JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / #PGStory: गाडी थांबली, काच खाली झाली आणि विचारलं, ‘मॅडम आर यू इंटरेस्टेड?’

#PGStory: गाडी थांबली, काच खाली झाली आणि विचारलं, ‘मॅडम आर यू इंटरेस्टेड?’

पहिल्यांदा त्यानं मला एम्सकडे जाण्याचा रस्ता विचारला. जेव्हा मी पत्ता सांगू लागले तेव्हा बारकाईनं माझ्याकडे पाहू लागला आणि मग विचारलं, “आर यू इंटरेस्टेड इन कमिंग विथ मी?”

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

‘न्यूज18 लोकमत’ची नवी मालिका “ पीजी स्टोरी ”चा हा तेरावा भाग आहे. जे तरुण आणि तरुणी करिअरसाठी आपलं गाव सोडून महानगरांमध्ये आले, त्यांना आलेल्या अनुभवांवर आधारित ही मालिका आहे. आपल्यापैकी अनेकांना घरापासून दूर, वेगळ्या शहरात पेइंग गेस्ट म्हणून राहण्याचा अनुभव असेल. या मालिकेत मांडण्यात आलेले अनेक अनुभव कदाचित तुम्हालाही आले असतील.  ही गोष्ट आहे 27 वर्षांच्या खुशबू नावाच्या तरुणीची. 19 व्या वर्षी आपली अनेक स्वप्नं घेऊन ती मुरादाबादहून दिल्लीला आली. गेल्या आठ वर्षांत तिला दिल्लीत अनेक अनुभव आले. त्यातील अनेक अनुभव भयंकर होते. त्यापैकीच एक अनुभव तिने शेअर केला आहे. ती सध्या एका मीडिया कंपनीत काम करते. युपीतील मुरादाबादमध्ये शालेय शिक्षण झाल्यानंतर मी दिल्लीला आले. मुरादाबाद त्या काळी छोटंसं शहर होतं. सगळी मिळून फक्त 10 किलोमीटर परिसरात वस्ती होती. मी मोठ्या शहरात शिक्षण घ्यावं, अशी आईवडिलांची इच्छा होती. शिक्षणासाठी दिल्लीची निवड करण्यामागे एक खास कारण होतं. मुरादाबाद एकतर दिल्लीपासून जवळ होतं आणि दुसरं म्हणजे तिथं आमचे नातेवाईक राहत होते. 2010 झाली मी दिल्लीला आले. विद्यापीठातील ‘लिंग्याज ललितादेवी’ कॉलेजमधून पत्रकारितेचं शिक्षण पूर्ण केलं.   जेव्हा दिल्लीला आले, तेव्हा पहिल्यांदाच घरच्यांपासून लांब राहत होते. सगळे मला पीजीत सोडायला आले होते. ते निघून गेल्यावर खूप रडले. माझ्या चुलत बहिणीच्या घराजवळच पीजी होतं. आई वडिलांची सतत आठवण यायची. थोडा दिलासा म्हणून अधूनमधून मी चुलत बहिणीच्या घरी जात असे. पहिला एक महिना तर असा होता की पीजीत जाण्याची इच्छाच व्हायची नाही. कॉलेजमधून सरळ बहिणीकडे. शनिवार आणि रविवारीपण तिच्याच घरी.   पीजीतली पहिली खोली उन्हाळ्याचे दिवस होते. संध्याकाळची वेळ होती. खोलीत आले तर सगळीकडे जळमटं पसरलेली दिसली. इथं एसीची कल्पना करणंही शक्य नव्हतं. खोलीच्या जवळच असणाऱ्या किचनचं उरलीसुरली कसरही भरून काढली होती. एक फोल्डिंग बेड होता, जो सारखा करकर आवाज करायचा. खोलीत साधा फुटका आरसाही नव्हता. बाथरुम बघून तर कुणालाही उलटी यावी. टॉयलेटमध्ये फ्लश खराब झालेला. आईनं बादली आणि मग दिला होता, ज्यामुळे टॉयलेट स्वच्छ करायला मदत व्हायची. टॉयलेटमध्ये बादली भरभरून पाणी ओतायचे. खोलीत एक मिणमिणती ट्यूब आणि टॉयलेटमध्ये एक झीरोबल्ब.   पीजीची पहिली आंटी ती शिवाशिव पाळणारी बाई होती. तिला वाटायचं की आम्ही कदाचित खालच्या जातीचे असलो, तर तिचं किचन अपवित्र होईल. जेवणाची भांडी बाथरूममधल्या वॉश बेसिनला धुण्याची परवानगी होती, पण किचनमधल्या बेसिनमध्ये त्याची परवानगी नव्हती. पीजीत खोली देण्यापूर्वी माझ्या चारित्र्याबाबतही बरीच माहिती तिनं जमा केली होती. मला बॉयफ्रेंड नसणं हाच माझ्या शुद्ध चारित्र्याचा निकष होता. पीजीतली पहिली सकाळ नाश्ता मिळाला नव्हता. त्यावेळी पीजीत मी एकटीच असल्यामुळे स्वयंपाकीण बाई आली नव्हती. एका मुलीला नाश्ता देण्यासाठी कोण एवढी तसदी घेणार होतं? मुलगी जेवली की उपाशी झोपली, यानं कुणालाही फरक पडणार नव्हता. आयुष्यातील हा नकोसा काळ वाटत  होता. मात्र करिअर करण्याच्या इच्छेपुढे ही सगळी संकटं तुच्छ होती.  

