JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / विराट-अनुष्कानं गुंतवणूक केलेलं ‘प्लांट बेस्ड मीट’ म्हणजे नक्की आहे तरी काय?, जाणून घ्या सविस्तर

विराट-अनुष्कानं गुंतवणूक केलेलं ‘प्लांट बेस्ड मीट’ म्हणजे नक्की आहे तरी काय?, जाणून घ्या सविस्तर

जाणून घेऊया, काय असते प्लांट बेस्ड मीट (What is Plant-Based Meat?), आरोग्यासाठी ते किती फायदेशीर असते?

जाहिरात

प्लांट बेस्ड मीट म्हणजे नक्की काय? जाणून घ्या

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी: जगात मांसाहाराला शाकाहारी पर्याय देणाऱ्या कंपन्यांचा व्यवसायही झपाट्यानं वाढला आहे. अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) यांनी मुंबईस्थित स्टार्टअप ब्ल्यू ट्राईबमध्ये गुंतवणूक केली आहे. ही कंपनी वनस्पती-आधारित मांस (Plant-Based Meat) तयार करते. आपण मांस नाही, तर वनस्पतीपासून बनवलेल्या वस्तूचे सेवन करू. हे केवळ प्राण्यांच्या प्रेमापोटी नाही, तर पर्यावरणासाठीही गरजेचे असल्याचे दोघांनी म्हटलं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, की हे वनस्पती-आधारित मांस काय भानगड आहे. तर त्याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तर जाणून घेऊया, काय असते प्लांट बेस्ड मीट (What is Plant-Based Meat?), आरोग्यासाठी ते किती फायदेशीर असते? आणि त्याची चव खरोखरच प्राण्याच्या मांसासारखी असते का? याची उत्तरं तुम्हाला या बातमीत मिळतील. याबाबतचे वृत्त टीव्ही 9 हिंदीने दिलं आहे. Diabetes रुग्णांची शुगर राहील नियंत्रणात; रात्री झोपण्यापूर्वी करा ही 5 कामं ‘प्लांट बेस्ड मीट’ हे वनस्पतींमधून काढलेल्या अनेक गोष्टींपासून तयार केले जाते. हे प्रोटीन, ग्‍लूटेन, नारळाचे तेल, मसाले, सोया, बीटचा रस आणि तांदळापासून बनवले जाते. ‘प्लांट बेस्ड मीट’ हे एकदम मोठ्या प्रमाणात बनवले जात नाही. तर ते कमी प्रमाणात तयार केले जाते आणि त्याचा पुरवठा केला जातो. तर ‘प्लांट बेस्ड मीट’ एखाद्या प्रयोगशाळेत तयार केलेल्या मांसापेक्षा वेगळे असते. म्हणजेच, ‘प्लांट बेस्ड मीट’ हे वनस्पतींमधून घेतलेल्या गोष्टीपासून तयार केले जाते. तर प्रयोगशाळेतील मांस हे प्राण्यांच्या पेशींपासून बनवले जाते. हे मांस तयार करताना त्याच प्रकारचा रंग, चव आणि प्रथिने यांची काळजी घेतली जाते. फूड एक्सपर्ट रायन गीगर यांनी सांगितले, की प्लांट बेस्ड मीट हे जर माफक प्रमाणात खाल्लं तर ते आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. यात फॅटचे प्रमाण कमी असते. तसेच फायबर आणि प्रोटीनचे प्रमाण पुरेसे असते. फायबर हे पोटासाठी फायदेशीर आहे. तसेच ‘प्लांट बेस्ड मीट’ ची चवही प्राण्यांच्या मांसासारखी लागते. ज्या लोकांनी प्राण्यावरील प्रेमापोटी मांस खाणं बंद केले आहे. ते याचे सेवन करू शकतात आणि मांस खाल्ल्याचा आनंद मिळवू शकतात. फक्त लेकीच्या चेहऱ्यावर हसू यावं म्हणून बाबाने आपल्या छातीवर… याशिवाय, याचं अधिक प्रमाणात सेवन न करण्याचे सांगितले जाते. कारण, यात नारळापासून बनलेल्या तेलाचा वापर केला जातो. त्यात फॅट असते म्हणून ते जास्त प्रमाणात न खाण्याचा सल्ला दिला जातो. तुम्ही जर कधी प्राण्यांचे मांस आणि प्लांट बेस्ड मीट यांची तुलना केली. तर यात प्लांट बेस्ड मीट हा अधिक आरोग्यदायी पर्याय आहे. म्हणूनच तुम्ही त्याचे सेवन करू शकता. पण, ते ठराविक प्रमाणातच घ्यावे. फक्त प्लांट बेस्ड मीट लाच शरीराला प्रथिने पुरवण्याचा एकमेव स्रोत बनवू नका, असे तज्ञांचे म्हणणे आहे. जे लोक पूर्ण शाकाहारी आहेत. त्याच्यासाठी प्लांट बेस्ड मीट हा प्रथिने मिळवण्याचा एक चांगला पर्याय आहे. प्लांट बेस्ड मीट खाल्ल्यानं त्यांच्या शरीराला प्रथिने, व्हिटामिन आणि अन्य पोषक घटक मिळतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या