JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / काय? Pizza, Burger मध्ये Detergent? Junk food खाताना सावध राहा

काय? Pizza, Burger मध्ये Detergent? Junk food खाताना सावध राहा

Detergents in Pizza-Burger : प्रसिद्ध कंपन्यांच्या पिझ्झा, बर्गरमध्ये संशोधकांना सापडलं डिटर्जंटमध्येवापरलं जाणारं घातक केमिकल.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वॉशिंग्टन, 29 ऑक्टोबर : पिझ्झा (Pizza), बर्गर (Burger) म्हटलं तरी कित्येकांच्या तोंडाला पाणी सुटते. काही जणांना हे फूड इतकं आवडतं की त्यांना ते दररोज दिलं तरी ते खातील किंबहुना काही जणांचं तर नाश्ता, जेवणही हेच असतं. पण आता हे पदार्थ खाताना जरा सावधच राहा. भूक भागवण्यासाठी असो किंवा जिभेचे चोचले पुरवण्यासाठी तुम्ही चवीने खात असलेल्या या जंक फूडमध्ये (Junk food) डिटर्जंट (Detergent in pizza burger) असल्याचा दावा केला जातो आहे. पिझ्झा आणि बर्गरबाबत संशोधकांनी अभ्यास केला. या पदार्थांमध्ये घातक केमिकल सापडलं आहे. ज्यामुळे अनेक गंभीर आजार होऊ शकतात. हे केमिकल डिटर्जंटमध्ये वापरलं जातं. डेली मेल च्या रिपोर्टनुसार जॉर्ज वाशिंग्टन युनिव्हर्सिटी, साउथवेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट (सॅन एंटोनियो, टेक्सास), बोस्टन यूनिव्हर्सिटी आणि हार्वर्ड यूनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी हा अभ्यास केला.  जर्नल ऑफ एक्सपोजर साइन्स अँट एनव्हायरनमेंटल एपिडेमियोलॉजी मध्ये हे संशोधन प्रकाशित करण्यात आलं आहे. हे वाचा -  लिंबू-पाणी प्यायल्याने किडनी खराब होते? शरीरावर नेमके काय होतात परिणाम वाचा सर्व संशोधन अहवालात म्हटल्यानुसार मॅकडोनाल्डस (McDonald’s), डोमिनोज (Domino’s), पिझ्झा हट (Pizza Hut), बर्गर किंग (Burger King), टॅको बेल, चिपोटल अशा नामांकित कंपन्यांच्या जंक फूड्समध्ये घाक केमिकल सापडलं आहे. संशोधनकांनी या कंपन्यांच्या हॅमबर्गर, फ्राइझ, चिकन नगेट्स, चिकन बुरिटोस आणि पनीर पिझ्झाचे 64 फूड सॅम्पल तपासले. 80% पेक्षा अधिक खाद्यपदार्थांमध्ये DnBP फेथलेट (Phthalate) आणि 70% मध्ये DEHP फेथलेट होतं. हे दोन्ही केमिकल घातक आहेत. संशोधकांनी सांगितलं की, फेथलेट असं रसायन आहे, ज्याचा उपयोग सौंदर्य प्रसाधनं, व्हिनाइल फर्श, डिटर्जंट, डिस्पोजेबल हँडग्लोव्ह्ज, वायर कव्हर यामध्ये केला जातो. हे रसायन प्लॅस्टिक नरम ठेवण्यात मदत करतं. या रसायनांमुळे अस्थमा, लहान मुलांना मेंदूच्या समस्या, प्रजनन क्षमतेवर परिणामही होऊ शकतो. हे वाचा -  भेटा LIVER KING ला! 20 वर्षांपासून जगतोय आदिमानवासारखं जीवन, खातो कच्चं मांस हे सर्व नमुने एकाच शहरातील आहेत. वेगवेगळ्या रेस्टॉरंटनुसार हे विश्लेषण नाही, हे संशोधकांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान या संशोधनाची समीक्षा करणार असल्याचं अन्न आणि औषध (एफडीए) प्रशासनाने सांगितलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या