जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Mango seeds recipe video : आंब्याची कोय फेकायची नाही तर खायची असते; पण कशी ते पाहा VIDEO

Mango seeds recipe video : आंब्याची कोय फेकायची नाही तर खायची असते; पण कशी ते पाहा VIDEO

फोटो सौजन्य - Canva

फोटो सौजन्य - Canva

आंब्याची कोय खाण्याचेही फायदे आहेत. आरोग्याला त्याचे बरेच लाभ होतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 19 एप्रिल : आंबा आवडत नाही अशी व्यक्ती शोधूनच सापडेल. आंब्यापासून बरेच पदार्थही बनतात. पण सामान्यपणे आंबा खाल्ल्यानंतर त्याची बी म्हणजे कोय आपण फेकून देतो. पण आंब्याच्या कोयही आरोग्यासाठी चांगली आहे. आंब्याची कोय खाण्याचे अनेक फायदे आहेत. पण आता आंब्याची कोय खायची कशी असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. आंब्याची कोय खाण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. आंब्याच्या बीच्या काही रेसिपी आहेत. एकतर तुम्ही आंब्याच्या कोयीची पावडर बनवू शकता किंवा दुसरं म्हणजे तुम्ही त्यापासून मुखवास बनवू शकता. आंब्याची कोय सुकवून त्याची पावडर बनवून घ्या. आता ही पावडर कशी वापरायची आणि त्याचे फायदे काय. याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

News18लोकमत
News18लोकमत

आंब्याच्या बीची पावडर वापरण्याची पद्धत आणि त्याचे फायदे उलटी, मळमळ वाटत असेल तर ही पावडर पाण्यात मिसळून प्यावी. पोटात जंत होत असतील तर शौचास वारंवार होत असेल तर ही पावडर आणि भाजलेली जिरे पावडर दोन्ही समप्रमाणात घेऊन गरम पाण्यात मिसळा आणि प्या. छातीत धडधडल्यासारखं वाटतं, भीती वाटत असेल तर पाण्यात ही पावडर मिसळून प्यावी. मूळव्याध असेल, मूत्रमार्ग, मलमार्ग किंवा नाकातून रक्त येत असेल, तरी ही पावडर फायदेशीर आहे. केसगळती, केस पांढरे होणे ही समस्या असल्यास पाण्यात ही पावडर मिसळून पेस्ट तयार करा आणि अर्धा तास केसांवर लावून ठेवा आणि नंतर पाण्याने धुवून टाका. किंवा पाण्यातून घ्या. पुरळ, खाज त्वचेची कोणतीही समस्या असल्यास त्यावर याची पेस्ट लावा. मासिक पाळीत रक्तस्राव जास्त होत असल्यास सकाळ-संध्याकाळ गायीच्या दुधात ही पावडर घ्यावी. अद्भुत! भारतातील ‘या’ गावात आहे आंब्याचं चालणारं झाड; विश्वास बसत नाही तर पाहा VIDEO विद्या सागर आयुर्वेद या युट्यूब चॅनेलवर डॉ. अमित कुमार यांनी ही माहिती दिली आहे.

दरम्यान आता मुखवास कसा बनवायचा तो पाहुयात. मुखवास बनवण्याची पद्धत आंब्याची कोय धुवून थोडी सुकवून घ्या. त्यानंतर ती फोडून त्याच्या आत बी असते ती काढा. बीवरील काळी साल असते ती काढून टाका. पाणी उकळवून घ्या. त्या पाण्यात मीठ आणि बिया टाका.  15 मिनिटं उकळवून घ्या आणि पाणी गाळून घ्या. वाट्टेल तेव्हा खाऊन चालत नाही; कलिंगड खाण्याची ‘ही’ योग्य वेळ, नाहीतर फायद्याऐवजी नुकसान होईल पहिली पद्धत - उकडवून घेतलेल्या बिया थंड झाल्यावर त्या उभ्या कापून घ्या आणि उन्हात सुकवून घ्या आणि हवाबंद डब्यात ठेवून द्या. हवं तेव्हा खाऊ शकता. दुसरी पद्धत - एका भांड्यात तूप घेऊन त्यात उकडलेल्या बिया शॅलो फ्राय करून घ्या. थोडा रंग बदलल्या आणि कुरकुरीत झाल्या ही बिया दुसऱ्या भांड्यात काढून घ्या. साधं मीठ, काळं मीठ आणि ज्येष्ठमध पावडर टाका. मिक्स करून घ्या. तिसरी पद्धत - उकडलेल्या बिया किसून घ्या आणि एका भांड्यात तेल गरम करून. त्यात साधं मीठ, काळं मीठ, ज्येष्ठमध पावडर टाकून त्यात या बिया कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्या. थंड करून हवाबंद डब्यात ठेवा.

त्यामुळे आता यापुढे आंब्याची कोय फेकू नका, तर त्याचा अशा पद्धतीने वापर करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात