JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / रात्री उशिरा जेवणाऱ्यांना या गंभीर आजाराचा धोका, वेळीच बदला तुमची ही सवय

रात्री उशिरा जेवणाऱ्यांना या गंभीर आजाराचा धोका, वेळीच बदला तुमची ही सवय

काही लोकांना रात्री उशिरा जेवण्याची सवय असते. तर, काहींना कामामुळे वेळ मिळत नाही आणि जेवायला उशीर होतो. तर रात्री उशिरा जेवल्याचे शरीरावर काय परिणाम होतात, हे जाणून घेऊयात.

जाहिरात

आहारात फायबर पदार्थांचा समावेश करा - ज्या लोकांच्या पोटात नेहमी गॅस असतो आणि त्यांना बद्धकोष्ठतेसारखे वाटते, त्यांना त्यांच्या आहारात काही बदल करावे लागतील. फायबर युक्त गोष्टींचे अधिकाधिक सेवन करावे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 30 जानेवारी: गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे (Coronavirus Pandemic) आपल्या लाईफस्टाईलमध्ये (lifestyle during COVID-19 Period) बरेच बदल झाले आहेत. लोक आरोग्याची काळजी घेऊ लागले आहेत. चांगला पौष्टिक आहार, व्यायाम हे कोरोनाच्या भीतीने का होईना, आयुष्याचा भाग झाले आहेत. पण पौष्टिक पदार्थ खाल्ल्याने किंवा व्यायाम केल्याने आपण निरोगी आहोत, असं होत नाही. त्यासाठी आणखी बऱ्याच गोष्टी कारणीभूत असतात. त्यापैकी एक म्हणजे वेळेवर जेवण करणं. वेळेवर न जेवण्याचा आपल्या शरीरावर परिणाम होतो. रात्रीचं जेवण (late night dinner) उशिरा केल्यास डायबेटिस (diabetes causes) होऊ शकतो. काही लोकांना रात्री उशिरा जेवण्याची सवय असते. तर, काहींना कामामुळे वेळ मिळत नाही आणि जेवायला उशीर होतो. तर रात्री उशिरा जेवल्याचे शरीरावर काय परिणाम होतात, हे जाणून घेऊयात. स्पेनमध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार, रात्रीचं जेवण वेळेवर केल्याने डायाबेटीसचा धोका कमी होतो. हा अभ्यास स्पेनमधील 845 प्रौढांवर करण्यात आला. ज्यामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्तीला आठ तास उपाशी ठेवण्यात आलं. त्यानंतर, दुसऱ्या रात्री त्यांना नेहमीपेक्षा लवकर आणि दुसऱ्या दिवशी रात्री नेहमीपेक्षा उशिरा जेवायला दिलं. या वेळी संशोधकांनी मेलाटोनिन रिसेप्टर-1बी जीनमधील प्रत्येक सहभागीचा अनुवांशिक कोडदेखील तपासला. हे वाचा- डाएट प्लॅन-व्यायामानंही वजन घटेना, या पद्धतीनं बडीशेप वापरून पाहा परिणाम आता मेलाटोनिन म्हणजे काय?, तर मेलाटोनिन हा एक हॉर्मोन आहे. जो प्रामुख्याने रात्री सक्रीय असतो. हा हॉर्मोन झोपेचं चक्र नियंत्रित करण्यास मदत करतो. या संशोधनात मेलाटोनिन-1 बी जीन उच्च पातळीवर गेल्याचं आढळून आलं. तर, उशिरा जेवण करणाऱ्यांमध्ये टाइप-2 डायाबेटिसचा धोका दिसून आला. संशोधकांना असं आढळून आलं की, एका सहभागीच्या रक्तातील मेलाटोनिनचे प्रमाण रात्रीच्या जेवणानंतर 2.5 पटीने जास्त होतं. रात्रीचं जेवण उशिरा केल्याने इन्सुलिनची पातळी कमी होते आणि रक्तातील साखरेची (sugar level in blood) पातळी वाढते. रात्री उशिरा जेवण्याची वेळ पाहता, मेलाटोनिन-1बी जी-अ‍ॅलील असलेल्या सहभागींमध्ये अनुवांशिक प्रकार नसलेल्यांपेक्षा रक्तातील ग्लुकोजची (glucose level) पातळी जास्त होती. यासंदर्भात झी न्यूजने वृत्त दिलंय. हे वाचा- हिरवी मिरचीही खायला हवी.. कारण आरोग्यासाठी फायदेही आहेत तितकेच झणझणीत ‘उशिरा जेवल्याने सहभागी झालेल्या गटातील सगळ्यांच्या ब्लड शुगर कंट्रोलमध्ये गडबड झाली. याशिवाय हे बिघडलेलं ग्लुकोज कंट्रोल प्रामुख्याने अनुवांशिक जोखीम प्रकाराच्या वाहकांमध्ये दिसून आले,’ असं मर्सिया युनिव्हर्सिटीतील फिजियोलॉजी विभागातील प्रोफेसर आणि मुख्य लेखिका मार्टा गॅरोलेट यांनी सांगितलं. रात्री उशिरा जेवल्यास वजन (weight) देखील वाढू शकतं. त्यामुळे जर तुम्हीही रात्री वेळेवर जेवत नसाल, तर आरोग्यासंबंधीत अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. म्हणून या गोष्टी टाळण्यासाठी जेवणाच्या वेळा निश्चित करायला विसरू नका.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या