मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

फक्त लेकीच्या चेहऱ्यावर हसू यावं म्हणून बाबाने आपल्या छातीवर...; बापाचं असं प्रेम पाहून तुमच्या डोळ्यात पाणी येईल

फक्त लेकीच्या चेहऱ्यावर हसू यावं म्हणून बाबाने आपल्या छातीवर...; बापाचं असं प्रेम पाहून तुमच्या डोळ्यात पाणी येईल

आपल्या चिमुकल्या लेकीच्या चेहऱ्यावर फक्त हसू यावं यासाठी तिच्या बाबाने जे केलं, ते भावुक करणारं आहे.

आपल्या चिमुकल्या लेकीच्या चेहऱ्यावर फक्त हसू यावं यासाठी तिच्या बाबाने जे केलं, ते भावुक करणारं आहे.

आपल्या चिमुकल्या लेकीच्या चेहऱ्यावर फक्त हसू यावं यासाठी तिच्या बाबाने जे केलं, ते भावुक करणारं आहे.

  • Published by:  Priya Lad

वॉशिंग्टन, 10 फेब्रुवारी : आपल्या लेकाच्या सुखासाठी आपलं काळजही काढून देणारी आई सर्वांना माहिती आहे. पण बापाचं काळीजही मुलांसाठी असंच तुटत असतं, हे एका बापाने दाखवून दिलं आहे. आपल्या चिमुकल्या लेकीच्या चेहऱ्यावर फक्त हसू यावं यासाठी तिच्या बाबाने जे केलं, ते पाहून तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही (Father daughter love).

अमेरिकेत राहणारी 4 वर्षांची एवर्ली बॅक (Everly). जिला जन्मापासून हृदयाचा आजार होता. डॉक्टरांनी तिला ओपन हार्ट सर्जरी करायला लावली. मेट्रोच्या रिपोर्टनुसार डॉक्टरांनी तिला ओपन हार्ट सर्जरी  (Open Heart Surgery) करायला सांगितली. त्यावेळी ती फक्त 3 दिवसांची होती.

ओपन हार्ट सर्जरीमुळे तिच्या छातीवर ऑपरेशनची खूण राहिली. डॉक्टरांच्या मते, पुढे काही प्रक्रिया करायची झाल्यास हाच स्कार खोलून ती केली जाईल. पण या खूणेमुळे एवर्लीमध्ये न्यूनगंड आला. तिच्या चेहऱ्यावरील हसू गायब झालं होतं. एवर्लीला चांगलं वाटावं म्हणून तिला हा झिपचा डाग आहे तो पुढे जाऊन उघडला जाईल, असं सांगितलं जायचं.

हे वाचा - Alert! कोरोनासोबत आणखी एका व्हायरसचा 'ताप'; 'त्या' आजाराने पुन्हा डोकं वर काढलं

पण आपल्या लेकीची अशी अवस्था तिच्या वडिलांना पाहवली नाही. आपल्या लेकीच्या चेहऱ्यावर एक हसू पाहण्यासाठी ते आतूर होते. त्यासाठी ते काहीही करायला तयार होते. आपल्या मुलीला आपण छातीवरील या खूणेमुळे वेगळे आहोत असं वाटू नये म्हणून त्यांनी एक निर्णय घेतला.

एबीसीशी बोलताना एवर्लीचे वडील मॅट बॅक यांनी सांगितलं, एवर्ली या डागाबाबत वारंवार विचारत राहायची. त्यामुळे मी विचार केला जर माझ्याकडे असं काही असेल तर तिला एकटीला आपण वेगळं आहोत असं वाटणार नाही. त्यामुळे त्याने सर्जरी स्कारसारखा टॅटू आपल्या छातीवर बनवला.

आपल्या लेकीच्या चेहऱ्यावर एक छोटंसं हसू आणण्यासाठी तिच्या वडिलांनीही आपल्या छातीवर तसा डाग करून घेतला. त्यांनी आपल्या छातीवर मुलीच्या छातीवरील सर्जरीच्या स्कारप्रमाणे स्कार बनवला. आपल्या छातीप्रमाणे वडिलांच्या छातीवर खूण पाहून मुलीच्या चेहऱ्यावरही हसू आलं.

हे वाचा - विचित्र त्वचा असलेली Miracle baby; डॉक्टरांची मृत्यूची भविष्यवाणीही खोटी ठरवली

आता एवर्लीच्या 10 वर्षांच्या भावालासुद्धा असा टॅटू काढायचा आहे. पण त्याला 18 वर्षांचा होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल.

First published:

Tags: Daughter, Father, Lifestyle, Parents and child