JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / काळ्या मसाल्याचे 'सम्राट', 45 वर्षांपासून नगरकरांना करत आहेत तृप्त, Video

काळ्या मसाल्याचे 'सम्राट', 45 वर्षांपासून नगरकरांना करत आहेत तृप्त, Video

अहमदनगरची खाद्य संस्कृती काळ्या मसाल्यातील जेवणासाठी ओळखली जाते. 45 वर्षांपूर्वी शामराव धनवडे यांनी सुरु केलेले काळ्या मसाल्यातील जेवण प्रसिद्ध आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

प्रियांका शेळके, प्रतिनिधी अहमदनगर, 9 फेब्रुवारी: आजकाल रोजच घरचं खाऊन कंटाळा आला किंवा एखादा कार्यक्रम, बर्थडे पार्टी वगैरे अशा कारणास्तव जेवायला बाहेर जाणं होतंच. खाण्या-पिण्याच्या बाबतीत प्रत्येकाची आवड - निवड ही वेगळी असते. कुणाला गोड आवडतं, कुणाला तिखट तर कुणाला साधं जेवण आवडतं. आपल्याकडे प्रत्येक भागाची एक वेगळी अशी खाद्य संस्कृती आहे. अहमदनगर जिल्ह्याची खाद्य संस्कृती काळ्या मसाल्यासाठी प्रसिद्ध आहे. याच काळ्या मसाल्याची चव गेल्या 45 वर्षांपासून खाद्य प्रेमींना एकाच ठिकाणी चाखायला मिळत आहे. अहमदनगरचे धनवडे कुटूंब ही परंपरा जोपासत आहे.

घरगुती मसल्यातून काळा मसाला अहमदनगरमधील शामराव धनवडे हे 45 वर्षांपूर्वी खानावळ चालवत होते. घरगुती वापरल्या जाणाऱ्या मसाल्याच्या पदार्थांतूनच ते काळा मसाला बनवत होते. खानावळीत ते घरातच तयार केलेला काळा मसाला वापरत असत. खानावळीतील मांसाहारी पदार्थांची चव लोकांना आवडायला लागली. त्यामुळे खानावळीत खाद्य प्रेमींची गर्दी वाढू लागली. खानावलीत मुलगा बबन धनवडे हे ही मदत करत होते.

Ahmednagar : रोजच्या जेवणात येईल खास चव, पाहा फेमस शिपी आमटीचा Recipe Video

तिसऱ्या पिढीची परंपरा

पुढे बबन यांनी खानावळीचे रुपांतर ‘सम्राट’ या छोट्याशा हॉटेलमध्ये केले. आई-वडिलांकडून ते काळ्या मसाल्यातील जेवण बनवायला शिकले होते. त्यांनी बनवलेल्या काळ्या मसाल्यातील डिशना लोकांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला आणि जामखेड - नगर रोडला असणारे सम्राट हॉटेल काळ्या मसाल्यातील जेवणासाठी प्रसिद्ध झाले. आता उच्चशिक्षित मुलगा शुभम हाही परंपरागत व्यवसायात उतरला आहे. त्यामुळे धनवडे कुटुंबातील तिसरी पिढी काळ्या मसाल्यातील जेवण बनवत आहे. आता शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारचे जेवण काळ्या मसाल्याचा वापर करून बनवले जात आहे.

Famous Gulab Jamun : उस्मानाबादचा फेमस गुलाबजाम खाल्ला आहे? पाहताक्षणीच पडाल प्रेमात Video

संबंधित बातम्या

मटन थाळी प्रसिद्ध

धनवडे कुटुंबाच्या हॉटेलची फेमस डिश काळा मसाल्या पासून बनवलेली मटण थाळी ही आहे. या थाळीमध्ये सुक्क मटण, ग्रेव्ही, काळा मसाल्याचे मटन, पिवळ सूप, काळा मसाल्याची अंडा करी, बिर्याणी, चुलीवरची गरमागरम बाजरीची भाकरी आणि सलाड असा या मटन थाळीचा थाट असतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या