सकाळी 7 वाजता कॉलेजची बस मला पिकअप करायला आली. ही बसही आईवडिलांनीच ठरवली होती. मी या भल्यामोठ्या शहरात, मोठ्या लोकांमध्ये, गर्दीमध्ये अगदीच अनोळखी होते. कुणाशी बोलण्याची इच्छाच व्हायची नाही. त्यावेळी माझं वजन 70 किलो होतं. दिल्लीच्या धावपळीत दोनच महिन्यात वजन 8 किलो कमी झालं. वास्तविक, मी खूश असायला हवं होतं. मात्र मी उलट उदास राहू लागले. वजन तर कमी होतच होतं, शिवाय निराशाही दाटून येत होती.   कॉलेजचा पहिला दिवस सकाळी तयार झाले. स्वतःला पाहण्यासाठी घरात साधा आरसाही नव्हता. मोठ्या शहरातील कॉलेजमध्ये होणाऱ्या रॅगिंगला मी घाबरले होते. केसांना तेल लावून, जीन्स आणि शर्ट घालून वर्गात मागच्या बाजूला एका कोपऱ्यात जाऊन बसले होते. तारीख होती 2 ऑगस्ट. सगळे एक एक करून स्वतःची ओळख करून देत होते. आमच्या छोट्या शहरात स्वतःची ओळख कशी करून द्यायची, हे सुद्धा शिकवलं नव्हतं.   #PGStory: माझं आणि रूम पार्टनरचं एकाच मुलीवर जडलं प्रेम सगळ्यांनी सफाईदार इंग्रजीत आपली ओळख करून द्यायला सुरुवात केली. माझं तोंड कोरडं पडलं होतं. आपले हातपाय कुणीतरी बांधून ठेवलेत, असं वाटत होतं. घामाने हात ओले होऊ लागले होते. आता मी माझी ओळख कशी करून देऊ, एवढा एकच प्रश्न मला सतावत होता. टीचरनी माझं अवघडेपण ओळखलं. मला म्हणाल्या, फक्त तुझं नाव सांग आणि तुला काय होण्याची इच्छा आहे, ते सांग. मी हळू आवाजात फक्त माझं नाव सांगितलं आणि झटक्यात खाली बसले.   कॉलेजमध्ये मला माझ्या माघारी सगळे जाडी आणि अडाणी म्हणायचे. मलाही त्यातले काही टोमणे ऐकू यायचे. तिथल्या विद्यार्थ्यांच्या मते मला कपडे घालण्याचा सेन्सच नव्हता. ते माझ्याशी इतका भेदभाव करायचे की कँटिनमध्ये जाऊन जेवणंही अवघड वाटायचं. माझे मित्र फारच कमी होते.   नवं पीजी ही तीन मजली इमारत होती. एका खोलीत दोन किंवा तीन जण. खोलीत एक छोटासा कूलर, त्याचा एक भाग माझ्याकडे आणि दुसरा रुममेटकडे. उकाड्यामुळे स्कीन ऍलर्जी झाली होती. चिकन पॉक्सही झाले. घरून आई आली. तिसऱ्या मजल्यावरची खोली चांगलीच गरम व्हायची. लेकीचा तापानं फणफणलेली पाहून तिचा संताप झाला. त्या खोलीतल्या तापमानासाठी एसी ही चैन नव्हे, गरज होती. एसी लावला आणि खोलीचं भाडं दुप्पट झालं. आता 12 हजार भाडं द्यावं लागत होतं आणि वीजेचं बिल वेगळंच.   भाऊ आला दिल्लीत दोन वर्षं अशीच त्रासात गेल्यावर माझा भाऊदेखील दिल्लीत आला. त्यानंतर आम्ही एकाच फ्लॅटमध्ये राहू लागलो. आता काहीसा दिलासा मिळाला होता. गरजेच्या सगळ्या वस्तू होत्या आणि स्वतःचं किचन होतं. दिल्ली हे फारच विचित्र शहर आहे. शहर जितकं मोठं, रस्ते जितके रुंद तितकाच लोकांच्या मनात कचरा. माझा भाऊ हा माझा बॉयफ्रेंड आहे, असंच आजूबाजूच्या सगळ्यांना वाटत होतं. एक दिवस भावासोबत पार्लरला गेले होते. मी खुर्चीवर बसले आणि तो माझ्या मागे उभा होता. पार्लरवालीनं हळूच कानात विचारलं की तो माझा बॉयफ्रेंड आहे का? मी रागावून तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाले की तो माझा भाऊ आहे. त्यावर फारच विचित्र नजरेनं तिनं माझ्याकडे पाहिलं. कदाचित, पार्लरमध्ये फक्त बॉयफ्रेंडसोबतच येण्याची पद्धत असावी.  

