मुंबई, 15 फेब्रुवारी : फुलांचा त्वचेच्या आरोग्याशी खूप संबंध आहे. फुलांचे अर्क शरीरावर थेट वापरल्यास तर उपयुक्त ठरतातच. मात्र चमेली, हिबिस्कस इत्यादी फुलांमध्ये औषधी आणि त्वचा साफ करणारे गुणधर्म असतात, जे चहाच्या स्वरूपात सेवन केल्यावर सर्वोत्तम परिणाम देतात. असाच एक केसांसाठी फायदेशीर असलेल्या चहाबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. या आयुर्वेदिक चहाने तुम्हाला सर्व ऋतूंमध्ये केसांच्या सर्व प्रकारच्या समस्यांपासून सुटका मिळू शकते. मग ते केस गळणे, पुरुष/महिला पॅटर्न टक्कल पडणे असो किंवा एलोपेशिया असो. सर्वांवर हे फायदेशीर ठरते. इंस्टाग्रामवर drdixa_healingsouls सविस्तर माहिती दिली आहे.चला तर मग जाणून घेऊया हा चहा कसा बनवायचा आणि याचे फायदे काय आहेत.
Skin Care Tips : चेहऱ्यावर नैसर्गिक चमक हवीय? मसूर डाळ फेशियल आहे उत्तम, फॉलो करा या स्टेप्सअसा बनवा जास्वदांच्या फुलांचा चहा… - 1 ग्लास पाणी - 10 कोरडी/ताजी मोरिंगाची पाने - 3 कोरड्या/ताज्या हिबिस्कस म्हणजेच जास्वदांच्या पाकळ्या - 10 कोरडी/ताजी कढीपत्ता - 10-15 कोरड्या/ताज्या गुलाबाच्या पाकळ्या
गॅसवर एक पातेले ठेऊन त्यात एक ग्लास पाणी टाका. गॅस सुरु करा आणि या पातेल्यात वरील सर्व साहित्य टाकून 3-5 मिनिटे उकळू द्या. त्यानंतर तुमचा हिबिस्कसचा चहा तयार होतो. चहा गाळून घ्या आणि कोमट असताना प्या. तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कॅफिनयुक्त चहाऐवजी ते घेऊ शकता. या चहामध्ये असलेले सर्व घटक खूप प्रभावी आहेत. त्यामुळे याचा तुमच्या केसांना निश्चितच फायदा होतो. चहामधील साहित्याची वैशिष्ठ्ये मोरिंगा : मोरिंगाचे गुणधर्म उष्ण आहे. ते कफ आणि वात संतुलित करते. मोरिंगाच्या पानांमध्ये आयर्न, बी व्हिटॅमिन, फोलेट, कॅल्शियम, व्हिटॅमिन ए आणि झिंक भरपूर प्रमाणात असतात, जे केसांच्या वाढीसाठी आणि पोषणात मोठी भूमिका बजावतात. हिबिस्कस : हिबिस्कसचे गुणधर्म थंड आहे. ते कफ आणि पित्त संतुलित करते. आयुर्वेदात याला केश्य मानले जाते म्हणजे केसांची गुणवत्ता सुधारते. हे व्हिटॅमिन सी, फ्लेव्होनॉइड्स, अमीनो अॅसिड, म्युसिलेज फायबर, आर्द्रता आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. हिबिस्कस पोषण देते, सुंदर केसांच्या वाढीस प्रोत्साहन देते. पावसाळी वातावरणातही स्कीन राहील एक्स्ट्रा ग्लोईंग; एक्सपर्ट्सने सांगितल्या या सोप्या टिप्स कढीपत्ता : कढीपत्ता थंड व हलका असतो. ते केस गळणे कमी करण्यास मदत करतात, केस पांढरे होऊ देत नाही आणि केसांची वाढ सुधारतात. हे इंसुलिन संवेदनशीलता सुधारण्यास आणि हार्मोन्स संतुलित करण्यास मदत करते. ते अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहे, जे टाळूला मॉइश्चराइज करण्यास मदत करतात. त्यामध्ये बीटा-कॅरोटीन आणि प्रोटीनचे प्रमाणही जास्त असते, जे केस गळती रोखण्यात मदत करतात. गुलाब : हे फूल पित्ताला शांत करण्यासाठी आणि संतुलित करण्यासाठी वापरली जाते. हे केसातील अतिरिक्त तेल आणि कोंडा कमी करण्यास मदत करते. हे दाहक-विरोधी देखील आहे. म्हणून सोरायसिस आणि एक्जिमामुळे केस गळण्याच्या परिस्थितीत फायदेशीर आहे.
(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)