स्किन केअर टिप्स
मुंबई, 16 डिसेंबर : तुम्हाला कॉफी पिणं आवडत असेलच. अनेकांना चहापेक्षाही कॉफीच जास्त आवडते. कॉफी पेय म्हणून गुणकारी आहे. सोबतच तिचा अजून महत्त्वाचा उपयोग जाणून घेऊया. कॉफी आपल्या स्किन केअर रूटिनमध्ये अतिशय महत्त्वाची ठरू शकते. याचं कारण कॉफीमध्ये अँटी एजिंग गुण असतात. याचा वापर करून वेळेआधी चेहऱ्यावर पडणाऱ्या सुरकुत्या रोखल्या जाऊ शकतात. सोबतच ब्लॅक पॅचेस, निस्तेजपणापासूनही सुटका होऊ शकते. सोबतच यात ब्लिचिंगचे गुणधर्मही असतात. यातून चेहऱ्याची डेड स्किन जाऊन तेज येतं. कॉफी वापरून तुम्ही घरच्याघरी फेशियल करू शकता. यातून तुमच्या चेहऱ्यावर नॅच्युरल पॉलिशिंग होईल आणि इन्स्टंट ग्लो येईल. जाणून घ्या कॉफी वापरून घरच्या-घरी कसं करायचं फेशियल. यातून तुमची त्वचा उजळण्यास मदत होईल. अशा प्रकारे करा कॉफी फेशियल एका बाऊलमध्ये 1 चमचा कॉफी पावडर घ्या. त्यात थोडं बारीक केलेलं तांदळाचं पीठ टाका. आता यात 2 चमचे कच्चं दूध, एक चमचा लिंबाचा रस आणि 1 चमचा मध टाका. सगळ्याला मिसळून पेस्ट बनवा. हेही वाचा पार्लरमध्ये चेहऱ्याची लागली वाट; कुणाचा चेहरा भाजला तर कुणाची त्वचा काळी पडली आता तुमचा चेहरा आणि मान चांगली धुवून घ्या. पुसून झाल्यावर ही पेस्ट तुमचा चेहरा आणि मान-गळ्यावर लावा. पाच मिनिट तसंच ठेवा. थोडी सुकल्यावर हात ओला करून घेत चेहऱ्यावर हलका मसाज करा. 10 मिनिटे मसाज केल्यावर सध्या पाण्यानं चेहरा धुवून घ्या. उरलेली पेस्ट फेसपॅक सारखी लावून घ्या. 15 मिनिट ठेऊन पुन्हा धुवून घ्या. आठड्यातून दोनदा तुम्ही हे करू शकता.
कॉफी थेट चेहऱ्यावर लावली तर सन स्पॉट्स कमी होऊ शकतात. सोबतच चेहऱ्यावर उमटलेले लाल चट्टे, डार्क सर्कल्सही यामुळे कमी होऊ शकतात. कॉफीमध्ये क्लोरोजिनीक ऍसिड असतं. याशिवाय वजन कमी करण्यासही त्यामुळे मदत होते. शरीरात ग्लुकोज बनण्याची प्रक्रियाही मंदावते. मधुमेहाचे रुग्ण कॉफी साखर न टाकताही पिऊ शकतात. हे वाचा - ‘त्या’ समुद्रकिनाऱ्यावर भलं मोठं नेमकं काय होतं? भूत की एलीयन (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)