मुंबई, 6 जुलै : आज ‘आंतरराष्ट्रीय चुंबन दिन’ म्हणजेच ‘इंटरनॅशनल किसिंग डे’ आहे. हा दिवस दरवर्षी 6 जुलैला साजरा केला जातो. तसे तर किस करण्याचे अनेक फायदे असतात. मात्र आजच्या दिवशी आम्ही तुम्हाला एक खूप महत्वाची माहिती देत आहोत. आपल्या बाळाला प्रेमाने किस करणे प्रत्येक पालकाला आवडते. मात्र हे तुमच्या बाळासाठी खूप त्रासदायक ठरू शकतं. पाहा कसं… किस, केवळ जोडप्यांमधील परस्पर प्रेम दाखवत नाही तर प्रत्येक नात्यातील प्रेम आणि बंध चुंबन दर्शवते. जसे की, एखादी आई आपल्या बाळाच्या कपाळावर प्रेमाने चुंबन घेते, भावंड किंवा इतर नातेवाईक बाळाच्या गालावर प्रेमाने किस करतात. मात्र याचा बाळाला अनेक प्रकारे त्रास होऊ शकतो. livehindustan.com ने याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
Leptospirosis : काय आहे लेप्टोस्पायरोसिस? पावसाळ्यात वाढतात या आजाराचे रुग्ण, ही असतात लक्षणंबाळाला किस करण्याचे दुष्परिणाम… - तोंडावाटे काही संसर्ग बाळापर्यंत पोहोचू शकतात. जसे की, हर्पीजचा संसर्ग. या विषाणूमुळे बाळाला कोल्ड सोअर होऊ शकतो. एखाद्या सर्दी झालेल्या प्रौढ किस केल्यास बाळाला हा त्रास होऊ शकतो. बाळाला ओठांवर किंवा तोंडाभोवती लहान फोड येऊ शकतात आणि ते चेहऱ्याच्या इतर भागांमध्ये देखील पसरू शकते. एका अहवालानुसार, हा विषाणू एकदा आला की तो आयुष्यभर राहतो.
- लहान मुलाचे चुंबन घेतल्यामुळे त्यांच्या दातांमध्ये पोकळी निर्माण होऊ शकते. लाळेमध्ये असलेल्या स्ट्रेप्टोकोकस म्युटान्स बॅक्टेरियामुळे बाळाच्या दातांमध्ये पोकळी निर्माण होऊ शकते. - किस केल्यामुळे बाळाला ऍलर्जी होण्याची शकता असते. जसे की लिपस्टिकमध्ये ग्लूटेन असते, जे सेलिआक रोग असलेल्या बाळासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे कधीही बाळाच्या ओठांवर किंवा ओठाजवळ किस करणे टाळावे.
Sea Food In Monsoon : ‘या’ 5 कारणांमुळे पावसाळ्यात मासे न खाण्याचा सल्ला देतात तज्ज्ञ!- नवजात बालकांना सुरुवातीच्या महिन्यांत आजार होण्याची अधिक शक्यता जास्त असते. कारण त्यांच्या आतड्यांतील जीवाणू यावेळी विकसित होत असतात. त्यामुळे अनेक तज्ज्ञ सांगतात की, बाळाला घेण्यापूर्वी हात आणि तोंड धुवावे. तसेच बाळाचे चुंबन घेतल्यामुळे जंतू जाऊ शकतात, ज्यामुळे बाळाची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ शकते. (सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)