पुण्याच्या शनिवारवाड्याचं काय आहे गूढ?
पुणे म्हंटलं की आपल्या डोळ्यांसमोर दोन गोष्टी येतात. एक म्हणजे मँगो मस्तानी आणि दुसरा म्हणजे शनिवार वाडा.
पुण्यात गेलात आणि शनिवार वाडा बघितला नाहीत असं होणं शक्य नाही.
पण काही लोकांच्या मते हाच बाजीराव पेशव्यांचा शनिवार भुतिया आहे. शनिवार वाड्याबद्दल तुम्हीही अनेकदा अशा गोष्टी ऐकल्या असतील.
काही लोकांच्या मते दर अमावास्या आणि पौर्णिमेला रात्री "काका मला वाचवा" अशा किंकाळ्या इथून ऐकू येतात.
तर संध्याकाळीनंतर वाड्यात प्रवेशाला बंदी असल्यामुळे या गोष्टीचं गूढ अधिकच वाढतं.
इतकंच काय तर भर वस्तीत असूनही रात्रीच्या वेळी हा वाडा भयाण दिसतो असं स्थानिक लोक सांगतात.
शनिवार वाडा इतिहासातील अनेक शुभ आणि क्रूर गोष्टींचा साक्षीदार आहे. त्यामुळे असं घडत असावं असं काही लोक म्हणतात.
मात्र या सर्व गोष्टी लोकांनी सांगितलेल्या भाकड कथा आहेत असं काही जाणकार सांगतात.
त्यामुळे अशा गोष्टींवर विश्वास ठेवणं न ठेवणं हे प्रत्येकाच्या बुद्धीवर अवलंबून आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.
(सूचना : येथे दिलेली माहिती भाकड कथांवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.