JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / मे महिनाच कशाला, वर्षभर आंबे खायला मिळतील; एकदा हा VIDEO पाहाच

मे महिनाच कशाला, वर्षभर आंबे खायला मिळतील; एकदा हा VIDEO पाहाच

आता आंब्यांसाठी वर्षभर वाट पाहण्याची गरज नाही. तुम्ही वर्षभर आंबे खाऊ शकता.

जाहिरात

फोटो सौजन्य - Canva

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 07 मे : आंबे म्हणताच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. आंबा हे फळ खायला कुणाला आवडत नाही. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आंब्यावर ताव मारतात. आंबे खाण्यासाठी सर्वजण उन्हाळ्याची वाट पाहत असतात. वर्षभर आंबे खायला मिळणार नाहीत, म्हणून मनसोक्त आंबे खाल्ले जातात. पण आता आंब्यांसाठी वर्षभर वाट पाहण्याची गरज नाही. तुम्ही वर्षभर आंबे खाऊ शकता. वर्षभर आंबे खाण्यासाठी तुम्हाला एक छोटंसं काम करावं लागेल. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. सोशल मीडियावर गृहिणींचे काही व्हिडीओ असताच. ज्यात गृहिणींसाठी टीप्स असतात. अशाच एका गृहिणीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात तिने वर्षभर आंबे कसे टिकवायचे याची ट्रिक सांगितली आहे. Mango seeds recipe video : आंब्याची कोय फेकायची नाही तर खायची असते; पण कशी ते पाहा VIDEO यासाठी तुम्हाला चांगल्या दर्जाचे आंबे खरेदी करावे लागतील. साल काळी पडलेले, डाग लागलेले, नरम आंबे बिलकुल घेऊ नका. पिकलेले पण कडक असे आंबे घ्या.

या आंब्याची साल काढून घ्या आणि त्याच्या छोट्या छोट्या फोडी करा. या फोडीत तुम्ही साखर मिक्स करा आणि हवाबंद डब्यात किंबा हवाबंद पिशवीत ठेवून ते फ्रीजरमध्ये ठेवा. छोट्या छोट्या झिपलॉक बॅग किंवा छोट्या डब्यात ठेवलं कर चांगलं जेणेकरून तितकंच वापरता येईल. सर्व एकत्र काढून ते खराब होणार नाही. बाबो! 4.5 लाख रुपयांचा एक कलिंगड; असं यात काय आहे खास पाहा PHOTO दुसरी पद्धत म्हणजे याची प्युरी बनवा.  ही प्युरी तुम्ही डब्यात, बाटलीत किंवा पाकिटात ठेवून फ्रिजरमध्ये ठवू शकता. पण यापेक्षा सोपं म्हणजे ही प्युरी बर्फाच्या ट्रेमध्ये भरून फ्रीजरमध्ये ठेवा. त्याचे क्युब्स तयार झाले की ते झिपलॉक बॅगमध्ये बंद करून फ्रिजरमध्ये ठेवा. एकत्र प्युरीपेक्षा हे क्युब वापरणंही सोपं होतं.

अशा पद्धतीने आंब्याची साठवण करून तुम्ही तो वर्षभऱ खावू शकता. त्यापासून वेगवेगळे पदार्थही बनवू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या