जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / Lemon Water : लिंबू-पाणी प्यायल्याने किडनी खराब होते? शरीरावर नेमके काय होतात परिणाम वाचा सर्व

Lemon Water : लिंबू-पाणी प्यायल्याने किडनी खराब होते? शरीरावर नेमके काय होतात परिणाम वाचा सर्व

Lemon Water : लिंबू-पाणी प्यायल्याने किडनी खराब होते? शरीरावर नेमके काय होतात परिणाम वाचा सर्व

लिंबामध्ये ‘क’ जीवनसत्त्व (व्हिटॅमिन सी - Vitamin C) असतं. ते शरीरात कॅल्शियम शोषण्याची प्रक्रिया सुधारतं. हाडांची घनता म्हणजेच मजबूती राखण्यासाठी हे आवश्यक आहे. पण किडनीचे आजार असलेल्यांनी लिंबू पाणी प्यावं का, असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर : सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात लिंबू पिळून पिणं हा अनेकांच्या रोजच्या दिनक्रमाचा भाग असतो. लिंबामध्ये ‘क’ जीवनसत्त्व (व्हिटॅमिन सी - Vitamin C) असतं. ते शरीरात कॅल्शियम शोषण्याची प्रक्रिया सुधारतं. हाडांची घनता म्हणजेच मजबूती राखण्यासाठी हे आवश्यक आहे. पण किडनीचे आजार असलेल्यांनी लिंबू पाणी प्यावं का, असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. मूत्रपिंडाशी (किडनी - Kidney) संबंधित समस्या असलेल्या रुग्णांवर काय होतो परिणाम ? लिंबू पाण्यात (Lemon Water) व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि सायट्रिक अ‌ॅसिड भरपूर प्रमाणात असतं. ते मूत्रपिंडाचे दीर्घकालीन आजार असलेल्या रुग्णांनाही घेता येतं. मूत्रपिंड रक्तातील विषारी पदार्थ काढून बाहेर टाकण्याचं काम करतं. यासोबतच रक्तदाब नियंत्रित करणं, हाडांचं आरोग्य नियंत्रित करणं तसंच, क्रिएटिनिन आणि युरिक अ‌ॅसिडसारख्या रसायनांची पातळी नियंत्रित करणं हे देखील काम मूत्रपिंड करतं. क्रॉनिक किडनी डिसीज (Chronic kidney disease) ही अशी स्थिती आहे ,ज्यामध्ये मूत्रपिंड रक्त शुद्धीकरण किंवा रक्तातील अपायकारक पदार्थ काढून टाकण्याचं काम (फिल्टर - Filter - गाळणे) पूर्ण ताकदीनं करू शकत नाही. त्यामुळं रक्तात विषारी आणि टाकाऊ पदार्थ तसेच राहतात किंवा ते जमा होण्याचं प्रमाण वाढतं. हे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक असू शकतं आणि यामुळं स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. लिंबू पाणी प्यायल्यानं क्रिएटिनिन (Creatinine) कमी होते का? लिंबू पाणी प्यायल्यानं क्रिएटिनिनची पातळी कमी होत नाही, पण ती वाढतही नाही. क्रिएटिनिन शरीरात तयार होणारा अपायकारक पदार्थ किंवा कचरा उत्पादन आहे. स्त्रियांमध्ये, क्रिएटिनिनची पातळी सामान्यतः 95 मिली प्रतिमिनिट पर्यंत असते. तर पुरुषांमध्ये ते 120 मि.ली.पर्यंत असते. हे वाचा -  LIC ची जबरदस्त पॉलिसी; फक्त एकदा प्रीमियम भरा आणि निवृत्तीनंतर पेन्शन मिळवा शरीरातील क्रिएटिनिन क्लिअरन्सवर (creatinine clearance) मूत्रपिंडं कसं कार्य करतात, हे तुमचं वय, वजन आणि मूत्रपिंडाची स्थिती यावर अवलंबून असतं. लिंबू पाणी प्यायल्याने क्रिएटिनिनची पातळी वाढत नाही किंवा कमी होत नाही. मूत्रपिंडाचा आजार तीव्र असलेल्या रुग्णांना लिंबूपाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. परंतु, ते जास्त प्रमाणात पिऊ नका. जास्त प्रमाणात लिंबू पाणी किंवा लिंबाचा रस प्यायल्याने मळमळ, चक्कर येणे, जुलाब आणि उलट्या होऊ शकतात. कारण याच्यामुळं लघवीचं प्रमाण वाढतं. वारंवार लघवीला गेल्यामुळं शरीरातून द्रव काढून बाहेर टाकला जातो. यामुळं डिहायड्रेशनचा (Dehydration - शरीरातील पाण्याची पातळी कमी होणं) त्रास होऊ शकतो. हे वाचा -  Puneeth Rajkumar Dies: साऊथच्या सुपरस्टार पुनीत राजकुमार यांचं Heart Attack नं निधन, 46 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास लिंबू पाणी पिण्याची योग्य वेळ लिंबूपाणी पिण्याची अशी काही निश्चित वेळ नाही. तथापि, सकाळी ते प्यायल्यानं तुम्हाला सर्वांत जास्त फायदा होईल. कारण, ते शरीरात अल्कधर्मी वातावरण तयार करते. जेव्हा तुम्ही झोपेतून उठता तेव्हा शरीर स्वतःला डिटॉक्सिफाय करते. जर तुम्ही काही अल्कलाईन घेतले तर, ते pH संतुलन राखण्यास मदत करते. अधिक फायदे मिळवण्यासाठी आले आणि मध घालून लिंबू पाणी पिऊ शकता. त्यात अँटिऑक्सिडेंट आणि अँटीमाइक्रोबियल गुणधर्म आहेत, जे किडनीच्या कार्यासाठी उपयुक्त आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात