JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Throat Cancer : घशात सारखा कफ राहतोय? वेळीच सावध व्हा, लगेच डॅाक्टरांशी करा संपर्क

Throat Cancer : घशात सारखा कफ राहतोय? वेळीच सावध व्हा, लगेच डॅाक्टरांशी करा संपर्क

देशातील 9 पैकी एकाला घशाच्या कॅन्सरचा धोका आहे. या कॅन्सरची लक्षणं तुम्हाला माहिती आहेत का?

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 4 जुलै : कर्करोग म्हणजेच कॅन्सर ही जगासमोरील एक जीवघेणी समस्या आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे हा आजार आणखीनच धोकादायक बनला आहे. कॅन्सरची लक्षणे अगोदरच आढळून आल्यास त्यावर सहज उपचार करता येतात. कॅन्सरचे अनेक प्रकार आहेत.  त्यापैकी घशाच्या कॅन्सरची लक्षणं काय आहेत?  याबाबत पुण्यातील डॉक्टर कल्पना गायकवाड यांनी महत्त्वाची माहिती दिलीय. काय आहेत लक्षणं? देशातील 9 जणांपैकी एका व्यक्तीला हा कॅन्सर होण्याचा धोका आहे, अशी माहिती डियन काउन्सिल फॉर मेडिकल रिसर्च (ICMR) आणि नॅशनल सेंटर फॉर डिसिज अँड इंफरमॅटिक्स (NCDIR) यांच्या संशोधनातून समोर आलीय. या कॅन्सरचे प्रामुख्यानं दोन  प्रकार आहे

अन्ननलिकेचा कॅन्सर -  हा एसोफॅगल कॅन्सर म्हणूनही ओळखला जातो. अन्न नलिकेमध्ये इन्फेक्शन जर सतत होत असेल हा कॅन्सर होण्याचा धोका अधिक वाढतो. एसोफॅगल कॅन्सर किंवा अन्न नलिकेचा कॅन्सर जास्तकरून पुरुषांना होतो. आशिया आणि आफ्रिका खंडातील देशांमध्ये या कॅन्सरचं प्रमाण जास्त आहे. श्नास नलिकेचा कॅन्सर - रुग्णाच्या शरीरात कर्करोगाने चांगलेच हातपाय पसरले असतील, तर त्या रुग्णाला श्वास घेण्यासही त्रास होऊ लागतो. हा त्रास टोकाला पोहोचला, तर त्या रुग्णावर ट्रेकिओस्टॉमी केली जाते. अंगावर काढू नका, पावसाळ्यात फिट राहण्यासाठी हे करा, डॉक्टरांनीच दिला सल्ला घशाच्या कॅन्सरची लक्षणं कफ - घशाच्या काही कॅन्सरमध्येत कफ राहतो. जास्त दिवस कफ येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. आवाजात बदल – जडपणा किंवा आवाजात बदल हे घशाच्या कॅन्सरचे अगदी सुरुवातीचे लक्षण आहे. आवाजातील हा बदल दोन आठवड्यात बरा झाला नाही, तर लगेच डॉक्टरांकडे जावे गिळण्यात अडचण - अन्न गिळण्यात अडचण येत असेल, अन्न घशात अडकल्यासारखं वाटत असेल तर ताबडतोब डॉक्टरांकडं जावं, हे घशाच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं. पावसाळ्यात डेंग्यू, मलेरियाचा असतो धोका, अशी घ्या काळजी वजन कमी होणे -  कोणत्याही प्रकारच्या कॅन्सरच्या बाबतीत वजन अचानक कमी होते. त्यामुळे कोणतेही कारण नसताना अचानक वजन कमी होत असल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा कानात दुखणे -  कानाचा भागही मानेमध्ये येतो. त्यामुळे कानात सतत दुखत असेल आणि ही वेदना लवकर दूर होत नसेल, तर ते घशाच्या कॅन्सरचे लक्षण असू शकते. घशाच्या खाली सूज येणे –  घशाच्या खालच्या भागात सूज आली असेल आणि उपचार करूनही ती बरी होत नसेल तर ते कॅन्सरचे कारण असू शकते. या प्रकरणात त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा. कानात दुखणे, मानेवर सूज येणे, गिळण्यास त्रास होणे, या लक्षणांसह घशाचा कॅन्सर सुरुवातीलाच ओळखता येतो. या लक्षणांकडे वेळीच लक्ष दिल्यास आणि डॉक्टरांकडे गेल्यास घशाच्या कर्करोगावर सहज उपचार होऊ शकतात, अशी माहिती डॉ. गायकवाड यांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या