बऱ्याचदा लोकांना रात्री डाळ-भात खाणे योग्य आहे की नाही? असा प्रश्न अनेकांना पडतो. विशेषत: ज्यांना वजन कमी करायचे आहे त्या लोकांना हा प्रश्न पडतो. तुम्ही देखील या लोकांपैकी एक असाल तर हे लक्षात घ्या की, रात्रीच्या जेवणात डाळ आणि भात वजन कमी करण्यासाठी योग्य आहार ठरू शकतो.
वजन कमी करणारे लोक अनेकदा कार्बोहायड्रेट असलेले अन्न सोडतात. परंतु असे केल्याने तुमची ऊर्जा कमी होऊ शकते. तुम्हाला बद्धकोष्ठतेची समस्या देखील होऊ शकते. जर तुमचे वजन कमी करत असाल तर तुम्ही आठवड्यातून 4 दिवस रात्री डाळ-भात खाऊ शकता. आयुर्वेदानुसार रात्री हलके अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो.
रात्री तूर डाळ खाल्ल्याने पचनक्रियेत समस्या निर्माण होतात असेही सांगितले जाते. हे टाळण्यासाठी डाळ शिजवण्यापूर्वी अर्धा तास भिजत ठेवा. याशिवाय डाळ शिजवताना त्यात हिंग टाकल्यास ती पचायला सोपी जाते. पोटात गॅसची समस्या असल्यास रात्रीच्या जेवणात डाळ खाणे टाळावे.
डाळीमध्ये शरीराला आवश्यक असलेले प्रोटीन्स, जीवनसत्त्वे, कॅल्शियम, लोह आणि फायबर्स असतात. भारतात तुम्हाला अनेक प्रकारच्या डाळी मिळतील. रात्री भात खायचा नसेल तर तुम्ही डाळीचे सांबारही बनवू शकता. त्यात विविध प्रकारच्या भाज्या घातल्याने त्याची पौष्टिकता वाढते.
कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन्स व्यतिरिक्त भातात शरीरासाठी आवश्यक असलेले फायटोन्यूट्रिएंट्स आणि जीवनसत्त्वे असतात. भातामध्ये चपातीपेक्षा कमी प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असतात, त्यामुळे ते पचायला सोपे जाते. त्यामुळे फक्त डाळ आणि भात खाल्ल्याने तुमच्या शरीराला भरपूर पोषण मिळू शकते.