नवी दिल्ली, 30 जानेवारी : जेवणाला चवदार बनवण्यासाठी आपण विविध उपाय करतो. मसाल्यांच्या वैविध्यापासून ते मिठाच्या प्रमाणापर्यंत सर्व गोष्टींची काळजी घेतली जाते. पण, मिरचीशिवाय प्रत्येक पदार्थाची चव अपूर्ण वाटते. जेवणात मसालेदारपणा आणण्यासाठी आपण अनेकदा हिरवी मिरची वापरतो. पण, तुम्हाला माहीत आहे का की, जेवणाला स्वादिष्ट बनवण्यासोबतच हिरवी मिरची आपल्या आरोग्यासाठीही (Green Chilli Benefits) खूप फायदेशीर आहे? हिरवी मिरची अनेकदृष्टा फायदेशीर आहे, कारण त्यात लोह, तांबे, पोटॅशियम, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, बीटा कॅरोटीन, क्रिप्टोक्सॅन्थिन, ल्युटीन झेक्सॅन्थिन, व्हिटॅमिन ए, बी6 आणि सी सारख्या पोषक तत्वांचा समावेश आहे. हिरवी मिरची खाण्याचे फायदे हिरवी मिरची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी आहे हिरव्या मिरचीमध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म शरीराला बॅक्टेरियापासून मुक्त ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे हिरवी मिरची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करते. दृष्टी सुधारण्यास मदत करते हिरवी मिरची डोळ्यांना निरोगी बनवते. वास्तविक, हिरव्या मिरचीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए असते, जे डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासोबतच डोळ्यांची विशेष काळजी घेते. हिरवी मिरची पचनशक्ती मजबूत करते हिरव्या मिरचीमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि आहारातील फायबर मुबलक प्रमाणात आढळतात. जे केवळ पचनसंस्था सुरळीत ठेवण्याचे काम करत नाही तर बद्धकोष्ठता आणि पोटाशी संबंधित गॅस सारख्या समस्यांवर देखील खूप फायदेशीर आहे. वजन कमी करण्यास सध्या प्रत्येक दुसरा माणूस वाढत्या वजनामुळे त्रस्त आहे. त्यासाठी एक उपाय म्हणजे हिरवी मिरची. हिरवी मिरचीमध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट असण्यासोबतच ती कॅलरी फ्री देखील असते. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. त्वचा चमकेल हिरवी मिरची व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन सीचा चांगला स्रोत मानली जाते. जे स्किनला हेल्दी ठेवण्याचे काम करते आणि स्किन ग्लोइंग देखील करते. हे वाचा - Healthy Breakfast: नवीन वर्षासोबत ब्रेकफास्टमध्ये करा हे 5 हेल्दी बदल; नेहमी निरोगी आणि तंदुरुस्त रहाल तणाव कमी करण्यास उपयुक्त हिरव्या मिरचीच्या सेवनाने मेंदूच्या पेशींमध्ये एंडोर्फिनचा प्रवाह सुधारतो. यामुळे राग कमी होण्यासोबतच तुमचा मूडही पूर्णपणे हलका आणि थंड राहतो. हे वाचा - तिखटपणामुळे खाणं टाळू नका! झणझणीत मिरचीचेही आहेत आरोग्यासाठी फायदे हिरवी मिरची हृदयाचे आरोग्य उत्तम ठेवते हिरवी मिरची हा पोषक तत्वांचा खजिना आहे. सर्व फायद्यांसोबतच त्याचा आहारात समावेश केल्याने हृदयातील रक्ताभिसरणही चांगले राहते. (सूचना: येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







