जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / प्रेग्नन्सीतील मॉर्निंग सिकनेस ठरू शकते अशक्तपणाचे कारण! या उपायांनी मिळेल आराम

प्रेग्नन्सीतील मॉर्निंग सिकनेस ठरू शकते अशक्तपणाचे कारण! या उपायांनी मिळेल आराम

प्रेग्नन्सीतील मॉर्निंग सिकनेस ठरू शकते अशक्तपणाचे कारण! या उपायांनी मिळेल आराम

गरोदरपणात महिलांची सर्वात मोठी समस्या म्हणजे मॉर्निंग सिकनेस आणि वारंवार उलट्या होणे. मात्र संशोधनात असे आढळून आले आहे की, गरोदरपणात मॉर्निंग सिकनेसची समस्या हे निरोगी गर्भधारणेचे लक्षण आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 13 फेब्रुवारी : मॉर्निंग सिकनेस, मळमळ आणि उलट्या ही गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या महिन्यांत सामान्य लक्षणे आहेत. महिलांच्या शरीरातील इस्ट्रोजेनची पातळी वाढणे आणि रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होणे हे त्याचे कारण म्हणता येईल. अशा स्थितीत अनेक महिलांना विशिष्ट प्रकारच्या वासाने संवेदनशीलता येते आणि वारंवार उलट्यांची समस्या त्यांना सतावू लागते. परंतु असेही म्हटले जाते की, गरोदरपणात उलट्या होणे धोकादायक नाही, उलट ते निरोगी गर्भधारणेचे लक्षण म्हणता येईल. मात्र हेही खरे की, उलट्या जास्त होत असतील तर शरीरात पाणी आणि पौष्टिकतेची कमतरता होऊ शकते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, तुम्ही औषधांशिवाय गर्भधारणेदरम्यान उलट्या म्हणजेच मॉर्निंग सिकनेस कशी थांबवू शकता.

Stretch Marks Removal : खूप प्रयत्न करूनही स्ट्रेच मार्क्स जात नाहीत? उत्तम प्रभावासाठी असे वापरा मोहरीचे तेल

पाणी कमी प्रमाणात प्या - मेडिकल न्यूज टुडेच्या मते, गर्भधारणेदरम्यान पुरेसे पाणी पिणे खूप महत्वाचे आहे. नियमित थोडे पाणी प्यायल्यास शरीरात हायड्रेशनची कमतरता भासत नाही आणि उलट्याही होत नाहीत.

News18लोकमत
News18लोकमत

कमी प्रमाणात खा - जर तुम्ही एकाच वेळी पोटभर खाल्ले तर ते गर्भधारणेमध्ये वारंवार उलट्या होण्याचे कारण बनू शकते, म्हणून तुम्ही कमी प्रमाणात, परंतु थोड्या थोड्या वेळाने खाल्ले तर चांगले होईल. एवढेच नाही तर मसालेदार पदार्थांपासूनही अंतर ठेवा. जर तुम्ही सकाळी उठून एक सफरचंद किंवा केळी खाल्ली तर तुम्हाला सकाळी उलट्या झाल्यासारखे वाटत नाही. दर काही तासांनी निरोगी स्नॅक्स घ्या. ट्रिगर ओळखा - कशाच्या किंवा कोणत्या पदार्थांच्या वासाने तुम्हाला उलट्या होतात हे ओळखल्यास तुम्ही तुमच्या समस्येवर मात करू शकता. उदाहरणार्थ, बाथरूममध्ये ठेवलेला रूम स्प्रे, कोणताही विशेष प्रकारचा साबण, स्वयंपाकघरातील कोणताही विशेष खाद्यपदार्थ. यांचा वास सहन होत नसेल तर त्यांच्यापासून दूर राहा. आल्याचा चहा प्या - गरोदरपणात आल्याचा चहा पोटाच्या समस्या आणि मळमळ यासारखे त्रास दूर करण्यास मदत करतो. अशा परिस्थितीत, गर्भधारणेदरम्यान मळमळ किंवा उलट्या टाळण्यासाठी तुम्ही दिवसातून एकदा किंवा दोनदा आल्याचा चहा नक्कीच पिऊ शकता. अदरक कँडी किंवा आल्याचा तुकडा चघळल्यानेही आराम मिळतो.

Pregnancy Tips : गरोदरपणात हिमोग्लोबिनची कमतरता ठरू शकते हानिकारक, ही असतात लक्षणे

बडीशेप खा - तुम्ही गरोदरपणात बडीशेप खाऊ शकता. तसेच बडीशेप घातलेला चहा किंवा डेकोक्शन म्हणजे काढा पिऊ शकता. त्यामुळे पोटात निर्माण होणारा गॅस निघून जातो आणि तुम्हाला बरे वाटते. तुम्ही खाल्ल्यानंतर माऊथ फ्रेशनर म्हणूनही हे वापरू शकता. (सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात