जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Diabetes रुग्णांची ब्लड शुगर राहील नियंत्रणात; रात्री झोपण्यापूर्वी नक्की करा ही 5 कामं

Diabetes रुग्णांची ब्लड शुगर राहील नियंत्रणात; रात्री झोपण्यापूर्वी नक्की करा ही 5 कामं

Diabetes रुग्णांची ब्लड शुगर राहील नियंत्रणात; रात्री झोपण्यापूर्वी नक्की करा ही 5 कामं

मधुमेहाच्या रुग्णांना (Diabetes patient) वारंवार भूक व तहान लागते, तसेच त्यांना वॉशरूममध्ये जाण्याची जास्त गरज भासते, त्यामुळे अनेकवेळा त्यांना नीट झोप लागत नाही. अशा परिस्थितीत त्यांनी झोपण्यापूर्वी 5 महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी : मधुमेहाच्या रुग्णांना नेहमीच आपल्या रक्तातील साखरेची पातळी (Blood sugar levels) कशी नियंत्रणात ठेवायची याची चिंता लागलेली असते. सध्याच्या काळातील चुकीच्या जीवनशैलीमुळं (Lifestyle) हे करणं खूप अवघड काम आहे. परंतु, आरोग्याची काळजी घेत काही चांगल्या सवयी अंगीकारणं खूप गरजेचं आहे. मधुमेहाच्या (Diabetes ) रुग्णांनी झोपण्यापूर्वी काय करावं? मधुमेहाच्या रुग्णांना (Diabetes patient) वारंवार भूक व तहान लागते, तसेच त्यांना वॉशरूममध्ये जाण्याची जास्त गरज भासते, त्यामुळे अनेकवेळा त्यांना नीट झोप लागत नाही. अशा परिस्थितीत त्यांनी झोपण्यापूर्वी 5 महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे जेणेकरून झोप चांगली येते आणि रक्तातील साखरेची पातळीही राखली जाते. 1. झोपण्यापूर्वी काय खावे झोपेच्या वेळी मधुमेहाच्या रुग्णांना हार्मोनल बदल, इन्सुलिनची कमतरता यामुळे त्रास होतो, त्यामुळे त्यांनी रात्रीच्या जेवणात जास्त फायबर आणि कमी फॅटी चीज खाऊ नयेत, कारण यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते, रात्रीच्यावेळी जास्त अन्नही खाऊ नका. 2. रक्तातील साखर तपासा मधुमेही रुग्णांनी झोपण्यापूर्वी त्यांच्या रक्तातील साखरेची चाचणी केल्यास, औषधे आणि इतर उपचारांमुळे तुमच्या रक्तातील साखर नियंत्रणात आहे की नाही हे शोधणे डॉक्टरांना सोपे जाते. झोपेच्या वेळी रक्तातील साखर 90 ते 150 मिलीग्राम प्रति डेसीलिटर (mg/dL) पर्यंत असायला हवी. 3. कॅफिन नको कॅफिन असलेल्या गोष्टी मेंदूला चालना देतात आणि त्यामुळे मधुमेही रुग्णांना नीट झोप येत नाही. त्यामुळे चहा, कॉफी, चॉकलेट आणि सोडा अशा गोष्टी खाणं टाळावं. कारण त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. हे वाचा -  Diabetes diet: हिवाळ्यात मधुमेही रुग्णांचा योग्य आहार काय? जाणून घ्या न्याहारीपासून रात्रीच्या जेवणापर्यंत 4. रात्रीच्या जेवणानंतर चाला मधुमेहाच्या रुग्णांनी रात्रीच्या जेवणानंतर आणि झोपण्यापूर्वी फिरायला जावं, यामुळे तुमची रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. झोपण्यापूर्वी हलका व्यायाम केल्यानं चांगली आणि लवकर झोप येण्यास मदत होते. हे वाचा -  तुम्हालाही मधुमेह झालेला नाही ना? जर शरीरात दिसत असतील अशी लक्षणं तर काळजी घ्या 5. या गोष्टींची विशेष काळजी घ्या मधुमेही रुग्णांनी आपल्या खोलीचे वातावरण असे बनवावे की झोप लवकर आणि सहज येईल, शरीराला आराम मिळेल आणि मनावर अजिबात ताण येऊ देऊ नये. लवकर झोपण्याची सवय ठेवल्यास आपले आरोग्य सुधारेल. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात