मराठी बातम्या /बातम्या /देश /

पार्लरमध्ये गेल्यामुळे या महिलांच्या चेहऱ्याची झाली वाईट अवस्था, कुणाचा चेहरा भाजला तर कुणाची त्वचा काळी पडली

पार्लरमध्ये गेल्यामुळे या महिलांच्या चेहऱ्याची झाली वाईट अवस्था, कुणाचा चेहरा भाजला तर कुणाची त्वचा काळी पडली

शक्यतो सौंदर्य खुलवण्यासाठी महिलावर्गाची पावलं ब्युटी पार्लरकडे वळतात. पण ब्युटी पार्लरने तुमच्या सुंदर दिसण्याच्या स्वप्नांचा भंग केला तर? ब्युटी पार्लरमध्ये अशा अनेक घटना घडल्या आहेत त्यामुळे त्याठिकाणी जाताना तुम्ही सुद्धा दहा वेळा विचार कराल.

शक्यतो सौंदर्य खुलवण्यासाठी महिलावर्गाची पावलं ब्युटी पार्लरकडे वळतात. पण ब्युटी पार्लरने तुमच्या सुंदर दिसण्याच्या स्वप्नांचा भंग केला तर? ब्युटी पार्लरमध्ये अशा अनेक घटना घडल्या आहेत त्यामुळे त्याठिकाणी जाताना तुम्ही सुद्धा दहा वेळा विचार कराल.

शक्यतो सौंदर्य खुलवण्यासाठी महिलावर्गाची पावलं ब्युटी पार्लरकडे वळतात. पण ब्युटी पार्लरने तुमच्या सुंदर दिसण्याच्या स्वप्नांचा भंग केला तर? ब्युटी पार्लरमध्ये अशा अनेक घटना घडल्या आहेत त्यामुळे त्याठिकाणी जाताना तुम्ही सुद्धा दहा वेळा विचार कराल.

पुढे वाचा ...
मुंबई, 03 मार्च: आपलं सौंदर्य आणखी खूलून दिसावं यासाठी बऱ्याच महिलांना पार्लरमध्ये जाणं खूप आवडतं. ही अशी जागा आहे याठिकाणी जाऊन महिला आपलं सौंदर्य वाढवू शकतात आणि स्वत:वर लक्ष केंद्रीत करण्यासाठी चांगला वेळ घालवू शकतात. पण याच ब्युटी पार्लरने तुमच्या सुंदर दिसण्याच्या स्वप्नांचा भंग केला तर? ब्युटी पार्लरमध्ये अशा अनेक घटना घडल्या आहेत त्यामुळे त्याठिकाणी जाताना तुम्ही सुद्धा दहा वेळा विचार कराल. डॉक्टरचा चेहराच बिघडला काही दिवसांपूर्वी अशीच घटना सिल्चर येथे राहणाऱ्या डॉक्टर बिनीता नाथ यांच्यासोबत घडली. एका लग्नसोहळ्याला जाण्यापूर्वी बिनीता आपल्या घराजवळ असणाऱ्या ब्युटी पार्लरमध्ये गेल्या. त्यांनी आपल्या चेहऱ्याला डी-टॅन आणि ब्लीच केलं. क्रीम लावल्यानंतर काही वेळातच त्यांना त्रास होऊ लागला. त्यांना असं वाटलं की कोणी तरी त्यांच्या चेहऱ्यावर गरम तेल टाकलं आहे. त्याठिकाणी उपस्थित असलेल्या स्टाफनं ताबडतोब त्यांच्या चेहऱ्याला बर्फ लावला मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. त्यांच्या चेहऱ्याची त्वचा खराब झाली होती. डॉ. बिनीता यांनी त्यांना आलेला वाईट अनुभव फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून शेअर केला आहे. त्यांनी सांगितलं की, 'मी नेहमी ब्युटी पार्लरला जाते. ब्युटी पार्लरच्या स्टाफने मला सांगितलं की जर तुम्हाला थ्रेडिंग करायचं नसेल तर चेहऱ्यावर असलेल्या केसांसाठी ब्लीच आणि डी-टॅन ट्रीटमेंट करु शकता. स्टाफनं दिलेल्या सल्ल्यानुसार मी तयार झाले आणि ही दुर्दैवी घटना घडली.' (हे वाचा-सावधान! 2050 पर्यंत ऐकण्याची क्षमता होणार कमी; WHOचा इशारा) शारदा ब्युटी पार्लरमध्ये बिनीता यांच्यासोबत ही घटना घडली. या पार्लरच्या मालकीणीने असा दावा केला की, 'आमच्या स्टाफने ब्लीच केल्यानंतर डी-टॅन करण्यास नकार दिला होता. पण डॉक्टर बिनीता यांनी डी-टॅन फेशियल करण्यावर जोर दिला आणि त्यामुळेच ही घटना घडली.' आपण आपल्या त्वचेवर काय वापरता यामुळे काही फरक पडत नाही. मग ते त्वचेची निगा राखणारे प्रोडक्ट असो, मेकअप असो किंवा कोणत्याही प्रकारचं केमिकल असो. ते चांगलं आहे की नाही याची तपासणी करण्यासाठी आधी ते प्रोडक्ट आपल्या हातावर टेस्ट केलं पाहिजं. असं केल्यामुळं तुम्हाला ते प्रोडक्ट तुमच्या त्वचेसाठी योग्य आहे की नाही हे समजेल. डेंटिस्टबरोबरही घडली अशीच घटना अशाचप्रकारची एक घटना गोलाघाट येथे राहणाऱ्या डेंटिस्टसोबत घडली होती. डॉ. लीसा देवी आपल्या बहिणीच्या लग्नाला जाण्यापूर्वी फेशियल करण्यासाठी काया युनिसेक्स पार्लरमध्ये गेल्या होत्या. त्याठिकाणी फेशियलच्या प्रक्रियेदरम्यान ब्युटीशियनने पाण्याच्या स्टीमरने त्यांच्या चेहऱ्यावर उकळते पाणी टाकले. यामुळे लीसा देवी यांच्या चेहरा भाजला होता. त्यांनी आरोप केला होता की, ब्युटिशियन अनुभवी नव्हती आणि त्यांनी वापरलेल्या स्टीमरची क्वालिटी चांगली नव्हती. डॉ. लीसा गोलाघाट चरंगिआ गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये काम करतात. या घटनेनंतर बरेच दिवस त्या चेहरा पदराने झाकून घेऊन काम करत होत्या. टीव्ही अभिनेत्रीबरोबर घडला हा प्रकार आणखी एक प्रकार गेले काही दिवस गाजतोय तो म्हणजे मेघना उर्फ निर्मला या टीव्ही अभिनेत्रीचा. ही अभिनेत्री हैदराबाद याठिकाणी असणाऱ्या श्रीनगर कॉलनीमध्ये कॉस्मेटिक अँड लेजर क्लिनिकमध्ये चेहऱ्यावरील सुरकुत्यावर उपचार आणि केसांना रंग करण्यासाठी गेली होती. 45 दिवसांची ट्रीटमेंट आणि चांगल्या परिणामांसाठी या क्लिनिकने तिच्याकडून 62000 रुपये घेतले होते. या उपचारांचा उलटा परिणाम मेघनाच्या त्वचेवर झाला. तिच्या चेहऱ्याचा रंग अधिक गडद होऊ लागला. शिवाय तिचा त्वचेचा नैसर्गिक रंग देखील ती गमावून बसली. (हे वाचा-मूड खराब आहे? मग या पाच गोष्टी नक्की कराच! लगेच मूड होईल ठीक!) मेघनाला हा दुष्परिणाम लक्षात आल्यानंतर तिने क्लिनिकला नोटीस पाठवली आहे. या क्लिनिककडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने मेघनाने ग्राहक न्यायालय फोरमचा दरवाजा ठोठावला आहे. त्यांनी क्लिनिकला 62000 रुपयांसह नुकसान भरपाई म्हणून 50000 आणि 5000 रुपये उपचारासाठी देण्यास सांगितले आहे.
First published:

Tags: Beauty tips

पुढील बातम्या