JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / न्यूजपेपर रद्दीत देण्याऐवजी फ्रिजमध्ये ठेवा; काय फायदा होतो एकदा पाहाच हा VIDEO

न्यूजपेपर रद्दीत देण्याऐवजी फ्रिजमध्ये ठेवा; काय फायदा होतो एकदा पाहाच हा VIDEO

न्यूजपेपरचा असा वापर तुम्ही ना कधी ऐकला असेल, ना पाहिला असेल.

जाहिरात

फ्रिजमध्ये न्यूजपेपर ठेवण्याचा फायदा.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 05  मे : टीव्ही, मोबाईल यावर बातम्या वाचता, पाहता येत असल्या तरी आजही बऱ्याच लोकांच्या घरात दररोज न्यूजपेपर येतो. त्यांना न्यूजपेपर वाचण्याची सवय लागलेली असते. सामान्यपणे त्या दिवसाचा न्यूजपेपर वाचल्यानंतर तो जुना होतो. असे जुने न्यूजपेपर जमवून आपण त्याचा गठ्ठा तयार करतो आणि मग ते रद्दीत देतो. पण न्यूजपेपरचा आम्ही तुम्हाला असा एक वापर दाखवणार आहे, ज्याबाबत तुम्ही आजवर कधीच ऐकलं, पाहिलं नसेल. न्यूजपेपरचा काही लोक आणखी काही कारणांसाठी वापर करतात. पण फ्रीजमध्ये न्यूजपेपर ठेवण्याचा असा वापर कुणीच केला नसेल किंवा कुणाला माहितीही नसेल. फ्रीजमध्ये न्यूजपेपर ठेवल्याने खूप मोठा फायदा होता. न्यूजपेपरच्या या साध्यासोप्या उपायाने तुमची खूप मोठी समस्या यामुळे दूर होईल. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल ही तर कमालच झाली. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, यात बरेच वेगवेगळ्या घरगुती टीप्स देण्यात आल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे फ्रीजमध्ये न्यूजपेपर ठेवण्याची. चपातीच्या पिठात साबण नक्की टाका; काय कमाल होते पाहा VIDEO ही महिला न्यूजपेपरचं एक पान घेते. त्याचा गोळा करते. तो ती पाण्यात भिजवून घेते. हा भिजवलेला न्यूजपेपरच्या पानाचा गोळा ती दुसऱ्या एका वाटीत ठेवते आणि ती वाटी फ्रीजमध्ये ठेवते. महिलेने सांगितल्यानुसार या उपायामुळे फ्रीजमध्ये वास जातो. तुम्हाला माहिती असेल फ्रीजमध्ये काही पदार्थ ठेवल्याने त्या पदार्थांचा वास फ्रीजमध्ये येतो. फ्रीजमधील हा वास घालवण्यासाठी लोक काय काय नाही करत. प्रत्येक जण आपापल्या परीने उपाय करतात. पण हा उपाय अगदी साधासोपा आहे. यात फार काही लागत नाही आणि फार मेहनत घेण्याचीही गरज नाही. नेल कटरमध्ये येणाऱ्या दोन लहान सुऱ्यांचा उपयोग काय, तुम्हाला माहितीय? पिंक्स इनोव्हेशन या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

हा उपाय प्रभावी ठरेलच याची शाश्वती न्यूज 18 लोकमत देत नाही. पण तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम काय येतो, तो आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या