औषधांच्या किमती ठरवणारी राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणाने १०९ व्या बैठक झाली. या बैठकीत 74 औषधांच्या रिटेल किमती निर्धारित करण्यात आल्या आहेत.
केंद्र सरकारने 74 औषधांच्या किमती निर्धारित केल्यानंतर या औषधांच्या किमती कमी झाल्या आहेत, म्हणजे ही औषधं आता स्वस्त झाली आहेत.
स्वस्त झालेल्या औषधांच्या यादीत ब्लड प्रेशर, डायबेटिज, कॅन्सरवरील औषधांचाही समावेश आहे. त्यामुळे या रुग्णांसाठी मोदी सरकारने दिलेला हा मोठा दिलासा आहे.
डायबेटिजचं औषध डेपाग्लीफ्लोजन आणि मेटाफॉर्मिनची एक टॅबलेट 27.75 रुपयांना मिळणार आहे. अॅस्ट्राझेनका कंपनीचं ही एक टॅबलेट सध्या 33 रुपयांना मिळते.
ब्लड प्रेशरवरील एल्मिसार्टन आणि बिसोप्रोलोलची एक टॅबलेट 10.92 रुपये झाली आहे. ज्याची किंमत आतापर्यंत 14 रुपये होती.
कॅन्सर रुग्णांच्या उपचारात केमोथेरेपीवेळी वापरलं जाणारं इंजेक्शेन फिलग्रास्टिनची किंमत 1034.51 रुपये निर्धारित करण्यात आली आहे. या इंजेक्शनची किंमत कंपनीनुसार वेगवेगळी आहे. पण ती दोन हजारांच्या वरच आहे. म्हणजे आता ही किंमत निम्मी झाली.