जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / आई होण्यासाठी आदर्श वय कोणतं असतं? जाणून घ्या आयुर्वेदिक स्त्रीरोगतज्ज्ञांकडून

आई होण्यासाठी आदर्श वय कोणतं असतं? जाणून घ्या आयुर्वेदिक स्त्रीरोगतज्ज्ञांकडून

आई होण्यासाठी आदर्श वय कोणतं असतं? जाणून घ्या आयुर्वेदिक स्त्रीरोगतज्ज्ञांकडून

सध्या करिअर, शिक्षण आणि इतर गोष्टींमुळे मुलीही लग्न उशिरा करतात, त्यामुळे साहजिकच गर्भधारणा उशिरा करण्याकडे त्यांचा कल असतो. त्यामुळे गर्भधारणेचं आदर्श वय काय आहे, ते आयुर्वेदिक स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. रेशमा एम. ए. यांच्याकडून जाणून घेऊयात.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 18 फेब्रुवारी : आई होणं ही आयुष्यातील खूप आनंददायी अनुभूती असते, कदाचित म्हणूनच स्त्रिया आई होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. सध्या करिअर, शिक्षण आणि इतर गोष्टींमुळे मुलीही लग्न उशिरा करतात, त्यामुळे साहजिकच गर्भधारणा उशिरा करण्याकडे त्यांचा कल असतो. पण उशिरा होणारी गर्भधारणा ही वाटते तितकी सोपी नसते. त्यामध्ये अनेक प्रकारच्या गुंतागुंती असतात. तसंच या गर्भधारणेत अनेक समस्याही उद्भवतात. त्यामुळे गर्भधारणेचं आदर्श वय काय आहे, ते आयुर्वेदिक स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. रेशमा एम. ए. यांच्याकडून जाणून घेऊयात. गर्भधारणेसाठी किंवा पालक व्हायचं प्लॅनिंग करण्यासाठी महिलेचं आदर्श वय 21-35 वर्षांच्या दरम्यान आहे. पण, याचा अर्थ असा नाही की 35 वर्षांनंतर गर्भधारणा होऊ शकत नाही. खरं तर सध्याच्या काळातील अनेक स्त्रिया वयाच्या 35 वर्षानंतर गर्भधारणेबद्दल प्लॅनिंग सुरू करतात. त्या पैकी बहुतेक गर्भवती राहतात, परंतु हा प्रवास त्या वयात सोपा नसतो.

    प्रेग्नन्सीतील मॉर्निंग सिकनेस ठरू शकते अशक्तपणाचे कारण! या उपायांनी मिळेल आराम

    जोडप्याचं वय जसजसं वाढत जातं तसतसं गर्भधारणेशी संबंधित तणाव आणि चिंता वाढते. गर्भधारणेसाठी प्रयत्न केल्यानंतर दोन महिन्यांत सकारात्मक परिणाम न मिळाल्यास कपल्सना काळजी वाटते आणि ते फॉलिक्युलर स्टिम्युलेशन, इंट्रायुटेरियन इन्सेमिनेशन, इन व्हिट्रो फर्टिलायझेशन अशा कृत्रिम उपचार पद्धतींचा पर्याय निवडतात.

    News18लोकमत
    News18लोकमत

    यातील आणखी एक महत्त्वाचा मेडिकल घटक आहे, जो वयाच्या 35 वर्षानंतर गर्भधारणेसाठी समस्या निर्माण करतो. तो म्हणजे फर्टिलिटी इंडेक्स होय. स्त्रियांच्या वयानुसार, ओव्हुलेशनसाठी उपलब्ध फॉलिकल्सची संख्या कमी होते, ज्यामुळे कधीकधी योग्य ओव्हुलेशन होत नाही किंवा कधीकधी ओव्हुलेशनच होत नाही आणि एग्सची गुणवत्ता कमी होते. परिणामी, महिलांमधील हॉर्मोन्स पुरेशा प्रमाणात तयार होत नाहीत, ज्यामुळे गर्भाशयाच्या लायनिंग आणि रिसेप्टिव्हिटीमध्ये आणखी समस्या निर्माण होतात. वय वाढल्यानंतर होणारी गर्भधारणा ही गर्भधारणेतील अनेक गुंतागुंतींसह होते. जसं की सुरुवातीच्या तिमाहीत गर्भपात, गर्भधारणेमुळे ब्लड प्रेशर वाढणं, डायबेटिस, गर्भाचं वजन कमी असणं, गर्भाची वाढ योग्य प्रकारे न होणं, गुणसूत्र आणि कॉन्जेनिटल समस्या, मुदतपूर्व बाळाचा जन्म, बाळाच्या जन्मादरम्यान धोका वाढणं, या समस्या जास्त वयात गर्भधारणा झाल्यास उद्भवतात. या सर्व कारणांमुळे कोणत्याही जोडप्याने त्यांनी वयाच्या 20 वर्षानंतर 30 व्या वर्षापर्यंत पालक होण्यासाठी प्लॅनिंग करावं. यामुळे तणावमुक्त गर्भधारणेसाठी स्त्रीचं शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी असणं खूप महत्वाचं आहे. Stretch Marks Removal : खूप प्रयत्न करूनही स्ट्रेच मार्क्स जात नाहीत? उत्तम प्रभावासाठी असे वापरा मोहरीचे तेल (सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात