जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Acidity चा त्रास होण्यात सकाळच्या या चुका कारणीभूत ठरतात; आजपासूनच ताबडतोब बदला

Acidity चा त्रास होण्यात सकाळच्या या चुका कारणीभूत ठरतात; आजपासूनच ताबडतोब बदला

Acidity चा त्रास होण्यात सकाळच्या या चुका कारणीभूत ठरतात; आजपासूनच ताबडतोब बदला

Health News: अॅसिडिटीची समस्या सतत होत राहिल्यास त्यामुळे पोटाशी संबंधित गंभीर आजारही होऊ शकतात. काही वेळा आपल्या छोट्या-छोट्या चुकाही अॅसिडिटीचे कारण ठरतात.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी : प्रत्येकाला कधी ना कधी अॅसिडिटीचा (Acidity) त्रास सहन करावा लागतो. सामान्यतः जास्त मसालेदार किंवा तळलेले-चमचमीत पदार्थ खाल्ल्यानं अॅसिडिटीची समस्या उद्भवते. मात्र, अॅसिडिटीची समस्या सतत होत राहिल्यास त्यामुळे पोटाशी संबंधित गंभीर आजारही होऊ शकतात. काही वेळा आपल्या छोट्या-छोट्या चुकाही अॅसिडिटीचे कारण ठरतात. अनेकांना दररोज सकाळी चहा पिण्याची सवय असते. या सवयीमुळे अॅसिडिटीही होऊ शकते. जे लोक रिकाम्या पोटी चहा पितात त्यांना अॅसिडिटी होण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळं रिकाम्या पोटी चहा पिणं शक्यतो (Acidity Home Remedies) टाळावं. रिकाम्या पोटी चहा पिणं - सकाळी उठून चहा (Tea) न पिणारे फार कमी लोक असतील. बहुतेक लोकांना सकाळी उठल्याबरोबर थेट रिकाम्या पोटी चहा पिण्याची सवय असते. पण, तुम्हाला माहीत आहे का की तुमची ही सवय नकळत तुमच्यासाठी अॅसिडिटीची समस्या निर्माण करू शकते. वास्तविक, रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने पित्त रसावर परिणाम होतो आणि पोटात आम्लपित्त तसेच मळमळ आणि उलट्यासारखे त्रास होऊ शकतात. यासोबतच सकाळी चहा प्यायल्याने लोहाचीही कमतरता होऊ शकते. अॅसिडिटी वाढल्यामुळे पोटात जळजळ आणि आंबट ढेकर येणे यासारख्या समस्यांना सामोरं जावे लागतं. सततच्या अ‌ॅसिडिटीमुळे ही समस्या गॅस्ट्रो-एसोफेजियल रोगात बदलू शकते. हे वाचा -  लसणाला कोंब आले म्हणून लगेच फेकू नका; आरोग्यासाठी त्याचे आहेत दुप्पट फायदे अ‌ॅसिडिटी कशी टाळायची टोमॅटोमध्ये अल्कलीचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे त्याचे नियमित सेवन अॅसिडिटीमध्ये फायदेशीर ठरते. अननसाचा रस नियमित प्यायल्याने अॅसिडिटीमध्ये आराम मिळतो. अन्न खाल्ल्यानंतर चालण्याने अॅसिडिटी होण्यापासून प्रतिबंध होतो. सकाळी उठल्यानंतर नियमितपणे 2-3 ग्लास थंड पाणी प्यायल्याने आम्लपित्ताची निर्मिती थांबते. हे वाचा -  किडनी खराब होऊ लागल्याची अशी असतात 4 लक्षणं; त्वचेवरील या बदलांकडे दुर्लक्ष नको डाळिंब आणि आवळा वगळता इतर लिंबूवर्गीय फळे खाणे टाळा. नाश्त्यामध्ये पपईचे नियमित सेवन केल्यास अॅसिडिटीच्या समस्येवर मात करण्यास मदत होते. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात