नवी दिल्ली,30 जानेवारी : लोक स्थूलपणा कमी करण्यासाठी खूप काही करतात. हे लोक योग, व्यायामापासून ते काटेकोर आहार पाळण्यापर्यंत अनेक पद्धती त्यांच्या दैनंदिन दिनक्रमाचा भाग बनतात. तरीही, स्थूलपणा कमी करणं कठीण जातं. पण तुम्हाला माहीत आहे का की, बडीशेप (Fennel For Weight Loss) तुमच्या आहारात समाविष्ट करून तुम्ही स्थूलपणा कमी (Weight loss) करू शकता. होय, बडीशेप (Saunf) खाल्ल्यानं तुमचा लठ्ठपणा कमी होण्यास मदत होईलच; शिवाय, आरोग्यालाही खूप फायदा (Fennel For Weight Loss) होईल.
बडीशेपमध्ये लघवीचे प्रमाण वाढवणारा गुणधर्म आहे. याच्यामुळं शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात. तसंच, बडीशेपमध्ये (Fennel seeds) भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट असल्यानं, योग्य पचन राखण्यासाठी, चयापचय वाढवण्यासाठी, केस आणि त्वचा चमकदार बनवण्यासाठी देखील बडीशेप खूप प्रभावी आहे. चला तर मग जाणून घेऊया, बडीशेपच्या मदतीनं तुम्ही लठ्ठपणाच्या समस्येपासून कशी सुटका मिळवू शकता.
भाजलेली बडीशेप फायदेशीर ठरेल
बडीशेप चवदार होण्यासाठी मूठभर बडीशेप मंद आचेवर भाजून घ्या. भाजल्यामुळं बडीशेपचा सुगंध वाढतो आणि ती खायला चवदार बनते. प्रत्येक जेवणानंतर बडीशेप खाल्ल्यानं स्थूलपणा कमी होण्यास मदत होते. तसंच, पचनशक्तीही मजबूत राहते.
हे वाचा - लघवीच्या समस्येशिवाय किडनी खराब होण्याची अशी असतात लक्षणं; त्याकडे दुर्लक्ष पडेल महागात
बडीशेपची पूड खा
यासाठी मूठभर बडीशेप चांगली बारीक करून पूड बनवा. आता या चुर्णामध्ये मेथी दाणे, काळं मीठ, हिंग एकत्र करा. या मिश्रणाचं नियमित सेवन केल्यास स्थूलपणा कमी होण्यास मदत होते. हे स्वादिष्ट असण्यासोबतच तुमची पचनसंस्थादेखील निरोगी ठेवते.
बडीशेपचं पाणी प्या
रोज रात्री झोपण्यापूर्वी एका ग्लास पाण्यात मूठभर बडीशेप भिजवा. रात्रभर भिजवल्यानंतर हे द्रावण गाळून सकाळी प्या. हे बडीशेपचं पाणी दिवसातून दोनदा प्यायल्यानं स्थूलपणा झपाट्यानं कमी होण्यास सुरुवात होईल. शिवाय, या मिश्रणामुळं शरीरातील जीवनसत्त्वांची कमतरता भरून निघेल आणि पोटदुखीच्या समस्येपासून देखील आराम मिळेल.
बडीशेप चहामध्ये घाला
तुम्ही जर चहाचे शौकीन असाल तर रोज चहा बनवताना त्यात बडीशेप जरूर टाका नका. चहाला उकळी आल्यावर त्यात एक चमचा बडीशेप घाला. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्यात थोडासा गूळदेखील टाकू शकता जेणेकरून ते अधिक प्रभावी होईल. बडीशेपचा चहा रोज प्यायल्यानं स्थूलपणा कमी करण्यात फायदा होतो.
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Weight, Weight loss tips