पुणे, 04 मे : आपण प्रत्येक जण दररोज चपाती खातो. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण यात चपाती असतेच. चपाती ही गव्हाच्या पिठापासून बनते. या पिठापासून आणखी इतरही काही पदार्थ बनतात. पण याच पिठाचा वापर आणखी एका वेगळ्या पद्धतीनेही करता येतो, याची तुम्हाला कदाचित माहिती नसेल. यासाठी चपातीच्या पिठात तुम्हाला साबण टाकण्याची गरज आहे. चपातीच्या पिठात साबण वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. पण असं का करायचं? याचा काय उपयोग? असे एक ना दोन किती तरी प्रश्न तुम्हाला पडले असतील. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं फक्त हा एक व्हिडीओ पाहून मिळतील. या व्हिडीओत चपातीच्या पिठात साबण टाकल्याने काय कमाल होते हे दाखवण्यात आलं आहे. चपाती केल्यानंतर कोरडं पीठ थोडं शिल्लक राहतं. ते आपण पुन्हा डब्यात टाकतो किंवा काही जण फेकून देतात. पण त्याऐवजी तुम्ही त्याचा आणखी एका पद्धतीने वापर करू शकता. या पिठात थोडासा साबण किसून टाका आणि मिक्स करा. तुम्ही यासाठी भांडी, कपडे किंवा अंगाचा साबणही तुम्ही वापरू शकता. हे 5 पदार्थ खाल तर होईल गडबड, पोटाचा होईल फुगा! या लोकांनी तर चुकूनही खाऊ नये आता हे पीठ तुम्ही भांडी घासण्यासाठी वापरू शकता. विशेषतः अॅल्युमिनिअमची भांडी. अॅल्युमिनिअमची भांडी घासणं म्हणजे खूप मेहनतीचं काम. ही भांडी लवकर काळी पडतात आणि स्वच्छ करण्यातही बराचसा वेळ जातो. पण साबण टाकलेलं गव्हाचं पीठ लावून ही भांडी घासली तर ती अगदी कमी वेळात, फार मेहनत न घेता स्वच्छ होतील आणि चमकू लागतील. पूर्वी साबण नव्हतं. तेव्हा असाचा काही ना काही जुगाड करून भांडी घासली जायची. या पिठात साबण टाकला नाही तरी हरकत नाही. नुसत्या गव्हाच्या पिठानेही भांडी स्वच्छ होतात. पण साबण टाकल्याने पीठ फार चिकट लागणार नाही, फेस येईल आणि भांडी घासणंही सोईस्कर होईल. गव्हाच्या पिठाने भांडी चोळल्यानंतर ती स्वच्छ पाण्यात धुवून घ्या. केसांची वाढ थांबलीय? रात्रीच्या वेळी लावा हे खास तेल, महिन्याभरात दिसेल फरक पुणेरी तडका या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
हा जुगाड खरंच फायद्याचे आहे की नाही याची शाश्वती न्यूज 18 लोकमत देत नाही. पण हा जुगाड करून पाहायला हरकत नाही. त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा आणि आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये या जुगाडाने काम केलं का ते नक्की सांगा.