JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Viral Video : स्विचबोर्डला कांदे-टोमॅटो लावा आणि काही सेकंदातच काय कमाल होते

Viral Video : स्विचबोर्डला कांदे-टोमॅटो लावा आणि काही सेकंदातच काय कमाल होते

स्विचबोर्डला कांदे-टोमॅटो लावण्याचा काय फायदा होतो, हे गृहिणींनी दाखवलं आहे.

जाहिरात

फोटो सौजन्य - यूट्युब व्हिडीओ स्क्रिनशॉट

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 19 मे : कांदा-टोमॅटोचा वापर आपण सामान्यपणे जेवणात करतो. आतापर्यंत कांदा-टोमॅटोपासून तुम्ही बरेच पदार्थ बनवले असतील. पण कधी स्विचबोर्डला कांदे-टोमॅटो लावून पाहिले आहेत का? वाचून आश्चर्य वाटेल पण खरंच हा उपाय खूप फायदेशीर आहे. स्विचबोर्डला कांदे-टोमॅटो लावल्यानंतर काय कमाल होते ते तुम्ही एकदा पाहाच. आजी-आई आणि अशा बऱ्याच गृहिणींकडे कित्येक घरगुती टीप्स असतात. अशाच काही गृहिणींनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केलेला हा व्हिडीओ. ज्यात त्यांनी कांदा-टोमॅटोचा हा अनोखा वापर करून दाखवला आहे. आजवर असा वापर तुम्ही कधीच पाहिला नसेल. त्यांनी आपल्या युट्यूब चॅनेलवर हे व्हिडीओ शेअर केले आहेत.

पहिल्यांदा पाहूया कांद्याचा स्विचबोर्डवर वापर. कांद्याचा थोडासा भाग कापून घ्या किंवा कांद्याची साल, कांद्याचा वरचा भाग घ्या आणि तो स्विचबोर्डवर चोळा. त्यानंतर कोरड्या कपड्याने स्विचबोर्ड पुसून घ्या. Recipe Video : पीठ न मळता, न लाटता बनवा गोलगोल, टम्मं फुगणारी चपाती; इथं पाहा सर्वात सोपी पद्धत तुम्हाला कांद्याचा वास सहन होत नसेल तर तुम्ही टोमॅटो वापरू शकता. टोमॅटोचाही वरचा देठाकडील भाग तसा आपण सामान्यपणे फेकून देतो. पण हाच भाग फेकून न देता तो तुमच्या स्विचबोर्डवर चोळा आणि कोरड्या कपड्याने पुसून घ्या. आता व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही स्विचबोर्ड पाहाल तर कांदा-टोमॅटो लावण्याआधी त्यावर डाग होते पण कांदा-टोमॅटो लावल्यानंतर मात्र ते डाग गायब झाले आणि तो चकचकीत झाला आहे.

स्विचबोर्डवर आपले हात लागून किंवा धूळ लागून तो खराब होतो. त्याच्यावर डाग दिसू लागतात. अशावेळी तुम्ही जर तो नुसत्या पाण्याने स्वच्छ करायला गेलात तर होत नाही. शिवाय शॉक लागण्याचीही भीती असते. त्यामुळे स्विचबोर्ड स्वच्छ करण्याचा या सर्वात सोपा असा उपाय आहे.

युट्यूब चॅनेलवर हे व्हिडीओ पोस्ट करण्यात आले आहेत. या उपायाची हमी न्यूज 18 लोकमत देत नाही. केसांना डाय लावल्यानंतर टूथपेस्टही नक्की लावा; नाहीतर काय परिणाम होईल पाहा VIDEO पण तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम कसा होता ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या