JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Mumbai Market : गुढीपाडव्याला मुलीसाठी करा मस्त खरेदी, मुंबईच्या मार्केटमधील पाहा नवी फॅशन, Video

Mumbai Market : गुढीपाडव्याला मुलीसाठी करा मस्त खरेदी, मुंबईच्या मार्केटमधील पाहा नवी फॅशन, Video

Mumbai Market : यंदा गुढीपाडव्याला तुमच्या मुलींना घेण्यासाठी मुंबईतील दादर मार्केटमध्ये छान ड्रेस उपलब्ध आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नुपूर पाटील, प्रतिनिधी मुंबई, 11 मार्च : यापूर्वीच्या पिढीमध्ये पोलका स्कर्टची फॅशन होती हे तुम्ही घरामध्ये आईकडून नक्कीच ऐकलं असेल. त्याचबरोबर विविध मालिकांमध्येही हे ड्रेस पाहिले असतील. जुन्या काळातील ही फॅशन आता पुन्हा एकदा ट्रेडिंगमध्ये आहे. यंदा गुढीपाडव्याला तुमच्या मुलींना घेण्यासाठी मुंबईतील दादर मार्केटमध्ये हेच पोलका स्कर्ट अगदी स्वस्त आणि मस्त उपलब्ध आहेत. कॉटन सिल्कच्या कापडापासून पोलका स्कर्ट बनवले जातात. लहान मुलींसाठी हे विकले जातात. 3 महिन्याच्या मुलींपासून ते 15 वर्षाच्या मुलींसाठी हे पोलका स्कर्ट बाजारात उपलब्ध आहेत. महाराष्ट्रात तसेच दक्षिण भारतात सुद्धा या पद्धतीचे ड्रेस मुली घालतात. दादर मार्केटमध्ये हे ड्रेस सहज उपलब्ध होतात. इरकल तसेच खणाच्या कपडात सुद्धा पोलका स्कर्ट उपलब्ध आहे. उन्हाळ्यात कॉटन कुर्ती हवीच! ‘इथं’ करा मुंबईतील सर्वात स्वस्त खरेदी! Video काय आहे किंमत? पोलका स्कर्ट 300 रुपये ते 800 रुपयांच्या आत उपलब्ध आहेत. तसंच लहान मुलींसाठी खणाच्या कापडाचे फ्रॉक सुद्धा येथे मिळतात. विविध रंगी बेरंगी सुंदर रंग संगतीतले हे पोलका स्कर्ट हे महाराष्ट्रीयन तसंच दक्षिण भारतीय अधिक संख्येनं खरेदी करतात.  मुंबईतल्या विविध भागातून लोकं येथे येतात तसेच पाहिजे त्या रंगसंगतीची ऑर्डर देऊन सुद्धा हे ड्रेस बनवून मिळतात. सण उत्सव आले की या ठिकाणी अनेक लोकं आपल्या घरातल्या लहान मुलींसाठी पोलका स्कर्ट खरेदी करण्यासाठी नेहमीच येतात. सुंदर आकर्षक काठ आणि डिझाईन यामुळे हे ड्रेस खूप उठावदार दिसतात.

गुगल मॅपवरून साभार

संबंधित बातम्या

कुठे मिळतात पोलका स्कर्ट ? दादर स्थानकाच्या पश्चिम परिसरात कोटक महिंद्रा बँकेच्या विरुद्ध बाजूला छबीलदास गल्लीच्या सुरुवातीलाच कपड्यांचं दुकान आहे, तिथं हे पोलका स्कर्ट मिळतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या