मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

भेटा LIVER KING ला! 20 वर्षांपासून जगतोय आदिमानवासारखं जीवन, खातो कच्चं मांस, पाहा VIDEO

भेटा LIVER KING ला! 20 वर्षांपासून जगतोय आदिमानवासारखं जीवन, खातो कच्चं मांस, पाहा VIDEO

शहरी जीवनशैलीला वैतागून एका अवलियानं जंगलात (Man lives in jungle for last 20 years) राहण्याचा निर्णय घेतला आणि त्याचं आय़ुष्यच बदलून गेलं.

शहरी जीवनशैलीला वैतागून एका अवलियानं जंगलात (Man lives in jungle for last 20 years) राहण्याचा निर्णय घेतला आणि त्याचं आय़ुष्यच बदलून गेलं.

शहरी जीवनशैलीला वैतागून एका अवलियानं जंगलात (Man lives in jungle for last 20 years) राहण्याचा निर्णय घेतला आणि त्याचं आय़ुष्यच बदलून गेलं.

  • Published by:  desk news

शहरी जीवनशैलीला वैतागून एका अवलियानं जंगलात (Man lives in jungle for last 20 years) राहण्याचा निर्णय घेतला आणि त्याचं आय़ुष्यच बदलून गेलं. शहरातील खराब हवा, फास्टफूड आणि दगदगीचं आयुष्य (unhealthy urban lifestyle) यांना वैतागून त्यानं निसर्गाकडे धाव घेतली आणि जंगलांत राहायला सुरुवात केली. त्यामुळे त्याच्या शारीरिक अवस्थेत फरक तर पडलाच, शिवाय त्याचं मानसिक (Physical and mental fitness) आरोग्यही कमालीचं सुधारलं.

खातो कच्च मांस

शहरात राहून आपण खात असलेलं फास्ट फूड, तेलकट पदार्थ आणि इतर गोष्टींमुळे ब्रायन जॉन्सनची तत बिघडू लागली होती. त्याला वीस वर्षांपूर्वी श्वसनाशी संबंधित काही आजारही जडले आणि त्यासाठी रुग्णालयात दाखल करावं लागलं. त्यानंतर मात्र त्याने निसर्गाकडे धाव घेण्याचा निर्णय घेतला आणि आणि तो चक्क जंगलात जाऊन राहू लागला.

केला आदिमानवाचा अभ्यास

आदिमानव जेव्हा जंगलात राहत होता, तेव्हा त्याची जीवनशैली कशी होती, याचा ब्रायननं अभ्यास केला आणि आपणही तसंच आयुष्य जगण्याचा संकल्प केला. आपल्या कुटुंबासह जंगात राहून त्यानं कच्चं मांस आणि फळं खायला सुरुवात केली. त्यानंतर काही महिन्यांतच त्याला स्वतःच्या तब्येतीत फऱक जाणवू लागला.

ब्रायन बनला ‘लिव्हर किंग’

ब्रायन आता रोजच्या आहारात प्राण्यांची यकृतं खातो. त्यामुळे त्याची ओळख लिव्हर मॅन अशी झाली आहे. याशिवाय तो प्राण्यांचे बोन मॅरो, टेस्टिकल्स यासारखे अवयवदेखील फस्त करतो. इतर वेळेला तो जंगलात मिळणारी फळं खातो. याशिवाय तो जोरदार व्यायामही करतो. यामुळे ब्रायनचं शरीर बळकट झालं असून त्याचा फिटनेस कमालीचा आहे. उत्तम आहार आणि भरपूर व्यायाम यासोबत तो भरपूर झोपही घेतो. पूर्वजांप्रमाणे आयुष्य जगण्यात एक वेगळीच मौज असल्याचं त्याचं म्हणणं आहे.

हे वाचा- Multibagger Stock : 'या' स्टॉकमुळे वर्षभरात 1 लाखाचे 1.71 कोटी

20 वर्षं जंगलात

20 वर्षं जंगलात घालवल्यानंतर आता त्यानं ऍन्सेस्ट्रल लाईफस्टाईल ही कंपनी सुरु केली आहे. लोकांना पूर्वीसारखी लाईफस्टाईल कशी जगावी, याचे धडे तो त्यातून देतो.

First published:

Tags: Fitness, Food, Lifestyle