जाहिरात
मराठी बातम्या / Viral / नेल कटरमध्ये येणाऱ्या दोन लहान सुऱ्यांचा उपयोग काय, तुम्हाला माहितीय?

नेल कटरमध्ये येणाऱ्या दोन लहान सुऱ्यांचा उपयोग काय, तुम्हाला माहितीय?

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

नेल कटरमधील चाकूचा वापर अनेक लोक नख साफ करण्यासाठी वापरतात. पण तो नक्की कशासाठी असतो किंवा त्याचा योग्य वापर तुम्हाला माहितीय का?

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 5 मे : शाळेपासूनच आपल्याला नित्याने करण्याच्या गोष्टी सांगितल्या जातात. त्यांपैकी दात घासणे, अंघोळ करणे आणि नखे कापणे हे महत्वाचे असते. तसेच नखांची स्वच्छता पाळणे देखील महत्वाचे असते. कारण यामुळे आपल्याला पोटाचे आजार होतात. नखे लांब असतील तर त्यात घाण साचते. त्यामुळे ते कापणे किंवा साफ करणे गरजेचं आहे. मुख्यता नख कापण्यासाठी नेलकटरचा वापर केला जातो. तुम्ही पाहिले असेल की, काही नेल कटरमध्ये दोन चाकू सारखी साधने देखील येतात. त्यांचे काम काय आहे माहीत आहे का? अनेकांना याचा उपयोगच माहिती नाही. वास्तविक, नेल कटरचे काम फक्त नखे कापण्यासाठीच असतो. त्यामुळे नख कापण्याशिवाय त्याचा आणखी वापर होत नाही, मग अशा परिस्थितीत त्याची उपयुक्तता वाढवण्यासाठी त्यात २ चाकूसारखे उपकरण जोडण्यात आले. त्यानंतर आता नखे कापण्याशिवाय इतर अनेक कामांमध्ये याचा वापर करता येतो. सकाळी दात न घासता पाणी पिणे योग्य की अयोग्य? आता नेलकटरमध्ये असलेल्या या दोन धारधार गोष्टींचा वापर कशासाठी करता येतो? चला पाहू चाकूचे काम खरंतर नेलकटरला दोन सुऱ्या जोडल्यानंतर नेल कटरची उपयुक्तता एवढी वाढली आहे की, आता तुम्ही कोणत्याही सहलीला सोबत घेऊन जाऊ शकता. तेथे तुम्ही ते अनेक कारणांसाठी वापरू शकता. जर तुम्ही कुठेतरी बाहेर असाल आणि तुम्हाला बाटलीचे झाकण उघडायचे असेल तर त्यासाठी नेल कटर वापरा. नेल कटरवर एक लहान वक्र आकाराचा चाकू असतो, त्याच्या मदतीने तुम्ही बाटलीचे झाकण उघडू शकता.

News18लोकमत
News18लोकमत

तुम्ही सहलीवर असाल किंवा घराबाहेर असाल तर या छोट्या चाकूच्या मदतीने तुम्ही लिंबू, संत्री किंवा अशी कोणतीही वस्तू सहज कापता येईल. याशिवाय काही लोक या चाकूंच्या धारदार टोकांचा वापर करून नखांची घाण साफ करतात. तथापि, असे करणे योग्य नाही, कारण जर थोडीशी चूक झाली तर त्याची तीक्ष्ण टोके तुमच्या बोटाला टोचू शकतात आणि तुम्हाला दुखापत करू शकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात