JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Kundali Gun Milan: लग्नासाठी कोणते असतात 36 गुण? इतके गुण जुळले तरच करा शुभमंगल!

Kundali Gun Milan: लग्नासाठी कोणते असतात 36 गुण? इतके गुण जुळले तरच करा शुभमंगल!

हिंदू धर्मात (Hindu Marriage) वधू-वरांच्या कुंडलीतील गुण जुळणं (Kundali Matching) लग्न ठरवण्याच्या दृष्टिनं अनन्यसाधारण महत्त्व आहे. दोघांचे किती गुण जुळतात, त्या आधारे लग्न होऊ शकते की नाही, हे ठरविले जाते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 20 जानेवारी: हिंदू धर्मात (Hindu Marriage) वधू-वरांच्या कुंडलीतील गुण जुळणं (Kundali Matching) लग्न ठरवण्याच्या दृष्टिनं अनन्यसाधारण महत्त्व आहे. दोघांचे किती गुण जुळतात, त्या आधारे लग्न होऊ शकते की नाही, हे ठरविले जाते. लग्न जुळण्यासाठी ज्योतिषशास्त्रात (Astrology) एकूण 36 गुण सांगण्यात आले आहेत. वधू-वरांच्या लग्नासाठी किमान 18 गुण जुळणं गरजेचं असतं, तरच लग्न झाल्यानंतर संसार ( happy married life) चांगला होऊ शकतो. हे गुण जुळले नाहीत तर संसारात प्रचंड विघ्न येतात असं ज्योतिषशास्रानुसार सांगितलं जातं. ज्यावर बहुसंख्यांचा विश्वास असतो. चला तर जाणून घेऊया लग्नासाठी कोणते 36 गुण आवश्यक आहेत, आणि वधू-वरांची पत्रिका जुळवताना इतर कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या जातात. कसे ठरतात 36 गुण ? ज्योतिषी दैवज्ञ मनोहर यांच्या मतानुसार लग्नाच्या वेळी कुंडली जुळवताना अष्टकूट गुण दिसतात. यामध्ये नाडीचे 8 गुण, भकूटचे 7 गुण, गण मैत्रीचे 6 गुण, ग्रह मैत्रीचे 5 गुण, योनी मैत्रीचे 4 गुण, नक्षत्राचे 3 गुण, वास्यचे 2 गुण आणि वर्णाचा 1 गुण असतो अशा प्रकारे एकूण 36 गुण होतात. हे वाचा- रोज 10 कप कॉफी पिण्याचं व्यसन;अखेर 55 किलोने घटवलं वजन, वाचा तिने नेमकं काय केलं लग्नानंतर वधू-वराचे संबंध एकमेकांशी मैत्रीपूर्ण असावेत, संतती असावी, सुख-संपत्तीत वृद्धी व्हावी, दीर्घायुष्य लाभावे, यासाठी वधूपक्ष व वरपक्ष या दोघांकडून किती गुण जुळतात, हे पाहिले जाते. ‘मुहूर्तचिंतामणी अष्टकूट’ या ग्रंथात वर्ण, वास्य, नक्षत्र, योनी, ग्रह मैत्री, गण, भकूट आणि नाडी यांचा समावेश आहे. किती गुण जुळल्यावर विवाह होतो? लग्नासाठी वधू-वरांचे किमान 18 गुण जुळणं योग्य मानलं जातं. एकूण 36 गुणांपैकी 18 ते 21 गुण आढळल्यास गुणमेलन मध्यम मानलं जातं. यापेक्षा जास्त जुळले, तर त्याला शुभ विवाह मिलन म्हणतात. कोणत्याही वधू-वराला 36 गुण जुळणं अत्यंत दुर्मिळ मानलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्रीराम आणि माता सीतेचे 36 गुण जुळले होते. हे वाचा- विमान प्रवासादरम्यान या प्रश्नांची मिळतात खोटी उत्तरं; एअर होस्टेसचा खुलासा …तर, लग्न करणं टाळा जर तुमच्या पत्रिकेचे गुणमिलन 18 गुणांपेक्षा कमी म्हणजेच 17 गुणांपर्यंत असेल, तर लग्न करू नये. 18 पेक्षा कमी गुण जुळल्यानंतर लग्न केल्यास अशा वधूवरांचे वैवाहिक जीवन आनंदी राहत नाही. त्यामुळे अशावेळी लग्न करणं टाळलं पाहिजे. या गोष्टी लक्षात ठेवा जर कोणाच्या कुंडलीत मंगळ दोष असेल, तर त्याचे लग्न फक्त मंगळ दोष असलेल्या व्यक्तीसोबतच करावं. त्याने मंगळ दोष नसलेल्या व्यक्तीशी लग्न करू नये. लग्न झाले तर ते त्यांच्या वैवाहिक आयुष्यासाठी ते चांगले मानले जात नाही. हिंदू धर्मात लग्न जुळवताना कुंडली पाहण्याची खूप जुनी परंपरा आहे. आजही ही परंपरा पाळली जाते. त्यावर विश्वास ठेवायचा की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या