नवी दिल्ली, 16 डिसेंबर : सोशल मीडियावर सध्या असंख्य फोटोज आणि व्हिडिओज व्हायरल होत आहेत. तिथे दिसणारी प्रत्येक गोष्ट सत्य असेलच, याबद्दल नक्की सांगता येत नाही. परंतु, काही वेळा चुकीचे दावे करून एखादी बाब दाखवली जाते. सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. यात वेगवेगळे प्रकारचे दावे केले जात आहेत. परंतु, सत्य मात्र वेगळंच आहे. एका समुद्रकिनाऱ्यावर काही कोळी चालत असल्याचा दावा सोशल मीडियावर अनेक जणांनी केला. हेच फोटो शेअर करताना कोणी याचा भूत-प्रेतांशी संबंध जोडला, तर काही जण त्यांना परग्रहावरचे जीव असं संबोधत आहेत. खरं पाहायला गेलं, तर यापैकी कुठलाही दावा सत्य नाही.
न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, 62 वर्षांचे शेतकरी जॅन वोर्स्टर दक्षिण आफ्रिकेतल्या स्टील बे इथल्या त्यांच्या मूळ गावी वेस्टर्न केप समुद्रकिनाऱ्यावर गेले होते. तिथेच त्यांनी अनेक फोटो काढले. त्या फोटोंची इतक्या मोठ्या प्रमाणावर चर्चा होईल आणि हे फोटो व्हायरल होतील, असं त्यांनाही कधी वाटलं नाही. फोटोत दिसणारी गोष्ट वेगळी असताना सोशल मीडियावर मात्र यावर उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
हे ही वाचा : आठ वर्षीय मुलीचं सांताक्लॉजला पत्र, चिमुकलीने आई-वडिलांसाठी मागितलं ‘हे’ गिफ्ट
कोरफडीच्या रोपट्याला समजले कोळी
समुद्रकिनाऱ्यावरच्या फोटोवरून सोशल मीडियावर चर्चा होत असताना सत्य मात्र काही वेगळे आहे. समुद्रकिनाऱ्यावर कोरफडीची अनेक मृत रोपटी पसरलेली होती. समुद्राच्या लाटा त्यावरून जात होत्या. जॅन यांना हे पाहिल्यानंतर फोटो क्लिक करण्याचा मोह आवरला नाही. हवामानबदल आणि वनसंरक्षणाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी त्यांनी हा फोटो काढला. तो फोटो पाहून नागरिक झाडांच्या संरक्षणाच्या बाबतीत विचार करतील, असं वाटत असताना सोशल मीडियावर मात्र या फोटोला वेगळंच काही तरी समजून त्यावर बरीच उलटसुलट चर्चा सुरू झाली.
चुकीचा दावा करून सोशल मीडियावर फोटो व्हायरल
फेसबुकवर फोटो पोस्ट केल्यानंतर हा फोटो प्रचंड व्हायरल झाला. जॅन यांनी दक्षिण आफ्रिकेतल्या संबंधित फेसबुक ग्रुपवर हे फोटो पोस्ट केले होते. त्यानंतर अनेक ग्रुप आणि चॅनल्सवर हा फोटो शेअर व्हायला सुरुवात झाली. फेसबुक युझर मर्टल फिलबॅक यांनी फोटो शेअर करताना त्यावर ‘समुद्राप्रमाणे असणारे समुद्री स्पाइडर’ अशी कॅप्शन दिली. त्यानंतर या फोटोवरून अनेक अफवा पसरल्या. काहींनी तर फोटोत दिसणारी गोष्ट म्हणजे परग्रहावरचे जीव असल्याचं संबोधलं.
हे ही वाचा : बाबाचं प्रेम! पावसापासून मुलाला असं वाचवलं, व्हायरल फोटो पाहून व्हाल भावुक
अनेकांनी याला भूत-प्रेताची उपमा दिली. फेसबुकवर शेअर करण्यात आलेला हा फोटो 53 हजारपेक्षा अधिक जणांनी शेअर केला आहे. एका युजरने तर हा फोटो कुठला आहे हे जाणून घेण्याची इच्छा व्यक्त करून अशा जागेवरून अनेक किलोमीटर दूर राहायचं असल्याचं मत व्यक्त केलं.