Home /News /lifestyle /

विमान प्रवासादरम्यान हे प्रश्न विचारल्यास मिळतात खोटी उत्तरं; एअर होस्टेसने केला खुलासा

विमान प्रवासादरम्यान हे प्रश्न विचारल्यास मिळतात खोटी उत्तरं; एअर होस्टेसने केला खुलासा

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

विमान प्रवास हा कितीही आरामदायी असला तरी त्याच्या सुरक्षितेतची (Travel Safety) शाश्वती नसते. पण तरीही हवाई सुंदरीला तुम्ही याबाबतीत काही विचारल्यास त्यांना उसनं अवसान आणून खोटं उत्तर द्यावं लागतं

नवी दिल्ली 19 जानेवारी : विमान प्रवास म्हटला की, अजूनही बऱ्याच जणांना उत्सुकता असते तर काही जणांना भीतीही वाटते. डोमेस्टिक विमानाचा प्रवास असो वा आंतरराष्ट्रीय विमानातला प्रवास आजही विमान प्रवासातील थ्रील काही कमी झालेलं नाही. विमान प्रवासातील अजून एक आकर्षण म्हणजे फ्लाईट अटेंडंट्स (Flight Attendant) किंवा केबिन क्रू (Cabin Crew) असतात. ज्याला आपल्याकडे हवाईसुंदरी या गोड नावानेही ओळखलं जातं. त्यांचा पेहराव, दिसणं, बोलणं, सेवा देणं सगळंच छान असतं आणि आकर्षक वाटतं. तर या विमान प्रवासातील काही रोचक गोष्टींबाबतचं वृत्त झी न्यूजने दिलं आहे. विमानाचा प्रवास (Air Travel) आजही सर्वात महागडा आहे. त्यामुळे विमानातील जास्तीत जास्त सुविधांचा लाभ प्रवाशांना घ्यायचा असतो आणि दिमतीला हवाई सुंदरी असतेच. पण तुम्हाला माहीत आहे का, हवाई सुंदरीकडून तुम्हाला फसवणारी उत्तरंही मिळू शकतात. The Sun मध्ये आलेल्या वृत्तानुसार अनेक बाबतीत फ्लाईट अटेंडंटना वेळ मारून नेणारं उत्तर द्यावं लागतं. विमान प्रवास हा कितीही आरामदायी असला तरी त्याच्या सुरक्षितेतची (Travel Safety) शाश्वती नसते. पण तरीही हवाई सुंदरीला तुम्ही याबाबतीत काही विचारल्यास त्यांना उसनं अवसान आणून खोटं उत्तर द्यावं लागतं. खरं तर त्यांनाही विमानाच्या सुरक्षिततेची तितकीशी खात्री नसते.

थंडीत Heart Attack चा धोका वाढतोय; या चुकीच्या सवयी ताबडतोब बंद करा

काही वेळा विमान प्रवासी उत्सुकतेपोटी एखादी माहिती हवाई सुंदरीकडे मागतात. पण वेळ मारून नेण्यासाठी तुम्हाला अधिक माहिती घेऊन सांगते, असं उत्तर दिलं जातं; पण ती माहिती तुम्हाला कधीच दिली जात नाही. विमान प्रवासात दिलं जाणारे खाद्य पदार्थ हा अजून एक आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. अनेक जण आपल्या आवडत्या पेय किंवा स्नॅक्सची मागणी करतात. पण ते तुम्हाला मिळेलच याची गॅरंटी नाही. ते सगळं तुमच्या हवाई सुंदरीच्या मूडवरही अवलंबून असतं. तुम्ही एखादाच पदार्थ का नाही? अशी विचारणा करू शकत नाही ती केली तर तुम्हाला तात्पुरतं उत्तर दिलं जातं. विमान प्रवास करताना अनेकदा हवामानामुळे किंवा तांत्रिक अडचणींमुळे आवाज येतो किंवा विमान धडधडू लागतं. अशावेळी स्वतःला भीती वाटत असतानादेखील विमानातील क्रूला मात्र प्रवाश्यांना सगळं ठीक असल्याचा खोटा दिलासा द्यावा लागतो. जो त्यांच्या कामाचा भाग आहे. त्यावेळी हवामानातील बदलांमुळे किंवा ढगांतून जाताना असा आवाज येतो असं उत्तर या हवाईसुंदरी देऊ शकत नाहीत. त्यामुळे अशा शंका न विचारणं हेच बरं.

कोरोना पॉझिटिव्ह आई लेकीलाही पाजतेय आणि स्वतःही पितेय आपलं Breastmilk कारण...

चूक नसतानाही समोरचा सॉरी म्हणाला तर कोणाला नाही आवडणार? विमानातील प्रवाशांना चांगलं वाटावं म्हणून केबिन क्रू आणि इतर स्टाफ पॅसेंजर्सना सॉरी म्हणतात. त्यांच्या मनात कितीही नसलं तरीही त्यांना हे करावंच लागतं. आता तुम्हाला कळलं असेलच की, विमान प्रवासाच्या सुरूवातीला चेहऱ्यावर सुहास्य आणून सुरक्षेच्या सूचना देणारी हवाई सुंदरीही प्रत्येक वेळी खरं बोलेलच असं नाही. त्यामुळे विमान प्रवास करताना जास्त हुरळून जाऊ नका.
First published:

Tags: Airplane, Travel by flight

पुढील बातम्या