फ्रूट सॅलड असो किंवा ज्युस असो, अननसाचा वापर बहुतांश गोष्टींमध्ये केला जातो. 

आंबट-गोड चवीमुळे अननसासोबत खाल्ल्या जाणाऱ्या इतर फळांचीही चव वाढते. 

अननसामध्ये व्हिटॅमिन 'सी' मुबलक असल्याने रोगप्रतिकारक शक्ती आणि कोलेजन वाढण्यास मदत होते. 

आरोग्यासाठी अननसाचे अनेक फायदे असूनही लोक ते विकत घेणे टाळतात. कारण, अनेकांना चवीला चांगला आणि गोड अननस ओळखता येत नाही.

अननसामध्ये फॉलिक अॅसिड, मँगनीज आणि फायबरही आढळते. अननसमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म देखील असतात, त्यामुळे पचन चांगले होते.

चांगला अननस खरेदी करताना नेमक्या कोणत्या गोष्टी पाहायच्या त्याविषयी जाणून घेऊया.

अननस विकत घेताना हातात उचलून पाहा. वजनाला जड वाटत असेल तर समजून घ्या की, तो पिकलेला असण्यासोबतच चवीलाही गोड असेल.

अननस विकत घेताना तो हातात उचलून त्याचा सुगंध तपासा. चांगला वास असेल तर समजून घ्या अननस पिकलेला आहे आणि चवीलाही गोड निघेल. 

अननसाची पाने तोडून ओळखा-पिकलेल्या अननसाची पाने सहज तुटतात तर कच्च्या अननसाची पाने सहज तुटत नाहीत. हा साधा फरक आहे.

अननसमध्ये व्हिटॅमिन बी 1 असल्यामुळे ते स्नायू आणि मज्जासंस्था निरोगी ठेवण्यास देखील मदत होते.