जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / केसांना डाय लावल्यानंतर टूथपेस्टही नक्की लावा; नाहीतर काय परिणाम होईल पाहा VIDEO

केसांना डाय लावल्यानंतर टूथपेस्टही नक्की लावा; नाहीतर काय परिणाम होईल पाहा VIDEO

फोटो सौजन्य - छाया रसोई युट्यूब व्हिडीओ स्क्रिनशॉट

फोटो सौजन्य - छाया रसोई युट्यूब व्हिडीओ स्क्रिनशॉट

हेअर डाय केल्यानंतर टूथपेस्ट लावण्याचा मोठा फायदा आहे.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

मुंबई, 12 मे : केस पांढरे होण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे हेअर कलर किंवा केस काळे करण्यासाठी डाय वापरलं जातं. पण केसांना डाय लावल्यानंतर आणखी एक गोष्ट करणं गरजेचं आहे. ते म्हणजे टूथपेस्ट लावणं. केसांना डाय लावल्यानंतर टूथपेस्ट लावायला हवी. याचा मोठा फायदा आहे. याचा काय फायदा होतो. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गृहिणींकडे काही ना काही टिप्स, जुगाड असतात. अशाच गृहिणींनी आपल्या सोशल मीडियावर अशाच काही टिप्सचे व्हिडीओ शेअर केले आहेत. त्यापैकी हा एक व्हिडीओ आहे. ज्यात हेअर डाय लावल्यानंतर टूथपेस्ट लावण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. याचा काय फायदा होतो, हेसुद्धा त्यांनी या व्हिडीओत दाखवलं आहे. व्हिडीओत दाखवल्यानुसार महिला एका भांड्यात हेअर डाय तयार करते. त्यानंतर ती ते आपल्या हातांवर लावते. त्यानंतर हातांना लागलेला डाय धुण्याचा प्रयत्न करते. पण काही केल्या तो डाय जात नाही. त्यानंतर ती हातावर जिथं डाय लागला आहे, तिथं टूथपेस्ट लावून चोळते. काही क्षणात हातांवरील डायचा डाग गायब होतो. फक्त साधा पेपर वाचवेल वीज; फ्रिजच्या डोअरमध्ये अडकवा, कमी होईल लाइट बिल तुम्हाला माहिती असेल केसांना डाय लावताना केसांच्या आसपासच्या त्वचेवर म्हणून डोकं, मान, कान इथंही थोडा डाय लागतो आणि मग तो निघता निघत नाही. दिसताना ते खूप विचित्र दिसतं. त्यामुळे केसांना डाय केल्यानंतर ज्या ठिकाणी आपल्याला डाय नको, तिथं ही टूथपेस्ट लावून चोळा. त्या भागावरील डायचा डाग लगेच जाईल. जर तुम्ही लगेच टूथपेस्ट लावली नाही. तर त्वचेवरील डायचे डाग सहजासहजी जाणार नाहीत. ते तसेच राहतील. त्वचेवरील जाण्यासाठी त्यांना बरेच दिवस जातील. एक्सपायर औषध गोळ्या फेकू नका, चहामध्ये टाका; मोठ्या त्रासातून मिळेल सुटका छाया रसोई युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

हा उपाय परिणामकारक आहे, याची न्यूज 18 लोकमत हमी देत नाही. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि किती परिणामकारक आहे, तसंच तुम्ही तुमच्या त्वचेवरील डाय घालवण्यासाठी काय करता, तुमच्याकडेही असा काही सोपा उपाय, टिप्स असेल तर त्यासुद्धा आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्सच्या माध्यमातून इतरांना सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात