मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /रोज 10 कप कॉफी पिण्याचं होतं व्यसन; अखेर 55 किलोने घटवलं वजन, वाचा तिने नेमकं काय केलं?

रोज 10 कप कॉफी पिण्याचं होतं व्यसन; अखेर 55 किलोने घटवलं वजन, वाचा तिने नेमकं काय केलं?

128 किलो वजनाच्या महिलेने 15 महिन्यात 55 किलो वजन घटवले (Credit- Instagram/@healthy mummy)

128 किलो वजनाच्या महिलेने 15 महिन्यात 55 किलो वजन घटवले (Credit- Instagram/@healthy mummy)

27 वर्षांच्या एका महिलेला असंच एक व्यसन लागलं होतं, ते म्हणजे कॉफी पिण्याचं (Coffee Addiction). ही महिला दररोज तब्बल 10 कप कॉफी प्यायची. तिचं वजन खूप वाढल्यानंतरही तिला कॉफी पिण्याची ( coffee drinking) सवय नियंत्रित करता येत नव्हती.

पुढे वाचा ...

    सिडनी, 19 जानेवारी: प्रत्येकाला काही ना काही गोष्टी आवडत असतात; पण त्याचं व्यसन लागणं चांगलं नाही. 27 वर्षांच्या एका महिलेला असंच एक व्यसन लागलं होतं, ते म्हणजे कॉफी पिण्याचं (Coffee Addiction). ही महिला दररोज तब्बल 10 कप कॉफी प्यायची. तिचं वजन खूप वाढल्यानंतरही तिला कॉफी पिण्याची ( coffee drinking) सवय नियंत्रित करता येत नव्हती.

    न्यू साउथ वेल्समध्ये राहणाऱ्या सिसिली गुडविन (Cicily Goodwin) या ब्रिटिश महिलेला केवळ कॉफीच नव्हे, तर केएफसीचे ( KFC) खाद्यपदार्थही खाण्याची सवय होती. या सवयींमुळे तिचं वजन 128 किलो झालं होतं. अखेर महिलेने स्वतःचं वजन कमी करण्याचा विचार केला आणि आहार आणि व्यायामावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. याचा परिणाम असा झाला, की 128 किलो वजन असलेल्या महिलेचं वजन 15 महिन्यांत 55 किलोग्रॅम्सनी कमी झालं. आता हा चमत्कार कसा झाला? ते जाणून घेऊ या.

    हे वाचा-रोज-रोज चपाती खाऊन कंटाळा आलाय? थंडीच्या दिवसात ट्राय करा या 5 प्रकारच्या भाकरी

    वजन कमी करण्यासाठी काय केलं?

    सिसिली गुडविन सांगते, 'वजन कमी करण्यासाठी तणावापेक्षा आराम करणं चांगलं आहे, असं मला वाटलं. वजन कमी करताना मी बाहेर जाऊन खाणं बंद केलं नाही किंवा चॉकलेट खाणंसुद्धा सोडलं नाही.' आता 73 किलो वजनाची असलेली सिसिली जेवताना आहाराचं कुठलंही बंधन पाळत नाही. ती म्हणते, 'मी रोज 10 कप कॉफी प्यायचे, तर घरी ऑर्डर केलेले केएफसी आणि मॅकडोनाल्ड्सचे (McDonald) पदार्थ देखील खात होते. मी वजन कमी करण्याचा एक ग्रुप जॉइन केला. तसंच कॉफीऐवजी स्मूदी म्हणजे भाज्या आणि फळांचा रस आणि आरोग्यदायी आहाराकडे लक्ष दिलं. काही महिन्यांतच जिममध्ये न जाता माझं वजन 20 किलो कमी झालं.' या काळात दिवसातून 3 लीटर पाणी पिणं, किमान 10 हजार पावलं चालणं असा तिचा दिनक्रम होता.

    हे वाचा-Amla Powder: घरीच बनवा अशी आवळा पावडर; कमी खर्चात कुटुंब राहील नेहमी निरोगी

    घरीच केला व्यायाम

    वजन वाढण्याचं मुख्य कारण म्हणजे फास्ट फूड आणि जास्त कॉफी पिणं, हे असल्याचं लक्षात आल्याने सिसिली गुडविनने तिच्या आहारात आरोग्यदायी गोष्टींचा समावेश केला. कॉफीऐवजी स्मूदी पिण्यास सुरुवात केली. दोन मुलं असल्याने त्यांच्यावर लक्ष ठेवत यावं, यासाठी जिमला जाण्याऐवजी तिने घरीच व्यायाम सुरू केला. दर आठवड्याला 2 किलो याप्रमाणे तिने 15 महिन्यांत 55 किलो वजन कमी केलं. ती सांगते, 'तुम्हाला काय करायचं आहे, हे तुम्ही निश्चित केल्यानंतर त्या गोष्टी सहज शक्य होतात.'

    वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी विविध उपायांचा शोध घेतला जातो; पण योग्य आहार व व्यायामाचं नियोजन केल्यास वजन कमी करता येऊ शकतं, हे सिसिली गुडविन हिने दाखवून दिलं आहे.

    First published:

    Tags: Coffee, Weight, Weight loss