मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Ahmednagar : रोजच्या जेवणात येईल खास चव, पाहा फेमस शिपी आमटीचा Recipe Video

Ahmednagar : रोजच्या जेवणात येईल खास चव, पाहा फेमस शिपी आमटीचा Recipe Video

X
Karjat

Karjat famous shipi amti

Shipi Aamti Recipe Video : अनेकवेळा असंही होतं की घरात भाजीसाठी काहीच नाही. अशावेळी शिपी आमटी हा भाजीचा उत्तम पर्याय आहे.

 • News18 Lokmat
 • Last Updated :
 • Ahmadnagar (Ahmednagar), India

  अहमदनगर, 29 जानेवारी : नेहमी त्याच त्या चवीच्या भाज्या खाऊन कंटाळा येतो. अनेक वेळा असंही होतं की घरात भाजीसाठी काहीच नाही. अशावेळी नक्की कशाची भाजी करावी असा अनेकांना प्रश्न पडतो. अशावेळी तुम्ही अहमदनगर  जिल्ह्यालील कर्जतची फेमस असणारी शिपी आमटीची रेसिपी ट्राय करू शकता. 

  झणकेबाज बनणारी आमटी सर्वांनाच आवडते. अगदी गावरान पद्धतीने झणझणीत शिपी आमटी बनवली जाते. नगरच्या पूजा नवले यांनी खास कर्जतची शिपी आमटी तयार केली आहे. कर्जतची शिपी आमटी ही सर्वत्र फेमस आहे. अनेकजण शिपी आमटी खाण्यासाठी खास कर्जतला येतात.

  अशी करा आमटी

  सर्वात आधी तूर, मूग आणि मसूर या  डाळी सम प्रमाणात एकत्र करून व्यवस्थितपणे शिजवून घ्या, नंतर खोबरे, धने, गरम मसाला, कांदा हे सर्व भाजून घ्यावे, याचं चांगलं वाटण करून घ्या, आलं लसणाची पेस्ट तयार करा, धना पावडर, हळद, मीठ, लाल तिखट आणि घरगुती पद्धतीने बनवलेला मसाला, खानदेशी मसाला, पाणी, कोथिंबीर या पदार्थाची भाजीसाठी गरज आहे.

  मित्राचा ऐकला सल्ला आणि कोल्हापूरकरांना मिळाला 'लय भारी' पदार्थ, Video

  सर्वात आधी कढईत तेल चांगलं तापवून घ्यायचं, तेल चांगलं तापल्यानंतर त्यात जिरे टाकायचे, नंतर कढीपत्ता तेजपत्ता टाका, त्यानंतर आले लसणाची पेस्ट चांगली परतून घ्या, काळ्या मसाल्याचे वाटण, त्यानंतर सर्व मसाले हे सर्व एकत्र करून चांगले परतून घ्या, पुढे यात आवश्यकतेनुसार पाणी टाका, शिजवलेल्या तिन्ही डाळी एकत्र करून डाळी मिक्स करा, गरजेनुसार पाणी टाकून त्याला चांगलं हलवून घ्या, चवीनुसार मीठ टाका, आमटी चांगली उकळू द्या, मंद आचेवर थोडा वेळ ठेवून वरून बारीक केलेली कोथिंबीर टाका, आमटी तयार होईल.

  स्वादानेच मन तृप्त

  शिपी आमटीच्या खमंग स्वादानेच मन तृप्त होतं. ही आमटी तुम्ही चपाती सोबत खाऊ शकता. याच्यासोबत खारे शेंगदाणे असतील तर भारीच. शिपी आमटीची रेसिपी आवडली असल्यास तुम्ही देखील नक्की ट्राय करून पाहा.

  First published:

  Tags: Ahmednagar, Local18, Local18 food