्पुरती चमक येते. परंतु काही काळानंतर त्वचा पूर्वीसारखी होते. हे एक अतिशय सौम्य अँटी-एजिंग एजंट आहे, ज्यामुळे त्वचेला तरुण ठेवणे शक्य होत नाही. हे सिरम त्वचेच्या प्रकारानुसार वापरावे, अन्यथा त्वचेचे खूप नुकसान होऊ शकते.

या 5 चुका कधीही करू नका - त्वचाशास्त्रज्ञांच्या मते, व्हिटॅमिन सी सीरम वेगवेगळ्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये येतात. लोकांनी त्यांच्या त्वचेच्या प्रकारानुसार हे सीरम निवडावे. डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर त्वचेनुसार हे सीरम वापरा. स्वत: कोणतेही सीरम वापरू नका, अन्यथा त्वचेचे नुकसान होण्याचा धोका आहे. - व्हिटॅमिन सी सीरमचा जास्त वापर करू नका, अन्यथा त्वचेला जळजळ होऊ शकते. बहुतेक लोक याचा अतिवापर करतात आणि त्वचेच्या जळजळीबद्दल निष्काळजी असतात. असे केल्याने गंभीर त्रास होऊ शकतो. त्यामुळे सावधगिरीने हे सीरम त्वचेवर लावा. - मुरुमांपासून सुटका मिळवण्यासाठी बरेच लोक या सिरमचा वापर करतात, परंतु हे चुकूनही करू नये. त्वचाविज्ञानी युगल राजपूत म्हणतात की, या सीरमचा वापर केल्याने मुरुम आणि मुरुमांची समस्या वाढू शकते. त्यामुळे चेहरा खराब होऊ शकतो. अशा लोकांनी प्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. - ज्यांची त्वचा तेलकट आहे, त्यांनी हे सिरम वापरू नये. तेलकट त्वचा असलेल्या लोकांच्या त्वचेवर या सीरमचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो आणि त्यांच्या समस्या वाढू शकतात. अशा परिस्थितीत तेलकट त्वचेच्या लोकांनी याचा वापर टाळावा.

Summer Tips : उन्हाळ्यातील अनेक त्रासांवर रामबाण उपाय आहे हे पीठ! शरीराला मिळेल थंडावा

संबंधित बातम्या

- बर्‍याच लोकांची त्वचा अतिशय संवेदनशील असते आणि छोट्या छोट्या गोष्टींचा त्यावर फार लवकर परिणाम होतो. अशा लोकांनी व्हिटॅमिन सी सीरम देखील सावधगिरीने वापरावे. कधीकधी हे सीरम अशा लोकांच्या त्वचेसाठी हानिकारक ठरू शकते. (सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या