अशी घ्या काळजी
मुंबई, 28 फेब्रुवारी: डिजिटायझेशन आणि डिजिटलायझेशनच्या जमान्यात स्मार्टफोनचा वापर प्रचंड वाढला आहे. दिवसभरात सतत स्मार्टफोन वापरामुळे स्क्रीन टाईमदेखील वाढला आहे. याचा आपल्या डोळ्यांवर दुष्परिणाम होण्यास सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वीच याचं एक उदाहण समोर आलं आहे. हैदराबाद अपोलो हॉस्पिटल्समधील न्यूरॉलॉजिस्ट डॉ. सुधीर कुमार यांनी काही ट्विट्स शेअर केले होते. ज्यामध्ये त्यांनी एका 30 वर्षीय महिलेनं स्मार्टफोनमुळे दृष्टी कशी गमावली, याबाबत माहिती दिली होती. स्मार्टफोनच्या वापराबाबत काही उपाय योजले पाहिजेत असंही त्यांनी सांगितलं होतं. टाइम्स ऑफ इंडियाच्या टेक टीमनं या प्रकरणी दिल्ली-एनसीआरमधील काही नेत्रतज्ज्ञांची मतं जाणून घेतली. स्मार्टफोन मानवी डोळ्यांसाठी धोकादायक असल्याचा कोणताही ठोस अभ्यास झालेला नाही, असं सर्वसाधारण मत आहे. पण, त्यांचा दीर्घकाळ वापर डोळ्यांना हानी पोहोचू शकतो. हे टाळण्यासाठी काही टिप्स डॉक्टरांनी शेअर केल्या आहेत. ‘गॅझेट नाऊ’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. मोबाईल स्क्रीनमधील ब्राइटनेस सेटिंग्ज अॅडजेस्ट करा: खूप जास्त आणि खूप कमी ब्राइटनेस व कॉन्ट्रास्ट आपल्या डोळ्यांसाठी हानिकारक आहेत. या बाबी तुम्ही तुमच्या डिव्हाइसच्या सेटिंग्जमध्ये जाऊन अॅडजेस्ट करू शकता. डोळ्यांची काळजी घेण्यासाठी तुमच्या फोनमधील बिल्ट-इन ब्राइटनेस आणि कॉन्ट्रास्ट सेटिंग्ज वापरणं हा एक चांगला पर्याय आहे. मोदी सरकारकडून मोठा दिलासा! Diabetes, BP, Cancer Medicine स्वस्त; इथं पाहा किमतीसह औषधांची यादी डोळ्यांची उघडझाप करायला विसरू नका: नियमितपणे (एका सेकंदापेक्षा जास्त) पापण्यांची उघडझाप करणं फार गरजेचं आहे. त्यामुळे तुमच्या डोळ्यातील ओलसरपणा टिकून राहतो आणि ताण कमी होतो. फोन वापरत असताना तुम्ही दर अर्ध्या तासात 10 ते 20 वेळा डोळ्यांची उघडझाप होते आहे ना याची खात्री करा. पापण्यांची उघडझाप केल्यानं डोळ्यांना पुन्हा फोकस करण्यात मदत होते. डार्क मोड वापरा: डार्क मोडला डार्क थीम म्हणूनदेखील म्हणतात. हे सेटिंग आता जवळजवळ सर्व स्मार्टफोन मॉडेल्समध्ये उपलब्ध आहे. तुमचं डिव्हाइस डार्क मोडवर स्विच करणं म्हणजे ते डार्क बॅकग्राउंडवर पांढरा मजकूर प्रदर्शित करेल. डार्क मोडचा वापर केल्यास निळ्या लाईटचं एक्सपोजर कमी होतं. यामुळे डिजिटल आय स्ट्रेनमध्ये मदत होते. फोनच्या डिस्प्ले सेटिंग्जद्वारे डार्क मोड ऑन करता येतो. तुमच्या स्मार्टफोनवरील मजकुराचा आकार वाढवा: तुमच्या स्मार्टफोनच्या स्क्रीनवरील मजकूराचा (टेक्स्ट) आकार मोठा असल्याची खात्री करा. लहान मजकुरामुळे डोळ्यांवर अधिक ताण येतो. तुम्ही सेटिंग्जमध्ये जाऊन मजकूराचा आकार सहज बदलू शकता. सर्व स्मार्टफोन तुम्हाला कॉन्ट्रास्ट, ब्राइटनेस आणि टेक्स्ट सेटिंग्ज बदलण्याची परवानगी देतात. मेसेज सहज वाचता येतील यासाठी टेक्स्टचा आकार वाढवला पाहिजे. सुंदर दिसण्यासाठी भरपूर खा लिची, त्वचेला होणारे फायदे वाचून थक्क व्हाल! आयफोनमध्ये स्क्रीन टाईम आणि अँड्रॉईड डिव्हाइसमध्ये डिजिटल वेलबीइंग फीचर वापरा: आयफोन आणि अँड्रॉईड फोनमध्ये अशी सेटिंग्ज असतात जी डिव्हाइसवरील तुमचा स्क्रीन टाईम कमी करण्यात मदत करतात. आयफोनमधील स्क्रीन टाइमसह, युजर्स त्यांचा एखादं अॅप वापरण्याची वेळ व्यवस्थापित करू शकतात, डिव्हाइसपासून दूर जाण्याची वेळ शेड्यूल करू शकतात. याशिवाय, जेव्हा त्यांना त्यांच्या डिव्हाइसपासून दूर जायचं असेल तेव्हा ते अॅप्स किंवा नोटिफिकेशन ब्लॉकदेखील करू शकतात. त्याचप्रमाणे अँड्रॉईड फोनमध्ये, डिजिटल वेलबीइंग फीचर आहे. यामध्ये वापरकर्त्यांना झोपेवर लक्ष केंद्रित करण्यात मदत करण्यासाठी अॅप लिमिट टाइमर आणि ‘वाइंड डाउन’ किंवा ‘बेडटाइम’ मोडसारख्या उपयुक्त बाबींचा समावेश आहे. आयफोनमधील नाईट शिफ्ट आणि अँड्रॉईड फोनमधील नाईट लाईट वापरा: आयफोनमधील नाईट शिफ्ट आणि अँड्रॉईड फोनमधील नाईट लाईट फीचर डिस्प्लेतील कलर स्पेक्ट्रमच्या पोआप अॅडजस्ट करू शकतात. त्यामुळे डोळ्यांना आराम मिळतो. तुमच्या स्मार्टफोनची स्क्रीन स्वच्छ ठेवा: स्मार्टफोनची स्क्रीन अतिशय सहजपणे खराब होऊ शकते. अस्वच्छ हातांनी फोन हाताळल्यास किंवा तो खराब जागेवर ठेवल्यास त्याची स्क्रीन खराब होते. अस्वच्छ स्क्रीनकडे सतत पाहिल्यास आपल्या डोळ्यांवर अतिरिक्त ताण पडतो. त्यामुळे फोनची स्क्रीन सतत स्वच्छ करणं गरजेचं आहे. मऊ कापड किंवा साध्या मायक्रोफायबर कापडानं फोनची स्क्रीन स्वच्छ करता येते.
20/20/20 हा नियम पाळा: स्मार्टफोन वापरासाठी 20/20/20 हा एक नियम आहे. याचा अर्थ असा की, दर 20 मिनिटांनी तुम्ही किमान 20 फूट अंतरावर असलेली एखादी गोष्ट किमान 20 सेकंद पाहली पाहिजे. यामुळे तुमच्या डोळ्यांचं संरक्षण होण्यास मदत होते.