जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Bleaching: तुम्हीही वारंवार चेहरा ब्लीच करताय का? त्याचे दुष्परिणामही वेळीच समजून घ्या

Bleaching: तुम्हीही वारंवार चेहरा ब्लीच करताय का? त्याचे दुष्परिणामही वेळीच समजून घ्या

3- लस्सीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट त्वचेसाठीही खूप फायदेशीर असतात. हे फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून त्वचेचे रक्षण करते.

3- लस्सीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट त्वचेसाठीही खूप फायदेशीर असतात. हे फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून त्वचेचे रक्षण करते.

Side Effects Of Bleaching face : ब्लीचमुळं होणारी हानी टाळण्यासाठी, आपण ते शक्य तितकं कमी वापरणं आवश्यक आहे. आवश्यकतेनुसार किंवा फक्त कोणत्याही कार्याक्रमात सहभागी होण्याआधी ब्लीच करा. 3 ते 4 आठवड्यांच्या अंतरानं ब्लीचचा वापर करा.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी: जेव्हा आपण आपली त्वचा (Skin) ब्लीच (Bleach) करतो, तेव्हा त्यामुळे चेहऱ्यावरील केसांचा रंग सोनेरी होतो आणि चेहऱ्यावर चमक येते. चेहऱ्यावर झटपट चमक येण्यासाठी बरेच लोक नियमितपणे ब्लीच करतात. पण वारंवार किंवा काही दिवसांतच ब्लीचिंग केल्यानंही चेहऱ्याशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. उदाहरणार्थ, चेहऱ्याची त्वचा कोरडी होणं, संवेदनशील होणं, चेहऱ्यावर खाज येणं आदी. मात्र, ब्लीचमुळं आणखी इतरही अनेक समस्या उद्भवू शकतात, ज्या आरोग्यासाठी (Side Effects of Bleaching Face) धोकादायक ठरू शकतात. ब्लीच किती दिवसांत करावं? ब्लीचमुळं होणारी हानी टाळण्यासाठी, आपण ते शक्य तितकं कमी वापरणं आवश्यक आहे. आवश्यकतेनुसार किंवा फक्त कोणत्याही कार्याक्रमात सहभागी होण्याआधी ब्लीच करा. 3 ते 4 आठवड्यांच्या अंतरानं ब्लीचचा वापर करा. याहून कमी कालावधीत वारंवार ब्लीच केल्यास त्वचेचं आणि संपूर्ण शरीराच्या आरोग्याचं खूप नुकसान होऊ शकतं. ब्लीचिंगचे तोटे अनेक रोगांचा धोका OnlyMyHealth च्या मते, संशोधनात असं आढळून आलंय की, त्वचेला वारंवार ब्लीच केल्यास त्वचा सुन्न होणं, उच्च रक्तदाब, थकवा, प्रकाशात त्वचेला हानी पोहोचणं, मूत्रपिंडाचं नुकसान आदी समस्या निर्माण होऊ शकतात. त्वचा रोगाचा धोका संवेदनशील त्वचेच्या लोकांनी ब्लीचिंग केल्यानं त्वचेशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. ब्लीचमध्ये काही रसायनं आढळतात, ज्यामुळं त्वचेवर जळजळ होण्याची समस्या निर्माण होऊ शकते. त्वचा लाल होणं, फोड येणं, त्वचेचे व्रण, कोरडी त्वचा, खवलेयुक्त त्वचा, खाज आणि जळजळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात. हे वाचा -  रात्र-रात्रभर झोप येत नाही? ही ट्रिक वापरून 60 सेंकदात व्हाल गुडूप,एकदा करून बघा नेफ्रोटिक डिसीज जास्त ब्लीच केल्यानं नेफ्रोटिक सिंड्रोम होऊ शकतो. नेफ्रोटिक सिंड्रोम हा मूत्रपिंडाचा विकार आहे. याच्यामध्ये मूत्रपिंडातील रक्तवाहिन्यांना हानी पोहोचते आणि शरीराला कचरा आणि अतिरिक्त पाणी बाहेर काढणं कठीण होऊ शकतं. हे वाचा -  मास्क घालायलाच नको; सरळ नाकात लावता येईल हा एअर प्युरिफायर, N-95 इतकाच सुरक्षित ब्लीच वापरण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा - प्रथम ब्लीचचा वापर स्वतःच्या हातावर करून पहा. हाताच्या त्वचेला काही त्रास होतो का, ते पहा. - ब्लीच केल्यानंतर त्वचेला स्क्रब करणं टाळा आणि ब्लीच लावताना ते डोळ्यांपासून आणि ओठांपासून दूरून लावा. - चेहऱ्याला ब्लीच केल्यानंतर उन्हात जाणं टाळा. कारण ब्लीच केल्यानंतर सूर्यकिरणांमुळं त्वचेला नुकसान होण्याचा धोका वाढतो. बाहेर जावंच लागलं तर, सनस्क्रीन लावल्याशिवाय जाऊ नका. दर दोन ते तीन तासांनी सनस्क्रीन पुन्हा लावा. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: skin , skin care
  • First Published :
जाहिरात
जाहिरात