JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / दररोज धूम्रपान केल्याने मेंदूवर होतो परिणाम, संशोधकांचा धक्कादायक दावा

दररोज धूम्रपान केल्याने मेंदूवर होतो परिणाम, संशोधकांचा धक्कादायक दावा

धूम्रपानाच्या दुष्परिणामाविषयी आजपर्यंत अनेकवेळा संशोधन झालं आहे. त्यातून या व्यसनाचे धोके स्पष्ट झाले आहे. या संदर्भात एका नवीन संशोधनातून एक धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे.

जाहिरात

दररोज धूम्रपान केल्यानं काय होतं?

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 मे : धूम्रपान, मद्यपान आरोग्यासाठी धोकादायक मानलं जातं. धूम्रपानासारख्या व्यसनामुळे कॅन्सर, हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. धूम्रपानामुळे फुफ्फुसावर प्रतिकूल परिणाम होतो. खरं तर या सर्व गोष्टी माहिती असूनही अनेक लोक नियमित धूम्रपान करतात. सध्याच्या काळात धूम्रपान, मद्यपान ही फॅशन झाली आहे. यामुळे आरोग्य बिघडू शकतं याकडे दुर्लक्ष केलं जाते. धूम्रपानाच्या दुष्परिणामाविषयी आजपर्यंत अनेकवेळा संशोधन झालं आहे. त्यातून या व्यसनाचे धोके स्पष्ट झाले आहे. या संदर्भात एका नवीन संशोधनातून एक धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे. धूम्रपानामुळे मेंदूवर गंभीर दुष्परिणाम होऊ शकतो, असं हे नवीन संशोधन सांगतं. या संशोधनाच्या निष्कर्षासंदर्भात सविस्तर जाणून घेऊया. धूम्रपान हे आरोग्यासाठी धोकादायक आहे, हे आपण जाणतो. या व्यसनामुळे अनेक गंभीर आजार होऊ शकतात. यामुळे फुफ्फुसावर गंभीर परिणाम होतो. पण आता या संदर्भात नव्याने संशोधन करण्यात आले आहे. धूम्रपानामुळे मेंदू डॅमेज होऊ शकतो. रोज धूम्रपान केलं असता मेंदूचा आकार लहान होऊ शकतो, असं संशोधनातून दिसून आले आहे. त्यामुळे तातडीने धूम्रपान थांबवणं गरजेचे आहे. Cancer Symptoms : खांद्यांमधील वेदनेकडे करू नका दुर्लक्ष, लंग कॅन्सरचे असू शकते लक्षण   धूम्रपान कायमचे सोडण्यासाठी मेंदू आणि शरीराला सिगारेटशिवाय जगण्याची सवय लावणं आवश्यक आहे. यासाठी तुम्ही निकोटिन पॅचेसचा वापर करू शकता. धूम्रपान सोडण्याच्या कारणांची यादी तयार करू शकता. यासाठी नियमित व्यायाम करणं फायदेशीर ठरतं. धूम्रपानसाठीचे ट्रिगर्स कोणते हे शोधून ते टाळण्याचा प्रयत्न करू शकता. सिगारेट ओढण्याची तल्लफ दूर ठेवण्यासाठी स्वतःला कामात गुंतवून ठेवणं गरजेचं आहे. नवीन संशोधनानुसार, रोज धूम्रपान करणाऱ्यांचा मेंदू कधीही धूम्रपान न करणाऱ्यांपेक्षा 0.4 क्युबिक इंच लहान असतो. यासाठी संशोधकांनी यूके बायोबँकमधील लोकांच्या मेंदूच्या स्कॅनचे आणि त्यांच्या धूम्रपानाच्या सवयीचे विश्लेषण केलं. या संशोधनात सहभागींचे 2006 ते 2010 आणि 2012 ते 2013 दरम्यान सर्वेक्षण केले गेले. दुसऱ्या टप्प्यात त्यांचा एमआरआय करण्यात आला. ज्या लोकांनी कधीही धूम्रपान केलेलं नाही त्यांच्या मेंदूचा आकार सामान्य असल्याचे एमआरआय चाचणीतून दिसून आले. या चाचणीत धूम्रपान करणाऱ्यांच्या मेंदूचा ग्रे भाग 0.3 क्युबिक इंच तर व्हाइट भाग 0.1 क्युबिक इंच कमी झाल्याचे दिसून आले. भाजी समजले जाणारे हे ‘फळ’ मजबूत करते रोगप्रतिकारशक्ती, घेते हृदयाची काळजी   मेंदूचा ग्रे भाग भावना, स्मरणशक्तीत महत्त्वाची भूमिका बजावतो. तर पांढरा भाग माहिती हस्तांतरणाचे काम करतो. सततच्या धूम्रपानामुळे मेंदूच्या संकुचिततेवर तीव्र परिणाम झाल्याचे दिसून आले. पण ज्यांनी ही सवय सोडली त्यांच्या मेंदूच्या वस्तुमानात उलटी घट झाली. धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तींच्या मेंदूतील ग्रे भागात 0.005 क्युबिक इंचाने वाढ होते, असं मेडरिस्कच्या संशोधनात दिसून आले. अद्याप समवयस्क व्यक्तींचे यासंदर्भात पुनरावलोकन करण्यात आलेले नाही. दरम्यान, सेलेब्रल अ‍ॅट्रॉफी अर्थात मेंदू संकुचित होणं ही क्रिया वयापरत्वे होत असते. त्याची काही लक्षणं रुग्णामध्ये दिसून येतात. यात स्नायूंवरील नियंत्रण जाणं, दृष्टी अंधूक होणं, दिशाहिनता, स्नायू अशक्त होणं, अल्झायमर विकार होणं, समन्वयाचा अभाव या लक्षणांचा समावेश आहे. त्यामुळे धूम्रपानाचे व्यसन सोडणे गरजेचं आहे. यामुळे मेंदूशी संबंधित विकारांचा धोका कमी होऊ शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या