मुंबई, 20 फेब्रुवारी : प्रजनन आणि गर्भधारणेशी संबंधित समस्या ब्रेस्ट कॅन्सर म्हणजेच स्तनांचा कर्करोग असलेल्या तरुण महिला (40 वर्षांपेक्षा कमी वयाच्या) रुग्णांशी अत्यंत जवळून निगडीत आहेत. गर्भधारणेशी संबंधित कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सरनंतरची गर्भधारणा (बीसी) हे दोन, भारतातील अत्यंत समर्पक विषय आहेत. आपल्याकडे वयाच्या तिशीत आणि चाळीशीत असलेल्या स्त्रियांना ब्रेस्ट कॅन्सर होण्याचं प्रमाण जास्त आहे. कॅन्सरचा हा प्रकार प्रजननक्षम वयोगटातील स्त्रियांमध्ये आढळणारा सर्वांत सामान्य प्रकार आहे. डॉ. नीति रायजादा, संचालक - मेडिकल ऑन्कॉलॉजी आणि हेमॅटो-ऑन्कॉलॉजी, फोर्टिस ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स, रिचमंड रोड, बेंगळुरू. यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
आई होण्यासाठी आदर्श वय कोणतं असतं? जाणून घ्या आयुर्वेदिक स्त्रीरोगतज्ज्ञांकडून1. गर्भधारणेशी संबंधित ब्रेस्ट कॅन्सरचं निदान गर्भधारणेदरम्यान आणि प्रसूतीनंतरच्या एक वर्षाच्या आत होतं. ब्रेस्ट कॅन्सर हा गर्भधारणेदरम्यान निदान झालेला सर्वात सामान्य घातक आजार आहे. सुमारे तीन हजार ते 10 हजार गर्भधारणांपैकी एका केसमध्ये ब्रेस्ट कॅन्सरमुळे गुंतागुंत वाढते. जेव्हा आपण गर्भधारणेतील कॅन्सरचं मूल्यमापन करत असतो, तेव्हा आई आणि गर्भाच्या आरोग्याचा विचार केला पाहिजे. ब्रेस्ट कॅन्सर हा गरोदर आणि गरोदर नसलेल्या स्त्रियांमध्ये सारखाच असतो. पण, गरोदर स्त्रियांमधील ब्रेस्ट कॅन्सर अधिक आक्रमक असतो. गरोदरपणात स्तनांमध्ये बदल होत असतात. त्यामुळे स्तनांमध्ये एकाचवेळी होणाऱ्या अनेक बदलांमुळे ब्रेस्ट कॅन्सरचं निदान होण्यास अनेकदा उशीर होतो.
साधारणपणे, रुग्ण सुरक्षितपणे बाळाला जन्म देईपर्यंत फेटल-सेफ उपचार देणं आणि त्यानंतर पुढील उपचार सुरू ठेवणं, हा अशा रुग्णांना उपचार देतानाचा हेतू असतो. गर्भधारणेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत ब्रेस्ट कॅन्सरची शस्त्रक्रिया केली जाऊ शकते. याच काळात केमोथेरेपी करता येऊ शकते. पण, बहुतेक डॉक्टर गरोदर स्त्रियांना केमोथेरेपी देण्याचं टाळतात. कारण, रेडिएशन्स, हार्मोन्समधील बदल आणि स्कॅनमुळे गर्भाला हानी पोहोचण्याचा धोका असतो. 2) तरुणपणी ब्रेस्ट कॅन्सर झाला तरीही त्यातून बाहेर पडल्यावर तरुण महिलेला गर्भधारणा होऊ शकते. ब्रेस्ट कॅन्सरमधून बऱ्या झालेल्या स्त्रियांची सुरक्षित गर्भधारणा झाल्याबद्दल पुरेसे आश्वासक पुरावेदेखील उपलब्ध आहेत. रुग्णांची आई होण्याची इच्छा, हा त्यांच्या सर्व्हायव्हरशिप केअर योजनेचा नेहमीच महत्त्वाचा घटक मानला जातो किंबहुना तो मानला पाहिजे. ब्रेस्ट कॅन्सरच्या विविध उपचारांमुळे आणि आजाराच्या परिणामांमुळे सामान्य महिलांच्या तुलनेत कॅन्सरमधून बऱ्या झालेल्या महिलांना गर्भधारणा होण्याची शक्यता काही प्रमाणात कमी असते. पण, यामुळे बाळाला जन्मजात विकृती होण्याच्या शक्यतेत वाढ झालेली