JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Drinking Water: प्रत्येक वेळी पाणी पिताना बसणं गरजेचं आहे का? योग्य पद्धत अनेकांना माहीत नाही

Drinking Water: प्रत्येक वेळी पाणी पिताना बसणं गरजेचं आहे का? योग्य पद्धत अनेकांना माहीत नाही

आपल्या मेंदूला योग्यरित्या कार्य करण्यासाठी 80 टक्के पाण्याची आवश्यकता असते. तसेच आपल्या फुफ्फुसांना 90 टक्के, रक्त 83 टक्के, हाडे 30 टक्के आणि त्वचेला 64 टक्के पाण्याची आवश्यकता (Proper method of watering) असते.

जाहिरात

पाणी पिणे - अन्न खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. त्यामुळे अन्नाचे पचन व्यवस्थित होत नाही. जेवल्यानंतर अर्ध्या तासाने पाणी प्यायला हरकत नाही.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 02 मार्च : पाणी (water) हे आपल्या जीवनासाठी किती महत्त्वाचे आहे, हे कोणाला नवीन सांगण्याची आवश्यकता नाही. पाण्याशिवाय (Drinking Water) जीवनाची कल्पनाही करता येत नाही. मानवी शरीराचा 70 टक्के भाग पाण्याने बनलेला आहे. यावरून पाण्याचे महत्त्व कळू शकते. आपल्या मेंदूला योग्यरित्या कार्य करण्यासाठी 80 टक्के पाण्याची आवश्यकता असते. तसेच आपल्या फुफ्फुसांना 90 टक्के, रक्त 83 टक्के, हाडे 30 टक्के आणि त्वचेला 64 टक्के पाण्याची आवश्यकता (Proper method of watering) असते. पाणी उभं राहून प्यावं की बसून? झी न्यूज ने दिलेल्या बातमीनुसार, निरोगी प्रौढ व्यक्तीने दिवसभरात तीन ते साडेतीन लिटर ग्लास पाणी पिणं आवश्यक आहे. यामुळं शरीरातील पाण्याची पातळी योग्य राहते. उन्हाळ्यात तर अधिक काळजी घ्यायला हवी. पाणी पिण्याविषयी सर्वात मोठा प्रश्न असा पडतो की? पाणी बसून प्यावं की उभं राहून? जाणून घेऊ या प्रश्नाचं उत्तर. उभं राहून पाणी पिणं आपण अनेकदा उभ्या-उभ्या ग्लास किंवा बाटली उचलून सरळ प्यायला सुरुवात करतो. असं करण्यामुळं फारसा काही फरक पडत नाही, असं आपल्याला वाटतं. परंतु ही पाणी पिण्याची योग्य पद्धत नाही. जेव्हा आपण उभं राहून पाणी पिता, तेव्हा शरीराला पाण्याची गरज असते मात्र, त्यातून पोषक तत्त्वं पूर्णपणे मिळत नाहीत. यामुळं शरीराला फायदा होत नाही. हे वाचा -  तुम्हीही वारंवार चेहरा ब्लीच करताय का? त्याचे दुष्परिणामही वेळीच समजून घ्या बसून पाणी पिणं ठरतं योग्य उभं राहून पाणी प्यायल्यानं द्रव सरळ धारेच्या स्वरूपात वाहतो. तर बसून पाणी प्यायल्यानं संपूर्ण अन्ननलिका आणि जठरात पाणी पसरतं. हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्या शरीराची रचना अशा प्रकारे असते की कोणताही द्रव पदार्थ बसून पिणं सर्वात फायदेशीर आहे. यामुळं पाणी मेंदूपर्यंत पोहोचतं आणि शरीरातील सर्व क्रिया निरोगी राहतात. असे केल्यानं पचनक्रिया सुरळीत राहून शरीरातील घाण बाहेर निघण्यास मदत होते. हे वाचा -  पित्ताचा त्रास होण्यात सकाळच्या या चुका कारणीभूत ठरतात; आजपासूनच ताबडतोब बदला (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या