त्या दिवसापासून आम्हाला एकमेकांचे बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड म्हटल्याचं ऐकण्याची सवयच झाली. ऋषिकेशमध्ये आमची आयकार्ड तपासण्यात आली. घरी फोन करून आईकडून खातरजमा करण्यात आली. घरच्या बाईनंही विचारलं की तुम्ही नवरा-बायको आहात का. आई म्हणाली ही माझी मुलं आहेत.   #PGStory : 7 Affair करून झाल्यावर पडली प्रेमात; सत्य समजल्यावर बॉयफ्रेंडने घेतला निर्णय जे वर्तमानपत्रात वाचलं होतं आणि काही सिनेमांत पाहिलं होतं, तेदेखील एकदा घडलं. मी रस्ता क्रॉस करत होते. रात्रीचे नऊ वाजले असावेत. तेवढ्यात मागून एक काळ्या रंगाची कार येऊन थांबली. काच खाली झाली. गाडीत सूटबूट घातलेला एक श्रीमंत माणूस बसला होता. पहिल्यांदा त्यानं मला एम्सकडे जाण्याचा रस्ता विचारला. जेव्हा मी पत्ता सांगू लागले तेव्हा बारकाईनं माझ्याकडे पाहू लागला आणि मग विचारलं, “आर यू इंटरेस्टेड इन कमिंग विथ मी?” महानगर आजही जेव्हा जेव्हा मी मुरादाबादला जाते, तेव्हा बिनधास्त असते. आईवडिलांसोबत दंगामस्ती करते. पण जेव्हा पुन्हा दिल्लीत येते, तेव्हा जबाबदारीचं एक दडपणच येतं. 

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या