नाही आणि मातृ सुरक्षादेखील प्रभावित होत नाही, ही जमेची बाजू लक्षात घेतली पाहिजे. अशा स्त्रियांमधील इस्ट्रोजेन पॉझिटिव्ही आणि कॅन्सरच्या पुनरावृत्तीबद्दल (उपचारांदरम्यान काही धोकादायक पेशी दडून बसतात आणि कालांतरानं पुन्हा सक्रीय होतात) काही वाद आहेत पण, ते अद्याप सिद्ध झालेले नाहीत. ब्रेस्ट कॅन्सरमधून बरं झाल्यानंतर गर्भधारणेची योग्य वेळ सांगणं, हा क्लिनिकल प्रॅक्टिसमधील एक आव्हानात्मक प्रश्न आहे. काही लहान अभ्यास हे, ईआर प्लस ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झाल्यानंतर सहा किंवा 12 महिन्यांच्या आत गर्भधारणा झालेल्या रुग्णांमध्ये कॅन्सरची पुनरावृत्ती होण्याचा धोका दर्शवितात. म्हणून, सामान्यपणे गर्भधारणेनंतर ब्रेस्ट कॅन्सरच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील उपचारांना सुमारे दोन वर्षांचा विलंब होऊ शकतो. तिसऱ्या स्टेजमधील उपचारांसाठी सुमारे पाच वर्षे विलंब करण्याची शिफारस केली जाते. चौथी स्टेज अनेकदा टाळली जाते. असं असलं तरी, रुग्णाचं वय, पुनरावृत्ती होण्याचा धोका, अॅडज्युव्हन्ट थेरेपी आणि गर्भाशयातील अंड्यांची संख्या या बाबी विचारात घेऊन वैयक्तिक निर्णय घेणं अधिक शहाणपणाचं आहे. 3) उपचार किंवा ऑन्कॉलॉजीकल परिस्थितीचा परिणाम म्हणून वंध्यत्व उद्भवू शकतं. अलीकडच्या काळात ऑन्कॉलॉजी आणि प्रजनन प्रकरणांच्या व्यवस्थापनामध्ये समांतर आणि सतत सुधारणा झाल्यामुळे कॅन्सरवर उपचार घेत असलेल्या रुग्णांमधील प्रजनन क्षमता टिकवून ठेवण्यात मोठ्या प्रमाणात यश आलं आहे. औषधं किंवा डोस-रिलेटेड इफेक्ट आणि वयावर अवलंबून असलेल्या परिणामांद्वारे केमोथेरपी ही रुग्णाच्या प्रजननक्षमतेवर परिणाम करू शकते. ओटीपोटावरील रेडिएशन (डोस डिपेंडन्ट) अंडाशयावर परिणाम करू शकतं आणि प्रजननक्षमतेमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. ओटीपोटावरील शस्त्रक्रियेमुळेदेखील प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. प्रेग्नन्सीतील मॉर्निंग सिकनेस ठरू शकते अशक्तपणाचे कारण! या उपायांनी मिळेल आराम डेफिनिटीव्ह अँटी-कॅन्सर थेरेपी सुरू करण्यापूर्वी, स्त्रियांमध्ये प्रजनन क्षमता टिकवण्यासाठी खालील उपचार पद्धतींची शिफारस केली जाते: 1. एम्ब्रियो (भ्रूण) क्रायोप्रिझर्व्हेशन (सुस्थापित उपचार) 2. अंडाशयाच्या ऊतींचे प्रिझर्व्हेशन 3. ओव्हम (बीजांड) प्रिझर्व्हेशन GnRH अॅनालॉग्सद्वारे अंडाशयासंबंधी चक्र दडपून टाकतात आणि त्यामुळे तात्पुरता मेनोपॉझ निर्माण होतो. 5. ओव्हरियन ट्रान्सपोर्टेशन (ऑफोरपेक्सी) अलीकडच्या काळात तरुणांमध्ये कॅन्सरच्या वाढत्या निदानामुळे, बहुतेक रुग्ण आणि जोडप्यांच्या परस्परसंवादात ‘जननक्षमता’ हा एक महत्त्वाचा घटक ठरत आहे. ऑन्कॉलॉजिस्ट म्हणून डॉक्टरांना उपलब्ध वैज्ञानिक पुरावे वापरावे लागतील. कॅन्सर सर्व्हायवरशीप ही कमीत-कमी वेदनादायक आहे आणि सायकोसोशल आव्हानं कमी करणारी आहे, याची खात्री रुग्णांना करून द्यावी लागेल.