मुंबई, 4 जुलै : तशी तर फळं खायला सर्वानाच आवडतात. जी फळं आपल्याकडे पारंपारिकरित्या पिकवली जातात. ती फळं तर सर्वजण खातात. मात्र जी फळं काहीशी वेगळी दिसतात किंवा वेगळ्या रंगांची असतात. त्यांच्या फायद्यांबद्दल आपल्याला माहिती नसते. बऱ्याचदा ही फळं खरी आहेत की नाही? ती खावी की नाही? असे प्रश्न जास्त पडतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका फळाविषयी सांगत आहोत. ते म्हणजे गुलाबी रंगाचे अननस. होय अननस गुलाबी रंगाचेही असते. हे अननस वरून सामान्य अननसासारखेच दिसते, परंतु ते आतून गुलाबी रंगाचे असते. गुलाबी अननसाला पिंक ग्लो पायनॅप्पल म्हणूनही ओळखले जाते. या अननसाच्या गुलाबी रंगामागे लाइकोपीन हे रंगद्रव्य असते. याच रंगद्रव्यामुळे टोमॅटो आणि कलिंगडालाही लाल रंग येतो. चला तर जाणून घेऊया हे पिंक ग्लो पायनॅप्पल किंवा गुलाबी अननसाचे फायदे काय आहेत.
Superfood : आठवड्यातून 4 दिवस डाळ-भात खाल्ल्याने होतात ‘हे’ फायदे, वेट लॉससाठीही होते मदतअननसाचे आरोग्य फायदे - हे अननस फायबरचा एक उत्तम स्रोत आहे आणि आतड्याच्या आरोग्यासाठी चांगले असते. यातील एन्झाइम्स ब्रोमेलेन म्हणून ओळखले जातात, जे पचन प्रक्रियेत मदत करतात.
- यावर अधिक संशोधनाची आवश्यकता आहे. मात्र काही स्टडीज सुचवतात की, ब्रोमेलेनमध्ये काही विशिष्ट दाहक-विरोधी गुणधर्म आहेत, जे सूज किंवा दुखापती बऱ्या करण्यासाठी मदत करू शकतात. - गुलाबी अननस नेहमीच्या साध्या अननसाप्रमाणे व्हिटॅमिन सी आणि मॅंगनीजचा चांगला स्रोत आहे. त्यामध्ये थियामिन, व्हिटॅमिन बी 6 आणि फोलेट देखील कमी प्रमाणात असतात. - अननसाचा वापर त्याच्या औषधी हेतूसाठी शतकानुशतके केला जात आहे. त्यात जीवनसत्त्वे, खनिजे, अँटिऑक्सिडंट असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास आणि जळजळ कमी करण्यास मदत करतात. - ब्रोमेलेन एंझाइम वेदना आणि सूज यांच्याशी लढण्यास मदत करतात आणि संधिवात झाल्यास ते चांगले अतिरिक्त आहार असल्याचे म्हटले जाते. दाहक-विरोधी गुणधर्म वेदना थोडे कमी करण्यास मदत करू शकतात. - गुलाबी अननसांना पारंपारिक पिवळ्या अननसांपेक्षा अधिक गोड चव असल्याचे म्हटले जाते. काही लोक म्हणतात की, त्यांची चव स्ट्रॉबेरी आणि नियमित अननसासारखी असते.
Morning Routine : 21 दिवसात केस होतील मजबूत आणि लांब, फक्त केसांना नियमित लावा ‘हा’ रस- इंडिया.कॉममध्ये दिलेल्या हेल्थलाइनच्या अहवालानुसार, या अननसातील संयुगे ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करून कर्करोगाचा धोका कमी करण्याची क्षमता ठेवतात. (सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)