मुंबई, 14 मे : कॅन्सरचे नाव घेताच अनेकजण खूप घाबरतात. शरीरात अचानक काहीतरी घडल्यासारखे वाटू लागते. विज्ञान खूप पुढे गेलेले असले तरी अद्याप कर्करोगावर एक प्रभावी इलाज सापडलेला नाही. मात्र कर्करोग वेळीच ओळखला गेलं तर त्यावर उपचार होऊ शकतात. आपले शरीर अशी अनेक लक्षणे दाखवते, जी कर्करोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यात ओळखता येतात. मात्र लोक सहसा अशा प्रकारच्या सिग्नलकडे दुर्लक्ष करतात आणि नंतर कर्करोग त्यांना अंतिम टप्प्यात घेऊन जातो. WHO च्या म्हणण्यानुसार 2020 मध्ये कर्करोगाने एक कोटी लोकांचा मृत्यू झाला होता. बहुतेक प्रकरणांमध्ये स्तनाच्या कर्करोगामुळे मृत्यू होतो. यानंतर फुफ्फुसाचा कर्करोग दुसऱ्या क्रमांकावर येतो. फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे दरवर्षी 22 लाख लोकांचा मृत्यू होतो. सिगारेट, दारू, तंबाखू, गुटखा इत्यादी फुफ्फुसाच्या कर्करोगास प्रामुख्याने कारणीभूत आहेत. आज आम्ही तुम्हाला या लंग कॅन्सर म्हणजेच फुफ्फुसाच्या कर्करोगाची काय लक्षणं असतात, याबद्दल माहिती देत आहोत. यामध्ये सर्वात महत्त्वाचं लक्षणं असतं ते म्हणजे खांदेदुखी अनेक लोक त्यांच्या खांद्याच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र ही प्रत्येकवेळी सामान्य समस्या नसते. खांद्यामध्ये सतत दुखणे हे कर्करोगासारख्या धोकादायक आजाराचे लक्षण असू शकते. एबीपी माझ्यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, तुमच्या खांद्यामध्ये सतत दुखत असेल तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. कारण ही लक्षणे फुफ्फुसाच्या कर्करोगाची असू शकतात. वास्तविक फुफ्फुसाचा कर्करोग हाडांवर परिणाम करतो. यामध्ये खांद्याच्या हाडांवरही परिणाम होतो. पॅनकोस्ट ट्यूमर हा फुफ्फुसाच्या कर्करोगाचा एक प्रकार आहे. हे फुफ्फुसाच्या वरच्या भागात वाढते आणि खांद्याजवळील ऊतींवर हल्ला करते. त्यामुळे खांदे दुखू लागतात. खांद्यांमध्ये कशा वेदना होतात? फुफ्फुसाचा कर्करोगा झाला असल्यास खांद्याचे दुखणे हे संधिवात दुखण्यासारखे वाटते. खांद्यांमधील वेदना रात्री अधिक तीव्र होते. तुम्ही कोणताही व्यायाम केला नसेल आणि खांद्यांमध्ये वेदना होतील असे कोणतेही काम केले नसेल. मात्र तरीही तुम्हाला वेदना होत असतील तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. कारण ते कर्करोगाचे लक्षण असू शकते. फुफ्फुसाच्या कर्करोगाची लक्षणे - आवाज जड होणे. - जास्त तहान लागणे. - वारंवार लघवी होणे. - फुफ्फुसाचा कर्करोग शरीराच्या इतर भागात पसरतो, त्यामुळे शरीरात जळजळ होते. - छाती जड होणे. - वजन कमी होणे. - अशक्तपणा - हात सुन्न होणे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.